पाच पदार्थ खा, पोटाचे विकार कायमचे दूर करा

Us Based Nutritionist Reveals 5 Herbs That Support Stomach Acid And Beat Constipation, Bloating And Nausea : अमेरिकेतील न्यूट्रिशनिस्ट एरिन केन्नी (Erin Kenney) यांच्या मते पाच पदार्थ नियमित आणि मर्यादीत प्रमाणात खाल्ल्यास पोटाचे विकार दूर होऊ शकतात. 

5 Herbs That Support Stomach Acid And Beat Constipation, Bloating And Nausea
पाच पदार्थ खा, पोटाचे विकार कायमचे दूर करा  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • पाच पदार्थ खा, पोटाचे विकार कायमचे दूर करा
  • अरुगुला किंवा गार्गीरची पाने, लसूण, आलं, नारळाचे खोबरे आणि कोको आरोग्यासाठी लाभदायी

Us Based Nutritionist Reveals 5 Herbs That Support Stomach Acid And Beat Constipation, Bloating And Nausea : आपल्याला कमी भूक लागते का?, पोटफुगीचा त्रास होतो का?, अपचनाचा त्रास होतो का?, बद्धकोष्ठतेचा त्रास होतो का?, पित्ताचा अर्थात अॅसिडिटीचा त्रास होतो का?  यापैकी किमान एका प्रश्नाचे उत्तर जरी हो असे असेल तर आपण पोटाशी संबंधित विकाराने त्रस्त आहात. या परिस्थितीत आपण पुढे जरूर वाचा.... 

अमेरिकेत झालेल्या संशोधनानुसार पोटाच्या विकारांसाठी वेगवेगळी कारणे असू शकतात. पण पोटातील अॅसिड हे एक प्रमुख कारण आहे. या अॅसिडचे प्रमाण कमी किंवा जास्त झाल्यास पोटाचे विकार त्रास देतात. वैद्यकीय भाषेत याला हायपोक्लोरहायड्रिया (Hypochlorhydria) असे म्हणतात. पोटात अॅसिड वा गॅस्ट्रिक अॅसिड पदार्थांच्या पचनासाठी आवश्यक आहे. पण त्याचे प्रमाण कमी किंवा जास्त झाल्यास त्रास होऊ शकतो. खाल्लेल्या अन्नातून शरीराला आवश्क पोषक घटक मिळणे आवश्यक आहे. पण हे होत नसेल तर पोटाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात आणि वेळीच त्या समस्या सोडविल्या नाहीत तर त्या जीवघेण्याही ठरू शकतात.

अमेरिकेतील न्यूट्रिशनिस्ट एरिन केन्नी (Erin Kenney) यांच्या मते वाढता ताणतणाव आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यांच्यामुळे पोटातील अॅसिडचे प्रमाण कमी वा जास्त होऊन पोटाचे विकार होण्याचा धोका जास्त आहे. फास्टफूड, जंकफूड, मैद्याचे पदार्थ, बेकरीत तयार होणारे पदार्थ, साखर, साखरेचे पदार्थ, तेलकट पदार्थ यांच्या खाण्यातून तसेच औषधांचा अतिरेक, अल्कोहोलचे सेवन, धूम्रपान किंवा इतर एखादे व्यसन यामुळे पोटातील अॅसिडचे प्रमाण कमी वा जास्त होऊन पोटाचे विकार होण्याचाही धोका आहे.

पोटाचे विकार झाल्यामुळे संबंधित व्यक्ती अस्वस्थ होते. त्या व्यक्तीला कामावर लक्ष केंद्रीत करणे कठीण होते. संबंधित व्यक्तीच्या केसांच्या आणि नखांच्या वाढीवर परिणाम होतो. संबंधित व्यक्तीच्या शरीरातील इतर महत्त्वाच्या अवयवांपैकी किमान एखाद्या अवयवाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. शरीर नव्या व्याधींनी त्रस्त होऊ शकते. थोडक्यात पोटाचे विकार नव्या गंभीर समस्यांचे कारण ठरू शकतात. यामुळे पोटाचे विकार लवकर बरे होणे आवश्यक आहे.

अमेरिकेतील न्यूट्रिशनिस्ट एरिन केन्नी (Erin Kenney) यांच्या मते पाच पदार्थ नियमित आणि मर्यादीत प्रमाणात खाल्ल्यास पोटाचे विकार दूर होऊ शकतात. 

तब्येत पाणी । वेबस्टोरी : आरोग्य

१. अरुगुला किंवा गार्गीरची पाने

अरुगुला किंवा गार्गीरच्या १०० ग्रॅम पानांमध्ये ९१.७१ ग्रॅम पाणी आणि १.६ ग्रॅम फायबर असते. यामुळे अरुगुला किंवा गार्गीरची पानं चावून खाल्ल्यास ती अन्न पचन होण्यासाठी मदत करतात. तसेच अरुगुला किंवा गार्गीरच्या पानांतील घटकांमुळे कॅन्सर, कोलायटिस, डायवर्टीकुलिटिस अशा आजारांचा त्रास कमी होतो. अरुगुला किंवा गार्गीरची पाने प्रामुख्याने सॅलड तयार करण्यासाठी वापरली जातात.

२. लसूण

लसूण एक सुपरफूड आहे. शरीराची सूज कमी करण्यासाठी, शरीरातील अपायकारक कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी, रक्तदाबाचा त्रास कमी करण्यासाठी, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी, वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी लसूण मदत करते. पोटाशी संबंधित अनेक विकार दूर करण्यासाठी लसूण मदत करते. 

३. आले किंवा आलं

आल्यात अँटीऑक्सिडंट असल्यामुळे हा पदार्थ पोटाशी संबंधित अनेक विकार दूर करण्यासाठी लाभदायी ठरतो. 

४. नारळाचे खोबरे

नारळाच्या खोबऱ्यात अँटीहिस्टामाइन, अँटी इन्फेक्शन, अँटीसेप्टिक गुण आहेत. मर्यादीत प्रमाणात नाराळाचे खोबरे खाल्ल्यास रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. नारळाचे खोबरे पोटाचे विकार दूर करण्यास मदत करते. 

५. कोको

कोकोधील फ्लेवोनोइड्स पोटाचे विकार दूर करण्यास मदत करतात.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी