Face Beauty Tips: या 3 नैसर्गिक गोष्टींमुळे तुमच्या चेहऱ्यावर येईल चमक...दिसाल तरुण आणि सुंदर

Health Tips : आपला चेहरा हा व्यक्तिमत्वाचा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळे आपण सुंदर दिसावे, आपल्या चेहऱ्यावर प्रसन्नता असावी, आपली त्वचा तजेलदार (Beautiful Skin) असावी असे प्रत्येकालाच वाटते. आपल्या सर्वांना त्यांचा चेहरा नेहमी तरुण दिसावा आणि चेहऱ्यावर डाग, मुरुम आणि सुरकुत्या पडू नयेत अशी इच्छा असते. खासकरून महिला या गोष्टींबाबत खूप जागरूक असतात. आजकाल व्यस्त जीवनशैली (Lifestyle) आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आपल्या चेहऱ्यावरील त्वचेवर खूप विपरित परिणाम होतो आणि सौंदर्य जाते.

Skin Tips
सुंदर त्वचेसाठीच्या टिप्स 
थोडं पण कामाचं
  • चेहऱ्यावरील त्वचा सुंदर आणि तजेलदार करण्याचे उपाय
  • आपला चेहरा हा व्यक्तिमत्वाचा सर्वात महत्त्वाचा भाग असतो
  • आजकाल व्यस्त जीवनशैली (Lifestyle) आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आपल्या चेहऱ्यावरील त्वचेवर खूप विपरित परिणाम होतो आणि सौंदर्य जाते

Beauty Tips : नवी दिल्ली : आपला चेहरा हा व्यक्तिमत्वाचा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळे आपण सुंदर दिसावे, आपल्या चेहऱ्यावर प्रसन्नता असावी, आपली त्वचा तजेलदार (Beautiful Skin) असावी असे प्रत्येकालाच वाटते. आपल्या सर्वांना त्यांचा चेहरा नेहमी तरुण दिसावा आणि चेहऱ्यावर डाग, मुरुम आणि सुरकुत्या पडू नयेत अशी इच्छा असते. खासकरून महिला या गोष्टींबाबत खूप जागरूक असतात. आजकाल व्यस्त जीवनशैली (Lifestyle) आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आपल्या चेहऱ्यावरील त्वचेवर खूप विपरित परिणाम होतो आणि सौंदर्य जाते. चुकीच्या आहारामुळे आणि जीवनशैलीमुळे डिटॉक्सिफिकेशन (Detoxifaction) शक्य होत नाही आणि आपल्या शरीरात टॉक्सिन्स जमा होऊ लागतात. परिणामी चेहऱ्यावरील त्वचेचे सौंदर्य बिघडू शकते. त्वचा तज्ज्ञ म्हणतात की आपण आपल्या रोजच्या आहारात अशा गोष्टींचा समावेश केला पाहिजे ज्या तुमच्या त्वचेसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. काही पदार्थ असे असतात की ज्या तुमच्या त्वचेसाठी टॉनिक म्हणून काम करू शकतात. सुंदर त्वचेसाठी कोणत्या पदार्थांचा वापर करायचा ते पाहूया. (Use these 3 food for beautiful and young skin)

अधिक वाचा : Toll Plaza Update : देशातील सर्व टोलनाके हटणार...खास कॅमेरे नंबर प्लेट पाहून खात्यातून कापणार पैसे, पाहा संपूर्ण माहिती

या 3 गोष्टींचे सेवन केल्याने चेहऱ्यावरील त्वचा होईल सुंदर, येईल चमक-

1. दूध (Milk)
दुधाला संपूर्ण अन्न मानले जाते, कारण त्यात आवश्यक असलेली जवळजवळ सर्व पोषक तत्वे असतात. याचा आपल्या शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. तुम्ही दिवसातून दोनदा एक ग्लास दुधाचे सेवन करू शकता, यामुळे चेहऱ्यावर कमालीची चमक येईल. मात्र दूध उकळल्यानंतर ते पिण्याचा प्रयत्न करा जेणेकरून दुधात असलेले जंतू निघून जातील आणि तुमच्या शरीरावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही.अधिक वाचा : First Maruti 800 Car : ही आहे भारतातील पहिली मारुती 800, 39 वर्ष जुनी, पहिल्या कारची कहाणी...पाहा फोटो

2. दही (Curd)
लोकांना जेवणानंतर दही खायला आवडते. दह्याच्या सेवनाने पचनक्रिया सुरळीत राहते आणि पोटाशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवत नाही. पोट स्वच्छ राहिल्याने चेहऱ्यावर सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे रोज किमान दोन वाट्या दही खावे. चेहऱ्यावर दही लावल्यानेही खूप फायदा होतो. दही हा असाच एक घटक आहे जो तुमच्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे आणि प्रत्येक घरात उपलब्ध असतो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की दह्याने चेहऱ्याची मसाज केल्याने त्वचेशी संबंधित अनेक आजारांपासून तुमची सुटका होईल. याशिवाय दह्यापासून झटपट चेहऱ्यावर चमक येते. 

अधिक वाचा : LIVE मॅच दरम्यान स्टेडियममध्येच दाम्पत्याचे शारीरिक संबंध, 6 सेकंदांच्या VIRAL VIDEO ने खळबळ

3. लिंबू (Lemon)
लिंबू हे असे अन्न आहे जे आपल्या पोटासाठी आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. रोज लिंबू पाणी (Lemon Water) प्यायल्यास पचनाच्या समस्यांपासून सुटका मिळेल आणि त्याचबरोबर चेहरा देखील चमकेल. लिंबाचा रस ग्लिसरीनमध्ये मिसळून चेहऱ्याला लावता येतो. यामुळे त्वचा मुलायम आणि सुंदर होईल.

(Disclaimer : प्रस्तुत लेखात सुचविलेल्या टिप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि त्यांचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावला जाऊ नये. कोणत्याही प्रकारचे फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी