जागतिक गर्भनिरोधक दिन: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा खास संदेश

दरवर्षी २६ सप्टेंबर रोजी जागतिक गर्भनिरोधक दिनाच्या निमित्ताने जागरूकतेचा संदेश दिला जातो.

Unwanted 21 Days : spreads the message of “Pregnancy by choice”
जागतिक गर्भनिरोधक दिन: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा खास संदेश 
थोडं पण कामाचं
  • जागतिक गर्भनिरोधक दिन
  • अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा खास संदेश
  • गर्भधारणा ही 'नकळतपणे' नाही तर स्वेच्छेने झाली पाहिजे

मुंबईः दरवर्षी २६ सप्टेंबर रोजी जागतिक गर्भनिरोधक दिनाच्या निमित्ताने जागरूकतेचा संदेश दिला जातो. तसेच सर्व जोडपी आणि व्यक्तींमध्ये मुक्तपणे व जबाबदारीने त्यांच्या मुलांची संख्या व त्यामधील अंतराबाबत निर्णय घेण्याच्या अधिकारांबाबत जागरूकता निर्माण केली जाते. जागतिक गर्भनिरोधक दिनानिमित्त मराठी चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने विशेष व्हिडिओ संदेश दिला आहे.  सर्व सोशल मीडिया व्यासपीठांवर हा व्हिडिओ संदेश दाखवला जात आहे. Unwanted 21 Days : spreads the message of “Pregnancy by choice”

या व्हिडिओ संदेशामध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णी एका जोडप्याच्या त्यांच्या बाळाबाबत नियोजन करण्याच्या वैयक्तिक निवडीबाबत सांगत आहे. अभिनेत्री सांगते, ज्याप्रमाणे व्यक्ती त्यांचा आहार, कपडे, व्यावसायिक जीवन व मित्र यांची स्वत:ची आवड व पसंतीनुसार निवड करतात, अगदी त्याप्रमाणेच त्यांना कुटुंब नियोजन करण्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आहे. गर्भधारणा ही 'नकळतपणे' नाही तर स्वेच्छेने झाली पाहिजे.

'अनवॉन्टेड – २१ डेज टॅब' ही ओरल गर्भनिरोधक गोळी आहे. 'अनवॉन्टेड – २१ डेज टॅब' ही गर्भधारणा उशिराने करण्याची किंवा पुढील बाळामध्ये अंतर ठेवण्याची इच्छा असलेल्या महिलांसाठी सुलभ, गुणकारी व सुरक्षित प्रतिवर्ती गर्भनिरोधक गोळी आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी