Face Pack Tips : चेहऱ्यावरचे डाग नाहीसे करून सुंदर त्वचा हवी आहे? मग हा सोप्पा घरगुती उपाय करा

Skin Care : अलीकडच्या काळात, प्रदूषण, धूळ, ऊन यासारख्या अनेक कारणांमुळे चेहऱ्याची त्वचा खराब होते. अनेकदा चेहऱ्यावर डाग पडतात, टॅनिंगच्या (Tanning) समस्येला तोंड द्यावे लागते. डाग नसलेली सुंदर त्वचा प्रत्येकालच हवी असते. वायू प्रदूषणामुळे (Air Pollution) त्वचेवर अकाली सुरकुत्या आणि वृद्धत्व दिसून येते. तुम्ही बेसन आणि व्हिटॅमिन-ई कॅप्सूलपासून बनवलेला फेस पॅक वापरून मिळवा सुंदर त्वचा.

face pack of gram flour and vitamin E capsules
बेसन आणि व्हिटॅमिन ईचा फेसपॅक 
थोडं पण कामाचं
  • प्रदूषणाचा त्वचेवर विपरित परिणाम
  • सुंदर त्वचेसाठी काळजी घेणे आवश्यक
  • त्वचा सुंदर करण्यासाठीचा घरगुती उपाय

Benefits of besan and vitamin E face pack: नवी दिल्ली : चेहऱ्याच्या त्वचेची खास काळजी घेणे (Skin Care)आवश्यक असते. त्वचा सुंदर असेल तर चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येते. अलीकडच्या काळात, प्रदूषण, धूळ, ऊन यासारख्या अनेक कारणांमुळे चेहऱ्याची त्वचा खराब होते. अनेकदा चेहऱ्यावर डाग पडतात, टॅनिंगच्या (Tanning) समस्येला तोंड द्यावे लागते. डाग नसलेली सुंदर त्वचा प्रत्येकालच हवी असते. वायू प्रदूषण आपल्या चेहऱ्याच्या त्वचेवर विपरित परिणाम होतात. वायू प्रदूषणामुळे (Air Pollution) त्वचेवर अकाली सुरकुत्या आणि वृद्धत्व दिसून येते. यासोबतच प्रदूषणामुळे त्वचेची आर्द्रताही संपते. अशा परिस्थितीत, त्वचेमध्ये अंतर्गत तेल तयार होऊ लागते, ज्यामुळे त्वचेवर मुरुम, कोंडा, एक्जिमा सारख्या समस्या उद्भवू शकतात. जर तुम्हाला वायू प्रदूषणापासून त्वचेचे संरक्षण करायचे असेल तर तुम्ही बेसन आणि व्हिटॅमिन-ई कॅप्सूलपासून बनवलेला फेस पॅक (Face Pack) वापरू शकता. बेसन आणि व्हिटॅमिन-ई कॅप्सूलमधील पोषक घटक त्वचेला आतून पोषण देतात आणि हवेच्या प्रदूषणामुळे त्वचेवर होणारे परिणाम कमी करण्यास मदत करतात. बेसन आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा वापर करून फेस पॅक कसा बनवायचा ते जाणून घेऊया. (Use gram flour and vitamin E capsules face pack to get beautiful skin)

अधिक वाचा : T20 World Cup 2022: वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचला हा पहिला संघ

बेसन आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा फेस पॅक बनवायची पद्धत - (How to make a face pack of gram flour and vitamin E capsules)

साहित्य
बेसन - 2 ते 3 चमचे
व्हिटॅमिन ई कॅप्सूल - 2
गुलाब पाणी - आवश्यकतेनुसार
हळद - चिमूटभर

सर्व प्रथम एका भांड्यात व्हिटॅमिन ई कॅप्सूलमधून त्याचे जेल काढा. आता या जेलमध्ये 2 चमचे बेसन, हळद पावडर घाला आणि हे चांगले मिसळा. बेसनाच्या पिठात व्हिटॅमिन ई जेल मिसळल्यावर त्यात गुलाबजल टाकायला विसरू नका. गुलाबजल टाकून एक छान गुळगुळीत पेस्ट तयार करा. आता टोनरच्या मदतीने चेहरा स्वच्छ करा. त्यानंतर हा फेस पॅक चेहऱ्यावर लावा. लावल्यानंतर हा फेस पॅक 15 ते 20 मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या. फेसपॅक सुकल्यावर चेहरा साध्या पाण्याने धुवून टाका. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाण्याने चेहरा धुतल्यानंतर त्याला मॉइश्चरायझ करायला विसरू नका. म्हणजे एकदा मॉइस्चरायझर वापरा.  बेसन आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा फेस पॅक आठवड्यातून दोनदा लावल्याने तुमच्या चेहऱ्याची त्वचा तजेलदार होईल. 

अधिक वाचा : Sehar Shinwari: पाक अभिनेत्री झिम्बाब्वेच्या खेळाडूसोबत करणार लग्न, पण मोबदल्यात तिला हवी 'ही' गोष्ट

अधिक वाचा :  T20 World Cup: विराट कोहलीच्या शत्रूंना रोहितने दिले सडेतोड उत्तर

या फेस पॅकचे फायदे

  1. बेसन आणि व्हिटॅमिन ई मध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. त्यामुळे हे पोषक घटक त्वचेला आतून पोषण देतात. यामुळे त्वचा निरोगी राहते. 
  2. बेसन आणि व्हिटॅमिन ईचा फेस पॅक लावल्याने चेहऱ्यावरील मुरुम, डाग आणि पिंपल्सच्या समस्या दूर होतात.
  3. बेसन आणि व्हिटॅमिन ई चा वापर करून तयार केलेला फेस पॅक चेहऱ्यावरील मृत पेशी काढून टाकण्याचे काम करतो. परिणामी तुमच्या चेहऱ्याचा रंगदेखील उजळ होतो. 
  4. याशिवाय बेसन आणि व्हिटॅमिन ई त्वचेवरील अतिरिक्त तेल काढून टाकतात. यामुळे चेहरा स्वच्छ होतो. केमिकलयुक्त फेसवॉश आणि साबण वापरल्यावर त्वचा कोरडी होते. या फेसपॅकमुळे तसे होत नाही. बेसन आणि व्हिटॅमिन ई नैसर्गिकरित्या त्वचा निरोगी बनवण्यासाठी फायद्याचे आहे.
  5. तुम्हालाही सुंदर आणि चमकणारी त्वचा हवी असल्यास हा फेस पॅक वापरा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी