Turmeric for Uric Acid Issue : शरीरात युरिक ॲसिड वाढलं तर हा पदार्थ खायलाच हवा, चुटकीसरशी मिळेल आराम

शरीरातील युरिक ॲसिडची पातळी वाढणं आरोग्यासाठी धोकादायक मानलं जातं. नियमित हळदीचा वापर करून ही पातळी नियंत्रणात ठेवता येते.

Turmeric for Uric Acid Issue
Copper for HealthCopper for Health : पाणी साठवण्यासाठी का वापरतात तांब्याची भांडी? जाणून घ्या फायदे  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • युरिक ॲसिडची पातळी वाढणं आरोग्यासाठी धोकादायक
  • हळदीचा वापर करून नियंत्रणात येते युरिक ॲसिडची पातळी
  • हळदीचे आरोग्याला होतात अनेक फायदे

Turmeric for Uric Acid Issue | हळद हा असा पदार्थ आहे, ज्याशिवाय भारतीयांचा आहारच पूर्ण होऊ शकत नाही. औषधी गुणधर्माबरोबरच पदार्थांची रुची वाढवणारा हा पदार्थ प्रत्येक भारतीय किचनमध्ये हमखास असतो. हळदीमुळे केवळ पदार्थांची चव वाढते असं नव्हे तर अन्नाचं पोषणमूल्यही त्यामुळे वाढतं. त्यामुळेच मसाल्यांच्या पदार्थात हळदीला विशेष महत्त्व आहे. ज्यांच्या शरीरात युरिक ॲसिडचं प्रमाण जास्त असतं, त्यांना नेहमी हळदीचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. हळद कशी खावी आणि किती प्रमाणात घ्यावी या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. 

अधिक वाचा - sugar control: शुगर कमी करण्यासाठी हे पान आहे प्रभावी; आजच करा डाएटमध्ये समावेश 

युरिक ॲसिडवर असं मिळवा नियंत्रण

  • युरिक ॲसिडची पातळी वाढली असेल तर दररोज हळद घातलेलं दूध प्या. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहायला मदत होते आणि पचनशक्तीतही सुधारणा होते. 
  • जर डायबेटिक्सच्या रुग्णांनी रोजच्या नाश्त्यात दूध, हळद आणि काळी मिरी एकत्र करुन प्या. रोजच्या रोज हे केलं तर तुमच्या साखरेची पातळी नियंत्रणात राहायला मदत होईल. 
  • कोलेस्टेरॉलची रक्तातील पातळी वाढल्यामुळेदेखील साखरेचं प्रमाण वाढण्याची शक्यता असते. हळदीत असणारे अँटि ऑक्सिडंट्स आणि अँटि इन्फ्लेमेटरी गुण कोलेस्टेरॉलला नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात. यामुळे मायग्रेनच्या त्रासातूनही सुटका होईल. पाण्यात हळद मिसळून ती पिणं नेहमीच गुणकारी ठरतं. 
  • कुठल्याही अवयवावर जी सूज येते, त्यावर अँटिऑक्सिडंट्स आणि अँटि इन्फ्लेमेटरी गुणधर्म असणाऱ्या पदार्थांचा चांगला अंमल होतो. या दृ्ष्टीने हळदीचं महत्त्व अनन्यासाधारण आहे. हळद खाण्याने शरीरावर येणारी सूज कमी होते. 

अधिक वाचा - Men Health Tips: बदलत्या जीवनशैलीमुळे पुरुषांमध्ये वंध्यव्याचे प्रमाण वाढले...हे ड्राय फ्रुट्स खाल्ल्यास वाढेल स्पर्म काउंट

  • हळदीमुळे रक्तस्राव नियंत्रणात राहतो. जखम होऊन रक्त वाहू लागलं, तर त्या ठिकाणी हळद लावली जाते. त्यामुळे रक्तप्रवाह थांबतो आणि रक्त वाहून जाण्याचं प्रमाण कमी होतं. कुठेही लचक आली तरी त्यावर हळदीचा लेप लावला जातो. त्यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते. 
  • हळदीला औषधी वनस्पती म्हणून मान्यता मिळालेली आहे. हळद ही जशी आरोग्यासाठी गुणकारी आहे, तसंच तिला सांस्कृतिक महत्त्वही आहे. प्रत्येक सणसमारंभात हळदीचा वापर केला जातो. हळदीकुंकू कार्यक्रमापासून ते लग्नापूर्वीच्या हळदी समारंभापर्यंत प्रत्येक सणात आणि उत्सवात हळदीचा सहभाग असतो. अशी ही गुणकारी हळद आहारात दैनंदिन वापरली, तर तिचे अनेक फायदे आरोग्याला होतात. 
  • अर्थात, तुम्हाला गंभीर स्वरुपाचा त्रास असेल तर कुठलाही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

अधिक वाचा - Copper for Health : पाणी साठवण्यासाठी का वापरतात तांब्याची भांडी? जाणून घ्या फायदे

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी