Turmeric for skin care: औषधी गुणधर्मांनी युक्त हळदी फक्त जेवणाची चवच वाढवते असं नाही तर हळद त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. हळदीचा वापर त्वचेच्या काळजीसाठी वर्षानुवर्षे केला जात आहे. अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध हळद त्वचेशी संबंधित समस्या दूर करते. आयुर्वेदातही हळदीचा वापर केला जातो. त्वचेची काळजी घेण्यासाठी हळदीवर आधारित अनेक उत्पादने उपलब्ध आहेत. (Try turmeric face cleanser for bright skin)
तुम्ही यापूर्वी अनेकदा हळदीचा वापर फेस मास्क म्हणून केला असेल, परंतु हळदीच्या क्लिंजर म्हणून वापर करून त्वचा चमकदारही बनवता येते. पण हे हळदीचे क्लिंजर तयार कसे करायचे?
हळद क्लिंजर बनविताना हळद आणि दूध या दोन गोष्टी प्रामुख्याने आवश्यक असतात. हे क्लिंजर तयार करण्यासाठी 2-3 चमचे दुधात चिमूटभर हळद मिसळा. हलक्या हातांनी चेहऱ्यावर लावा आणि 10-12 मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या आणि नंतर धुवा. या क्लिंजरचा वापर केल्याने फ्री रॅडिकल्स आणि डागांपासून सुटका होईल.
अधिक वाचा: How To Lower Cholesterol: खराब कोलेस्ट्रॉल शरीरातून बाहेर काढण्यासाठी या 5 पदार्थाचे करा सेवन
या क्लिंजरचा वापर त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यास मदत करतो. हे क्लिंजर तयार करण्यासाठी एका भांड्यात एक ते दोन चमचे दह्यामध्ये अर्धा चमचा हळद मिसळा आणि हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. तुम्हाला लवकरच परिणाम दिसून येईल.
एक चमचा एलोवेरा जेलमध्ये थोडी हळद मिसळून क्लिंजर तयार करा. चेहरा धुण्यासाठी या क्लिंजरचा वापर करा.
हे क्लिंजर तयार करण्यासाठी संत्र्याची साल बारीक करून पावडर तयार करा. आता त्यात हळद आणि मध टाका. यानंतर हलक्या हातांनी चेहऱ्यावर लावा. 10-12 मिनिटे चेहऱ्यावर ठेवा आणि कोरडे झाल्यानंतर धुवा.
टिप- या लेखात दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य ज्ञानावर आधारित आहे. ही स्वीकारण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांता सल्ला घेणे आवश्यक आहे.