Uric Acid Home Remedies: सांधेदुखीसाठी ही आहेत उत्तम घरगुती उपाय, सर्व वेदना होतील दूर!     

तब्येत पाणी
Updated Mar 27, 2023 | 21:48 IST | टाइम्स नाऊ मराठी

Uric Acid Home Remedies: युरीक ऍसिडच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी रोजच्या आहारात जर या गोष्टी घेतल्यास, त्यांना अनेक फायदे मिळू शकतात. शिवाय आरोग्यासंबंधित समस्यापासूनही आराम मिळतो. युरिक ऍसिड कमी करण्याच्या घरगुती उपयांबद्दल जाणून घेऊयात- 

युरीक एसिड वर घरगुती उपाय
सांधीरोग समस्या दिवसागणिक वाढत चालली आहे   |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • सांधीरोग समस्या दिवसागणिक वाढत चालली आहे
  • या समस्येवर काही घरगुती उपचार सहज उपलब्ध होऊ शकतात.
  • जीवनशैलीत बदल करून युरिक ऍसिड नियंत्रित करता येते का?

Uric Acid Home Remedies in Marathi: युरीक ऍसिडची समस्या असलेल्या लोकांमध्ये सांधीरोगाचा मोठा त्रास असतो. मात्र आता ही समस्या तरुण वर्गात देखील मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. त्यामुळे युरीक ऍसिडच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांना अनेक प्रकारची सावधानता बाळगणे खूप गरजेचे असते. आम्ही तुम्हाला युरीक ऍसिड सहज कसे कमी करता येतील याबद्दल काही महत्वाचे घरगुती टिप्स सांगणार आहोत. ज्याद्वारे तुमच्या दैनंदिन जीवनावर या समस्यांचा अधिक प्रभाव पडणार नाही. 

अधिक वाचा : ​IIT Mumbai मधील विद्यार्थ्याच्या आत्महत्येला नवे वळण, पोलिसांना मिळाली चिठ्ठी

कोरफडीचा गर

Health Line च्या मते यूरिक ऍसिडची समस्या असलेल्या लोकांना सांधे दुखी आणि सुजेच्या समस्यांपासून आराम मिळण्यासाठी त्या जागेवर कोरफडीच्या गराचा लेप लावावा. कोरफडीचे गुणधर्म संधीवाताच्या समस्यांपासून काही प्रमाणात आराम देते.

लिंबू पाणी 

युरीक ऍसिड नियंत्रित करण्यासाठी लिंबू पाणी खूप फायदेशीर आहे. त्यात एंटीऑक्सीडेंट आणि क जीवनसत्वाची भरपूर मात्रा आहे, जे युरीक ऍसिडची पातळी नियंत्रित करतात. तसेच अन्य समस्यांवर देखील लिंबू पाणी गुणकारी आहे. 

आले 

आल्यामध्ये  एंटीऑक्सीडेंट चे घटक मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे रोजच्या आहारात आल्याचा समावेश केल्यास युरिक ऍसिड सहजपणे नियंत्रित केले जाऊ शकते. 

अधिक वाचा : ​वीज दरवाढीचा शॉक?प्रति युनिट अडीच रुपयांनी महागण्याची शक्यता

हिरव्या भाज्या Which green vegetables reduce uric acid

हिरव्या भाज्यांचा नियमित आहारात समावेश केल्यास आरोग्याशी संबंधित अनेक आजारांपासून तुमचा बचाव होऊ शकतो. तसेच युरिक ऍसिडची पातळी देखील करण्यास मदत होते.  म्हणूनच रोज सकाळी हिरव्या भाज्यांचे सेवन करणे केव्हाही योग्यच.

सांधीरोग (गाऊट) दूर करण्यासाठी सुपर फुड्स 

  1. चेरी : चेरीमध्ये अँथोसायनिन्स आणि एस्कॉर्बेट सारख्या प्रभावी अँटिऑक्सिडेंट आणि दाहक विरोधी गुणधर्म असतात,  ज्यामुळे गाऊट अटॅकचा धोका कमी होतो. बोस्टन युनिव्हर्सिटीने केलेल्या अभ्यासानुसार, सांधीरोग असलेल्या व्यक्तीने 2 दिवसांपेक्षा जास्त दिवस चेरीचे सेवन केले होते, त्यांच्यात  गाऊट अटॅकचा धोका 35% इतका कमी झालेला दिसला.  संधीवाताचा धोका कमी करण्यासाठी, दररोज तीन सर्व्हिंग चेरी किंवा चेरीचा अर्क खाण्याचा सल्ला डॉक्टरांमार्फत दिला जातो. 
  2. पपई : पपईमध्ये पपेन आणि काइमोपेन एन्झाईम नामक तत्व असतात जे जळजळ कमी करण्यास आणि सांध्यातील सूज कमी करण्यास मदत करतात. तसेच शरीरातील अतिरिक्त युरीक ऍसिड कमी करण्यास सहाय्य करतात. या व्यतिरिक्त, त्यात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स बीटा-कॅरोटीन आणि व्हिटॅमिन सी असतात जे जळजळ कमी करण्यास आणि सांधेदुखी आणि सांध्यावरील सूज कमी करण्यास मदत करतात.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी