Weight Loss:  १३७ किलोच्या तरुणीने घटवले ६० किलो वजन, जाणून घ्या कसे केला फॅट टू फिट प्रवास 

वजन कमी करण्यासाठी लोक अनेक उपाय करतात. मॉर्निंग वॉकला जातात, व्यायाम करतात, डाएट करतात. पण प्रत्येकाला हवा तसा रिझल्ट मिळतोच असे नाही. परंतु एका तरुणीचे वजन तब्बल १३७ किलो होते. व्यायाम आणि योग्य डाएट करून तिने तब्बल ६० किलो वजन घटवले आहे. तरुणीच्या आयुष्यात एक घटना घडली आणि तिने फॅट टू फिट असा प्रवास केला.

lauren acton weight loss
१३७ किलोच्या तरुणीने घटवले ६० किलो वजन  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • एका तरुणीचे वजन तब्बल १३७ किलो होते.
  • व्यायाम आणि योग्य डाएट करून तिने तब्बल ६० किलो वजन घटवले आहे.
  • तरुणीच्या आयुष्यात एक घटना घडली आणि तिने फॅट टू फिट असा प्रवास केला.

Weight Loss: वजन कमी करण्यासाठी लोक अनेक उपाय करतात. मॉर्निंग वॉकला जातात, व्यायाम करतात, डाएट करतात. पण प्रत्येकाला हवा तसा रिझल्ट मिळतोच असे नाही. परंतु एका तरुणीचे वजन तब्बल १३७ किलो होते. व्यायाम आणि योग्य डाएट करून तिने तब्बल ६० किलो वजन घटवले आहे. तरुणीच्या आयुष्यात एक घटना घडली आणि तिने फॅट टू फिट असा प्रवास केला.  (usa girl lauren acton loss weight 60 kilo in three years by following simple way)

अमेरिकेत राहणारी लॉरेन ऍक्शन हिचे वय ३० वर्ष आहे. तीन वर्षांपूर्वीत लॉरेनचे वजन १३७ किलो इतके होते. लॉरेन आधीच मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हायकोलेस्ट्रॉलचाही त्रास होत होता. कुठलेही काम केले की लगेच थकून जायचे. अवघ्या २७ वर्षी आपल्याला लगेच थकवा येत आहे असे लॉरेनच्या लक्षात आले तसेच आपले वजन नियंत्रणाबाहेर वाढत याची जाणीवही लॉरेनला झाली. तेव्हा तिने आपले वजन कमी करण्याचे ठरवले. अखेर लॉरेनने निश्चय करून तीन वर्षांत ६० किलो वजन कमी केले. 

तीन वर्षांपूर्वी लॉरेन जेव्हा २७ वर्षाची होती तेव्हा ती आपल्या मित्र मैत्रिणींसोबत कॅम्पिंगसाठी गेली होती. तेव्हा काही फिजिकल ऍक्टिव्हिटी तिला जमले नाही. कारण लॉरेनचे वजन खूप वाढले होते. तेव्हा २०१९ च्या हिवाळ्यापासून तिने वजन कमी करण्यास सुरूवात केली.  


फिट टू फिटचा प्रवास

लॉरेनने सांगितले की तेव्हा मी फक्त २७ वर्षांची होती. माझे वय कमी असूनही मला सातत्याने थकवा जाणवायचा असे लॉरेनने सांगितले. तसेच यामुळे आपल्या कामावरही परिणाम होत होता असेहे लॉरेनने यावेळी सांगितले. नंतर लॉरेनने यासंबंधी डॉक्टरची भेट घेतली. सर्जरी करून लॉरेनला वजन कमी करायचे नव्हते. तेव्हा डॉक्टरांनी तिला उपचार सांगितले. लॉरेनने उपचार, डाएट आणि व्यायाम सुरू केला. तेव्हापासून लॉरेनला मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवला नाही. या तीन वर्षांत लॉरेनने तब्बल ६३ किलो वजन कमी केले आहे. 


असे केले वजन कमी

लॉरेनने सांगितले की वजन कमी करण्यासाठी ती आठवड्यातून चार वेळा जिममध्ये जात होती. हेल्दी डाएट फॉलो करत होती. योग्य डाएटसाठी तिने इंटरनेटवर माहिती शोधली. जिममध्ये ती तासनतास व्यायाम करून घाम गाळायची. लॉरेनने सांगितले की व्यायामपेक्षा डाएट फॉलो करणे जास्त कठीण होते. कारण तिला खायला खूप आवडतं. पण तिने आपल्या आवडीचे पदार्थ बाजूला ठेवले आणि नाश्त्यात प्रोटीन शेक, कॉफी आणि फळांचे सेवन केले. तसेच अंडी, एवोकाडे आणि मध लावलेले टोस्ट ब्रेड खल्ले. भूक लागल्यानंतर लॉरेन प्रोटीन शेक प्यायची. त्यानंतर हळू हळू आपले वजन कमी झाले असे लॉरेनने सांगितले. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी