Hair Care Tips: सुंदर आणि चमकदार केस हवे आहेत? मग करा हे सोपे घरगुती उपाय

Hair Care : कोरडे आणि निर्जीव केस तुमचे सौंदर्य कमी करतात. केस कमकुवत असल्यास ते निर्जीव होतात. परिणामी कमकुवत केसांमुळे तुम्ही तुमची आवडती केशरचना करू शकत नाही. सुंदर केसांना तुम्ही कसेही वळवू शकता. केसांची निगा राखणे (Healthy Hair), त्यांना स्वच्छ ठेवणे आवश्यक असते. तुमचे केस मजबूत, सुंदर आणि चमकदार बनवण्यासाठी हेअर मास्कचा (Hair Mask) वापर करू शकता.

Hair Care Tips
केसांचे आरोग्य 
थोडं पण कामाचं
  • सुंदर केसांसाठीच्या टिप्स
  • निरोगी केस कसे मिळवाल
  • जाणून घ्या केसांचे हेअर मास्क

How to get beautiful hairs : नवी दिल्ली : केस हा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा भाग असतो. सुंदर आणि चमकदार केसांमुळे (Beautiful Hair) आपले रुप खुलून येते. मात्र तेच जर केस निरोगी नसतील तर त्याचा नकारात्मक परिणाम होतो. कोरडे आणि निर्जीव केस तुमचे सौंदर्य कमी करतात. केस कमकुवत असल्यास ते निर्जीव होतात. परिणामी कमकुवत केसांमुळे तुम्ही तुमची आवडती केशरचना करू शकत नाही. सुंदर केसांना तुम्ही कसेही वळवू शकता. अनेकदा टाळूवर साचलेल्या घाणीमुळे केस खराब होतात. यासाठी केसांची निगा राखणे (Healthy Hair), त्यांना स्वच्छ ठेवणे आवश्यक असते. तुमचे केस मजबूत, सुंदर आणि चमकदार बनवण्यासाठी हेअर मास्कचा (Hair Mask) वापर करू शकता. हा हेअर मास्क तुम्हाला घरच्या घरी देखील बनवता येतो. घरीच हेअर मास्क बनवून केसांची निगा कशी राखायची ते पाहूया. (Use these hair mask to get shiny and beautiful hairs)

अधिक वाचा  : Multibagger stock : या एका शेअरवर मिळणार मोफत 9 शेअर्स, शिवाय शेअर स्प्लिट होत होणार 10 शेअर्स...गुंतवणुकदारांच्या शेअरवर उड्या

आवळा आणि लिंबूचा  हेअर मास्क

आवळा आणि लिंबू या दोघांमध्ये औषधी गुणधर्म असतात. हे दोन्ही केसांच्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात. आवळा आणि लिंबूचा हेअर मास्क  बनवण्यासाठी एका भांड्यात आवळा पावडर घ्या आणि त्यात लिंबाचा रस घाला. यामध्ये पाणी टाकून त्याची छान पेस्ट बनवा. आता हा हेअर मास्क तुमच्या टाळूवर नीट लावा. लावल्यानंतर जवळपास  1-2 तासांनंतर हा मास्क पाण्याने स्वच्छ धुवा. केसातील कोंडा दूर होण्यास या हेअर मास्कमुळे मदत होते. या मास्कचा वापर केल्याने तुमचे केस मजबूत होतात आणि त्यात एक चमक येते.

अधिक वाचा  : खासदार गजानन किर्तीकर बाळासाहेबांच्या शिवसेनेत

केळी आणि नारळ तेलाचा हेअर मास्क

केळी जास्त पिकली आपण बऱ्याचवेळा ती फेकून देतो. मात्र या केळ्यांचा वापर करून केसांना सुंदर बनवता येते. याचा वापर करून तुम्ही एक हेअर मास्क बनवू शकता. यासाठी केळी चांगली मॅश करा आणि त्यात खोबरेल तेल टाका. अगदी एक चमचा कच्चे दूधदेखील यात टाकता येते. अनेकदा तुम्ही जास्त पिकलेली केळी फेकून दिली असती. हे सर्व चांगले मिसळून घ्या आणि त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांना लावा. यानंतर जवळपास 1 तासानंतर तुम्ही केस पाण्याने धुवून टाका. या हेअर मास्कमुळे तुमचे केस मऊ आणि सुंदर होतात.

अधिक वाचा  : मेव्हण्याचं केलं अपहरण...खंडणी म्हणून मागितली वधू

कोरफड आणि दही यांचा वापर करून हेअर मास्क

कोरफड हे तर औषधी गुणधर्मासाठी प्रसिद्धच आहे. कोरफड आणि दह्याचा वापर करून तयार केलेला हेअर मास्क केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करतो. हा हेअर मास्क बनवण्यासाठी 3 टेबलस्पून कोरफडीचा गर घ्या आणि त्यात 2 चमचे दही घाला. हे मिश्रण चांगले मिसळा. आता या मिश्रणाने केसांना हळूवार मसाज करा. साधारण 1-2 तासांनंतर पाण्याने केस धुवून टाका.
 
(Disclaimer : प्रस्तुत लेखात सुचविलेल्या टिप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि त्यांचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावला जाऊ नये. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी