Weight Loss: हिवाळ्यात व्यायाम होत नाहीए, तर मग हा उपाय करा

तब्येत पाणी
Updated Dec 20, 2019 | 17:33 IST | टाइम्स नाऊ हिंदी

आलं औषधीयुक्त गुणांनी परिपूर्ण आहे. आपल्या सर्वांनाच हे माहितीय पण आल्यानं आपलं वजन कमी होतं, हे सांगितलं तर. हो हे खरंय जाणून घ्या कसं होतं आल्यानं वजन कमी...

Weightloss
आल्याचं पाणी प्या, हिवाळ्यात वजन कमी करा 

थोडं पण कामाचं

  • आल्याचं पाणी पाचनशक्ती वाढवतं
  • आल्याचं पाणी पचनक्रिया सुधारतं
  • दररोज ४ ग्रामच्या वर आल्याचा वापर करू नये

Weight Loss Tips in winter: सध्या वजन कमी करणं हा सर्वांसाठीच एक महत्त्वाचा मुद्दा बनलेला दिसतो. वजन कमी करण्यासाठी विविध उपाय अनेक जण करत असतात. मात्र आपल्या स्वयंपाक घरात ठेवलेलं आलं शरीराची चरबी वितळवते, असं सांगितलं तर आपला विश्वास बसणार नाही. पण आल्याचं पाणी प्यायल्यानं हा चमत्कार घडू शकतो.

आलं आयुर्वेदिक गुणांनी परिपूर्ण आहे आणि जेव्हा कोमट पाण्यासोबत आपण आल्याचं सेवन करतो तेव्हा याचे गुण अधिक पटीनं वाढतात. वजन कमी करणाऱ्यांसाठी हा उपाय एखाद्या चमत्कारासारखा काम करतो. जर आपण एकाच ठिकाणी खूर्चीवर खूप वेळ बसून राहत असाल तर आपण आल्याचं पाणी नियमित पणे प्यावं, खूप फायदा होईल.

जाणून घ्या आल्याच्या पाण्याचं वैशिष्ट्य...

आल्याचं पाणी अशाप्रकारे करतं वजन कमी

आल्याची एक विशिष्ट अशी चव असते आणि हेच कारण आहे की, चहात घातल्यानंतर आलं चहाची चव अधिक वाढवतो. मात्र जर आपल्याला वाढलेली चरबी कमी करायची असेल तर आल्याचं पाणी आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं. आल्याची प्रकृती ही उष्ण आहे आणि यात असलेले तत्त्व हे फॅट बर्न करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

अपचनापासून बचाव करतं

आल्यामध्ये असे गुण असतात जे शरीराच्या अनेक समस्या दूर करतात. अपचन झाल्यास आल्याचा रस खूप फायदेशीर ठरतो. एव्हढंच नव्हे तर आल्याचा रस, लिबांचा रस आणि साखर मिसळून प्यायल्यानं पोटदुखी बरी होते. आल्यामध्ये अँटी इंफ्लेमेटरी गुण असतात.

खूप वेळ पोट भरलेलं राहतं

आल्यामध्ये एक असा गुण असतो, ज्यामुळे आपलं पोट खूप वेळपर्यंत भरलेलं राहतं. अशातच जर आपण वजन कमी करू इच्छित असाल तर आपल्यासाठी हा एक चांगला पर्याय ठरतो. भूकेवर नियंत्रण ठेवण्यासोबतच ब्लड शुगर पण कंट्रोलमध्ये ठेवण्याचं काम आलं करतं.

मेटॅबॉलिजम वाढवतं

जर आपली पाचनशक्ती स्लो असेल तर आल्याचं पाणी नक्की प्या. यामुळे पाचनक्रिया वाढते. यासाठी दररोज सकाळी सर्वात पहिले आल्याचं पाणी पिणं आवश्यक आहे. त्यामुळे आपली पाचनशक्ती वाढेल.

असं तयार करा आल्याचं पाणी

एक ग्लास पाणी उकळून घ्या, यात अर्धा चमचा किसलेलं आलं घाला.

कमीतकमी १० मिनीटं हे पाणी उकळून घ्यावं.

आता हे पाणी गाळून घ्या आणि ते कोमट झाल्यानंतर प्या.

जर आपल्याला पाणी चवीला कडू लागत असेल तर आपण यात लिंबाचा रस मिसळू शकता.

यूनिव्हर्सिटी ऑफ मॅरीलँड मेडिकल सेंटरच्या रिसर्चमध्ये हे स्पष्ट झालंय की, दररोज ४ ग्राम किंवा त्याहून अधिक आल्याचं सेवन करू नये. तसंच दोन वर्षांखालील मुलांनी आणि गर्भवती महिलांनी दररोज १ ग्राम पेक्षा जास्त आल्याचं सेवन करू नये.

डिस्क्लेमर: वरील बातमीत दिलेल्या टिप्स या सामान्य माहितीच्या आधारे सांगितल्या गेल्या आहेत. याचा उपयोग करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी