Healthy Diet: बद्धकोष्ठतेसह पोटाच्या अनेक समस्या होईल दूर...आहारात करा याचा समावेश

Health Tips : हल्ली प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात इतका व्यस्त झाला आहे की त्याच्याकडे आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी वेळ नाही. अशा स्थितीत जसजसे वय वाढत जाते तसतसे अनेक समस्या किंवा व्याधी व्हायला सुरूवात होते. अशावेळी अनेक घरगुती उपायांमुळे पोटाचे विकार दूर होतात.

Health Tips
हेल्थ टिप्स 
थोडं पण कामाचं
  • वाढत्या वयासह आरोग्याच्या तक्रारी वाढतात
  • आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते
  • पोटाच्या समस्यांसाठी घरगुती उपाय

Home remedies for digestive problems:नवी दिल्ली : अलीकडच्या काळात आरोग्य (Health) हा खूपच दुर्लक्षित विषय झाला आहे. एरवी याच्यावर चर्चा खूप होते मात्र गांभीर्याने अंमलात आणले जात नाही. हल्ली प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात इतका व्यस्त झाला आहे की त्याच्याकडे आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी वेळ नाही. अशा स्थितीत जसजसे वय वाढत जाते तसतसे अनेक समस्या किंवा व्याधी व्हायला सुरूवात होते. यामध्ये बद्धकोष्ठतेसह (Constipation) पोटाच्या इतर समस्यांचा समावेश आहे. या समस्यांमुळे माणसाच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम होतो. काही घरगुती उपाय (Home remedies) करून या आरोग्याच्या समस्यांवर नियंत्रण मिळवता येते. (Use these home remedies for digestive problems)

अधिक वाचा  : वडापावचा वाढणार भाव; सर्वसामान्यांचा हिशोब होणार तिखट

पचनक्रियेचे महत्त्व आरोग्यसाठी सर्वाधिक असते. पोटाचं आरोग्य चांगलं राहण्यासठी कुठले पदार्थ खायला हवेत, हे अनेकांना माहित असतं. त्यानुसार ते ते पदार्थ खाल्लेही जातात. मात्र तरीही अपचन, पित्त, गॅस यासारखे विकार होतच असतात. सगळं काही नीट खाऊनही असं का होतंय, हे आपल्याला समजत नाही. आयुर्वेदात आहार आणि पचनासंदर्भात विपुल मार्गदर्शन आहे.. काय खावं हे जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच ते कधी खावं यालाही महत्त्व आहे. यातील दुसऱ्या गोष्टीचं भान अनेकांना नसतं. पचनक्रियेवर आणि आहारावर लक्ष दिल्यास अनेक व्याधींपासून लांब राहता येते.

नियमित आणि सात्विक आहार घेणे हाच पोट साफ ठेवण्याचा आणि सर्व विकारांना पळवून लावण्याचा उत्तम मार्ग आहे. अर्थात, तुम्हाला पोटाशी संबंधित गंभीर आजार असेल, तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि त्यानुसार आहाराचं नियोजन करणं गरजेचं आहे.

अधिक वाचा - Fruits for high Uric Acid : रक्तातील युरिक ॲसिड कमी करण्यासाठी खा ही पाच फळं, स्वस्तातली फळं खाऊन टळतील गंभीर आजार

पचनाशीसंबंधित विकारासाठी हे खा-


पेरू

पेरू बद्धकोष्ठतेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. शिवाय हा सहजपणे उपलब्धदेखील असतो. यामध्ये अनेक प्रकारची पोषक तत्वे असतात, तसेच फायबरही मुबलक प्रमाणात असते. पोटाच्या अनेक समस्यांवर हे फायदेशीर आहे. बद्धकोष्ठतेवर हा रामबाण उपाय मानला जातो.

सूप

अनेकांना पेरू खायला आवडत नाही. त्यावरही उपाय आहे. पेरूचे सूप बनवता येते. पेरूचे सूप असे बनवतात. पेरूचा लगदा काढा आणि एका भांड्यात पाण्यात उकळा, नंतर गाळून घ्या. त्याचा लगदा एका भांड्यात ठेवा आणि त्यात दालचिनी, मिरपूड, मीठ घालून मिक्स करा आणि घट्ट होईपर्यंत शिजवा. हे सूप एका भांड्यात काढा आणि वर पुदिन्याची पाने आणि काळे मीठ घालून सर्व्ह करा.

अधिक वाचा - पोटाच्या विकारांपासून हृदयविकारावर लाभदायी आहे गवार, जाणून घ्या गवार खाण्याचे फायदे

पचनशक्ती सुधारण्यासाठी दही घातलेली कोशिंबीर खाणं गरजेचं आहे. यामुळे पोट थंड राहतं. अनेकजण जेवणासोबतच दह्याची कोशिंबीर खातात. मात्र याचा जास्त फायदा मिळवायचा असेल तर जेवण झाल्यावर काही वेळानं दह्याची कोशिंबीर खाण्याचा सल्ला देण्यात येतो.

(Disclaimer : प्रस्तुत लेखात सुचविलेल्या टिप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि त्यांचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावला जाऊ नये. कोणत्याही प्रकारचे फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी