Corona Vaccine: ब्रिटनमध्ये Pfizer-BioNTech लसीला मंजुरी, पुढील आठवड्यापासून लसीकरण

Pfizer-BioNTech Covid-19 vaccine: कोरोनावर विकसित करण्यात आलेली Pfizer-BioNTech या लसीला ब्रिटनने मंजुरी दिली आहे आणि पुढील आठवड्यापासून लसीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे. 

corona vaccine update
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: PTI

थोडं पण कामाचं

  • फायझरच्या कोविड-१९ वरील लसीला मान्यता देणार ब्रिटन पहिला देश ठरला आहे 
  • ब्रिटनमध्ये कोरोनावर प्रभावी लसीच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा 
  • फायझरने विकसित केलेली कोरोनावरील लस सुरक्षित असल्याचा दावा 

Corona vaccine: कोरोनावर प्रभावी लस विकसित करण्याचे प्रयत्न सुरू असताना आता मोठी दिलासादायक बातमी आली आहे. कारण, Pfizer-BioNTechने विकसि केलेल्या कोरोनावरील लसीला ब्रिटनने मान्यता दिली आहे. इतकेच नाही तर पुढील आठवड्याच्या सुरुवातीपासून ब्रिटनमध्ये या लसीच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात येणार असल्याचंही जाहीर करण्यात आलं आहे. ब्रिटनने सांगितले की, आज इंडिपेंडेंट मेडिसिन अँण्ड हेल्थकेअर प्रोटक्ट्स रेगुलेटरी एजन्सी (एमएचआरए)ची शिफारस स्वीकरण्यात आली आहे. तसेच पुढील आठवड्यापासून ही लस संपूर्ण ब्रिटनमध्ये लसीकरणासाठी उपलब्ध होणार आहे. 

ब्रिटनने मान्यता दिल्यावर फायझरने म्हटलं की, कोविड-१९ विरुद्धच्या लढाईतील हा एक ऐतिहासिक क्षण आहे. सीईओ अल्बर्ट बोरला यांनी म्हटलं, ब्रिटनच्या नागरिकांच्या संरक्षणासाठी एमएचआरएने काळजीपूर्वक मुल्यांकन केलं आणि वेळेवर कारवाई करण्याच्या क्षमतेचे आम्ही कौतुक करतो.

या लसीमुळे आता कोरोना या प्राणघातक विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी ब्रिटनमधील लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. यूके ड्रग अँण्ड हेल्थ प्रोडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सी (एमएचआरए)ने अहवाल दिला आहे की, ही लस वापरासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. असा दावाही केला जात आहे की, फायझरची कोरोनावरील लस ही ९५ टक्क्यांपर्यंत प्रभावी आहे.

प्रसिद्ध अमेरिकन औषधनिर्माता कंपनी फायझर आणि जर्मन कंपनी बायोएनटेक यांनी मिळून कोरोनावरील ही लस विकसित केली आहे. कंपनीने नुकताच एक दावा केला होता की, त्यांची लस सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी प्रभावी आहे 

ब्रिटनची वॅक्सीन कमिटी निश्चित करेल की सर्वप्रथम लस कोणाला द्यायची, ज्यामध्ये आरोग्य सेवेतील कर्मचारी, वृद्ध आणि असे नागरिक जे वैद्यकीयदृष्ट्या कमजोर आहेत. Pfizer-BioNTech आणि बायोटेक कंपनी मॉरर्ना (Moderna) या दोघांनी विकसित केलेली कोरोनावरील लस ९० टक्क्यांहून अधिक प्रभावी असल्याची नोंद केली गेली आहे.

२०२१च्या अखेरपर्यंत ब्रिटनमध्ये ४ कोटी डोस उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. इतक्या डोसमुळे ब्रिटनमधील एक तृतीयांश लोकसंख्येचं लसीकरण होऊ शकते. 

ब्रिटनमध्ये आरोग्यमंत्री मॅट हॅन्कॉक यांनी गेल्या महिन्यात म्हटलं होतं की, नॅशनल हेल्थ सर्व्हिसेस (एनएचएस)कडून मान्यता मिळाल्यावर लसीकरणास तयार आहोत. एनएचएसकडे लसीकरणाचा व्यापक अनुभव आहे आि सर्व यंत्रणा सुद्धा उपलब्ध आहे. लस विकसीत करणाऱ्या बायोएनटेकच्या जर्मनी येथील केंद्रावर तसेच फायझरच्या बेल्जियम येथील यूनिटमध्ये लस तयार केली जाणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी