Weight loss tips in Marathi : वजन कमी करण्यासाठी वापरा जिरा आणि पहा फरक

वजन कमी करण्यासाठी जिर्‍याचे पाणी फायदेशीर आहे. फक्त वजन कमी करण्यासाठीच नव्हे तर जिर्‍यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि तुमचे शरीत आतून स्वच्छ होतं. सकाळी सकाळी जिरा आणि हळदीचे पाणी प्यायल्यास पचनशक्ती मजबूत होते तसेच पोटातील चरबीही कमी होते.

weight loss tips in marathi
वजन कमी करण्याच्या टिप्स  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • वजन कमी करण्यासाठी जिर्‍याचे पाणी फायदेशीर आहे.
  • फक्त वजन कमी करण्यासाठीच नव्हे तर जिर्‍यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात
  • सकाळी सकाळी जिरा आणि हळदीचे पाणी प्यायल्यास पचनशक्ती मजबूत होते

Weight loss tips in Marathi मुंबई : वजन कमी करण्यासाठी जिर्‍याचे पाणी (Jeera Water) फायदेशीर आहे. फक्त वजन कमी (Weight loss) करण्यासाठीच नव्हे तर जिर्‍यामुळे शरीरातील विषारी पदार्थ(toxic components)  बाहेर पडतात आणि तुमचे शरीत आतून स्वच्छ होतं. सकाळी सकाळी जिरा आणि हळदीचे पाणी प्यायल्यास पचनशक्ती मजबूत होते तसेच पोटातील चरबीही कमी होते. (use jeera drink for weight loss belly fat burned weight loss tips in marathi)

अधिक वाचा : पावसाळ्यात वजन कमी करण्यासाठी प्या लिंबू आणि मधाचा काढा, घरी तयार करण्याची सोपी पद्धत

वजन कमी करण्यासाठी जिर्‍याच्या पाण्याचा सोपा आणि लोकप्रिय उपाय आहे. यामुळे फक्त वजन कमी होत नाही तर पोटातील चरबी वितळते आणि बेढब दिसणारे शरीराला आकार मिळतो. जिर्‍यामुळे वजन कसे कमी होते जाणून घेऊया सविस्तर

अधिक वाचा : Weight Loss Diet Chart: आहार चार्ट: हा डाएट चार्ट, 7 दिवसात कमी होईल 3-4 किलो वजन

जाणून घ्या तुमच्या आरोग्य आणि वजन कमी करण्यासाठी जिरे कसे फायदेशीर आहे.

लो कॅलरी जिरे

एक चमचा जिर्‍यात जवळपास २० ते २१ ग्राम मात्रा असते. यात फक्त ८ कॅलरी असते. त्यामुळे जिर्‍याचे पाणी प्यायल्याने तुमच्या शरीरात अतिरिक्त कॅलरी जात नाहीत. आपल्या हिरव्या भाज्यांमध्ये जिरे पावडार घाला, त्यामुळे लो कॅलरी अन्न तुमच्य पोटात जाईल आणि वजन वाढणार नाही.

अधिक वाचा : Weight Loss Tips : एका आठवड्यात होईल वजन कमी ? Weight Loss Coach ने सांगितला सर्वात सोपा उपाय

शरीरातील विषारी पदार्थ पडतात बाहेर

जिर्‍यात एल्डिहाईड, थायमोल आणि फॉस्फरस सारखे घटक असतात, त्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. वजन कमी करताना जिर्‍याचे पाण्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. शरीर आतून स्वच्छ ठेवण्यासाठी आणि पचनशक्ती मजबूत करण्यासाठी दिवसाची सुरूवात जिरा हळद पाण्याने करा.

अधिक वाचा : Weight Loss Tips in Marathi : Weight Loss करताय? वजन कमी करण्यासाठी हे पाच पदार्थ खा आणि पहा फरक

जिर्‍यामुळे गॅस होत नाही 

जिर्‍यात फायबर असतं. त्यामुळे गॅस होत नाही. जेवल्यानंतर किंवा पचायला  जड असलेल पदार्थ खाल्ल्यानंतर आवर्जून जिर्‍याचे पाणी प्या त्यामुळे नक्की फरक पडेल.

अधिक वाचा : Weight Loss Tips : व्यायाम करायला मिळत नाही वेळ? ब्रश करताना करा Work Out आणि पहा फरक

पचनशक्ती होते मजबूत 

जिर्‍यात मोठ्या प्रमाणात खनिज असता. त्यामुळे पचनशक्ती मजबूत होते. जिर्‍यामुळे कॅलरी बर्न होतात. जिर्‍याचे पाणी आणखी परिणामकारक करण्यासाठी त्यात थोडेसे लिंबू पाणी मिक्स करा.

अधिक वाचा : Lemon-honey decoction: पावसाळ्यात लिंबू-मधाच्या काढ्याने कमी करा वजन, असा बनवा घरच्या घरी

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

जिर्‍यात विटामिन सी, लोह आणि फायबर असतं. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. जिर्‍याच्या पाण्याचे नियमित सेवन केल्यास सर्दी खोकला होत नाही आणि तुमचे आरोग्य आणखी चांगले होते.

(विशेष सूचना : सदर माहिती उपलब्ध माहितीवरून संकलित करण्यात आली आहे. टाइम्स नाऊ मराठी या माहितीला दुजोरा देत नाही. कुठलाही प्रयोग करण्यापूर्वी डॉक्टर किंवा तज्ञांचा सल्ला घ्यावा.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी