वजन घटवण्यासोबत बॉ़डी डिटॉक्स करते तुळस-ओव्याचे पाणी

तब्येत पाणी
Updated Nov 19, 2020 | 18:05 IST | टाइम्स नाऊ मराठी

जर दररोज तुळशीचे सेवन केले गेले तर ही औषधी वनस्पती मेटाबॉलिज्म वाढवण्यास आणि वजन घटवण्यात मदत करतात.

carrom seeds water
वजन घटवण्यासोबत बॉ़डी डिटॉक्स करते तुळस-ओव्याचे पाणी 

थोडं पण कामाचं

  • वजन घटवण्यात होते मदत
  • पोटातील गॅस्ट्रिक रस सोडण्यात मदत करतात
  • तुळस आणि ओवा एकत्र करून चांगला काढाही तयार केला जाऊ शकतो.

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून सणांची पर्वणीच सुरू आहे. सणांदरम्यान आपण मिठाई तसेच तळलेल्या पदार्थांचा मोठ्या आवडीने आस्वाद घेतो. मिठाई तसेच गोडधोड पदार्थांवर ताव मारला जातो. मात्र सण संपताच आपण पुढच्याच दिवसापासून हेल्दी फूड(healthy food) आणि डिटॉक्स प्लान(detox plan) शोधायला लागतो. ज्यामुळे शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होईल आणि तुम्ही सोप्या पद्धतीने वजन कमी(weight loss) करू शकाल. 

सध्या दिवाळीसणादरम्यान सगळ्यांनी गोडधोड पदार्थांवर ताव मारला असेल. मात्र आता पुन्हा आपल्या रूटीनवर येण्याची गरज आहे. दरम्यान, वजन कमी करणे हे काही एका दिवसाचे काम नाही. यासाठी तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये वजन घटवणाऱ्या पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे. तसेच तुम्हाला वजन घटवणाऱ्या आहारासोबत काही डिटॉक्स ड्रिंक्सचाही समावेश केला पाहिजे. ज्यामुळे मेटाबॉलिज्म सुधारण्यास मदत होईल. 

ही गोष्ट लक्षात ठेवून आम्ही तुमच्यासाठी एक डिटॉक्स ड्रिंक घेऊन आलो आहोत ज्यात पचन, मेटाबॉलिज्म आणि डिटॉक्सिफिकेशनला प्रोत्साहन देणारी सगळी पोषकतत्वे आहेत. हे ड्रिंक तुळस आणि ओव्यापासून तयार करण्यात आले आह. या दोनही गोष्टींना आयुर्वेदात मोठे स्थान आहे. तुळस तर अतिशय पवित्र मानली जाते. 

वजन कमी करण्यासाठी तुळस

तुळशीमध्ये एक अँटी ऑ्क्सिडंटचे भांडार आहे ज्यामुळे आपल्या शरीराला फ्री रॅडिकलमुळे होणारे नुकसान रोखण्यास मदत होते. जर दररोज तुळशीच्या पानाचे सेवन केले तर ही औषधी वनस्पती मेटबॉलिज्म वाढवण्यास आणि वजन कमी करण्यास मदत करते. याशिवाय यातील अनेक गुण हे सर्दी, खोकला आणि श्वसनासंबंधी अनेक आजारांशी लढण्यास मदत करतात. 

 

वजन कमी करण्यासाठी ओवा

पोटाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी ओव्याचा वापर जरूर करावा. ओव्यामुळे पचनक्रिया वेगवान होते तसेच गॅसेसचा त्रास दूर होतो. यासोबतच ओवा आणि तुळशीचा काढा तर उत्तम ड्रिंक मानले जाते. 

असे बनवा डिटॉक्स वॉटर

  1. रात्रभर एक चमचा ओवा एक ग्लास पाण्यात भिजत घाला.
  2. दुसऱ्या दिवशी सकाळी ४-५ तुळशीची पाने टाकून हे ओव्याचे पाणी उकळा
  3. पाणी एका ग्लासात गाळून घ्या. गरम अथवा थंड पिऊ शकता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी