turmeric tea health benefits and know easy recipe in marathi : आपल्यापैकी अनेकजण गोड किंवा कमी गोड अथवा थोडे मीठ घातलेला चहा पिणे पसंत करत असतील. पण हे तिन्ही प्रकारचे चहा आरोग्यासाठी लाभदायी नाहीत. आरोग्यासाठी लाभदायी असा चहा प्यायचा असेल तर हळदीचा चहा प्यावा. हळदीचा चहा तब्येतीसाठी हितकारक आहे. हळदीचा चहा अतिशय गुणकारी आहे. हळदीचा चहा प्यायल्याने रोगप्रतिकारक क्षमतेत वाढ होते. थंडीच्या दिवसांत श्वास घेण्यास त्रास होणे, नाक गळणे, आवाज बसणे वा घसा बसणे, घसादुखी, घसा खवखवणे अशा स्वरुपाचे त्रास अनेकांना होतात. हळदीचा चहा पिणे हा या समस्यांवरील एक प्रभावी उपाय आहे.
Remedies to postpone periods: मासिक पाळी लांबवण्याचे नैसर्गिक उपाय, औषधांशिवाय होईल काम
Oral health tips: रोज ब्रश करताना किती टूथपेस्ट वापरावी? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
अर्धा चमचा हळद, 1 कप पाणी, थोडी काळी मिरी, थोडे काळे मीठ किंवा सैंधव, थोडा लिंबू रस
1 कप पाणी एका भांड्यात घेऊन गरम करा. पाणी पुरेसे गरम झाले की त्यात काळी मिरी आणि हळद टाकून ढवळा. पाणी आणखी गरम होऊ द्या. पाणी व्यवस्थित तापले की गॅस बंद करा. गरम पाणी गाळून घ्या. गाळलेल्या गरम पाण्यात काळे मीठ किंवा सैंधव आणि लिंबू रस टाकून ढवळा. आता हा चहा प्या.
हळदीचा चहा प्यायल्याने रोगप्रतिकारक क्षमतेत वाढ होईल. अनेक आजारांपासून संरक्षण होण्यास मदत होईल.
हळदीचा चहा आरोग्यासाठी लाभदायी गुणकारी आहे. थंडीच्या दिवसांत श्वास घेण्यास त्रास होणे, नाक गळणे, आवाज बसणे वा घसा बसणे, घसादुखी, घसा खवखवणे अशा स्वरुपाचे त्रास अनेकांना होतात. हळदीचा चहा पिणे हा या समस्यांवरील एक प्रभावी उपाय आहे. दररोज दिवसातून किमान एकदा हळदीचा चहा प्यायल्यास घशाशी संबंधित अनेक त्रासात आराम मिळतो. घशाची सूज कमी होण्यास मदत होते. डोक्याला झालेली दुखापत, हृदयविकार, अस्थमा अशा गंभीर समस्यांनी पीडित असलेल्यांसाठीही हळदीचा चहा गुणकारी आहे.
Disclaimer / डिस्क्लेमर : हा संकलित मजकूर आहे. Times Now Marathi याची जबाबदारी घेत नाही. प्रयोग करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे हिताचे आहे.