Bad Cholesterol Control: शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी वापरा या 3 आयुर्वेदिक टिप्स

Health Tips : जगातील सर्वात मधुमेहाचे रुग्ण भारतातच आढळतात. लठ्ठपणाचेही प्रमाण खूप वाढले आहे. या गंभीर आजारांमागे उठण्याची आणि झोपण्याची निश्चित वेळ नसणे, आहाराच्या चुकीच्या सवयी, फास्ट फूड खाणे आणि व्यायामाचा अभाव ही मुख्य कारणे आहेत.मधुमेहाचा सामना करण्‍यासाठी असा आयुर्वेदिक उपाय पाहूया ज्यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलवर देखील नियंत्रण ठेवले जाते.

Bad Cholesterol Control
खराब कोलेस्ट्रॉलचे नियंत्रण 
थोडं पण कामाचं
  • मधुमेह, ह्रदयविकार, उच्च रक्तदाब हे आजार घरोघरी पसरले आहेत
  • मधुमेहाचा आजार झाल्यानंतर उच्च रक्तदाब, थायरॉईडाचादेखील त्रास होतो
  • कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्याचे घरगुती उपाय

Ayurvedic Tips to Control Bad Cholesterol : नवी दिल्ली : मागील काही वर्षात मधुमेह, ह्रदयविकार, उच्च रक्तदाब हे आजार घरोघरी पसरले आहेत. जगातील सर्वात मधुमेहाचे (Diabetes) रुग्ण भारतातच आढळतात. लठ्ठपणाचेही प्रमाण खूप वाढले आहे. या गंभीर आजारांमागे उठण्याची आणि झोपण्याची निश्चित वेळ नसणे, आहाराच्या चुकीच्या सवयी, फास्ट फूड खाणे आणि व्यायामाचा अभाव ही मुख्य कारणे आहेत. मधुमेहाचा आजार झाल्यानंतर उच्च रक्तदाब, थायरॉईडाचादेखील त्रास होऊ लागतो. परिणामी हृदयविकाराचा धोका वाढतो. मधुमेहाचा सामना करण्‍यासाठी असा आयुर्वेदिक उपाय (Ayurvedic Tips) पाहूया ज्यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलवर (Bad Cholesterol) देखील नियंत्रण ठेवले जाते. (Use these Ayurvedic Tips to control Bad Cholesterol in body read in Marathi )

अधिक वाचा :  Success Story : 12वी पास व्यक्ती भाजी विकून बनला करोडपती...10 हजार रुपयांत सुरू केला स्टार्टअप, आज 9 हजारांहून अधिक ग्राहक

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्याचे घरगुती उपाय (Home Remedies for Cholesterol)

दालचिनीचा उपाय 
शरीरात जर खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढले असेल तर दालचिनी पावडरची रेसिपी खूप उपयुक्त ठरू शकते.  यासाठी रोज सकाळी चिमूटभर दालचिनी पावडरचे सेवन करा. याचा वापर केल्याने तुम्हाला लवकरच चांगला फायदा दिसू लागेल. अर्थात इथे लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे दालचिनी पावडर जास्त खाऊ नये, नाहीतर तुमचे नुकसान होऊ शकते.

अधिक वाचा : जेवणानंतर गुळ खावा की नाही?

खराब कोलेस्ट्रॉल बाहेर टाकणे 
अंबाडीच्या बिया खूपच गुणकारी असतात. अंबाडीच्या बियांचा वापर करून तुम्ही शरीरातील खराब कोलेस्टेरॉल देखील काढून टाकू शकता. त्यासाठी कोमट पाण्यात एक चमचा अंबाडीच्या बियांची पावडर मिसळा. त्यानंतर ते पाणी प्या. हळूहळू खराब कोलेस्टेरॉल तुमच्या शरीरातून मूत्र आणि विष्ठेद्वारे बाहेर पडू लागेल आणि नियंत्रणात येईल.

अधिक वाचा : Winter best destination: आपल्या जोडीदारासह करा बर्फाळ डोंगदरऱ्यांची सैर...सौंदर्याचा खजिना, सोबत जबरदस्त ऑफर्सदेखील

शरीरातील चरबी कमी करण्याचा उपाय
अलीकडे लठ्ठपणाची मोठी समस्या आहे. वजन वाढल्याने त्रास होत असला तरी फ्लॅक्स सीडचा म्हणजे जवसाच्या बियांचा (Flax Seed) वापर तुम्ही करू शकता.  जवसाच्या बियांचे चूर्ण बनवा. त्यानंतर एक चमचा पावडर कोमट पाण्यात मिसळून ते पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्या. यामुळे शरीरातील वाढलेली चरबी कमी होण्यास मदत होते. 

खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी, अपुरी झोप, वाढते ताणतणाव आणि त्यातून निर्माण होणारी व्यसनाधीनता यासारखे अनेक कारणांमुळे गेल्या काही वर्षात लठ्ठपणा ही भारतीयांसमोर निर्माण झालेली एक मोठी समस्या आहे. लठ्ठपणा हा कुठलाही आजार नसला तरी सुद्धा त्यामुळे वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण मिळण्याची शक्यता वाढते. नियमित व्यायाम आणि काही विशिष्ट योगासनांच्या मदतीने ही चरबी कमी करण्यास मदत होते.

(Disclaimer : प्रस्तुत लेखात सुचविलेल्या टिप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि त्यांचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावला जाऊ नये. कोणत्याही प्रकारचे फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी