Ayurvedic Remedies To Treat Stomach Pain : नवी दिल्ली : आपल्या आरोग्याच्या अनेक समस्या या आहार आणि पचनक्रियेशी संबंधित असतात. पोटदुखीची समस्यादेखील (Stomach Pain) अशीच पचनाशी संबंधित समस्या आहे. सर्वसाधारणपणे पोटदुखीची समस्या आहारातील गडबडीमुळे सुरू होते. बर्याच वेळा दुर्लक्ष करूनही हा त्रास वाढतो, ज्यामुळे पोटशूळ असह्य होतो. अशा परिस्थितीत पोटदुखी दूर करण्यासाठी आयुर्वेदात अनेक प्रभावी उपाय सांगितले आहेत. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया- (Use these home remedies in stomach pain)
अधिक वाचा : गोगलगायींनं आणलाय पोटावर पाय, आता करायचं काय?, शेतकऱ्यांचा सरकारला सवाल
अधिक वाचा : Horoscope Today, 11 August : रक्षाबंधनाला कोणाचे नशीब चमकणार?, पहा तुमचे राशीभविष्य आणि उपाय
पोटदुखीचे कारण बद्धकोष्ठता, आम्लपित्त किंवा अपचन असेल तर अशा पदार्थांचे सेवन करावे, जे सहज पचतात - जसे की फळे, भाज्या, खिचडी, मसूर पाणी इ. याशिवाय काही सोप्या आयुर्वेदिक उपायांनीही पोटदुखीची समस्या दूर केली जाऊ शकते. पोटदुखीचा त्रास होत असल्यास घरच्या घरी आयुर्वेदिक पावडर बनवा. यासाठी भाजलेले जिरे, काळी मिरी, सुंठ, लसूण, धणे, हिंग, पुदिन्याची सुकी पाने समप्रमाणात घेऊन बारीक वाटून घ्या. तसेच त्यात थोडेसे काळे मीठ टाका. हे चुरण खाल्ल्यानंतर एक चमचा कोमट पाण्यासोबत घ्या. या चुरणाने कधीच पोटदुखी होणार नाही आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होईल.
अधिक वाचा : मंत्रिमंडळ विस्तारानंतर एकनाथ शिंदे @ 'वर्षा'वर, गृहप्रवेशाचा ठरला मुहूर्त
पुदिना आणि लिंबाचा रस प्रत्येकी एक चमचा घ्या. आता त्यात अर्धा चमचा आल्याचा रस आणि थोडे काळे मीठ वापरा. दिवसातून 3 वेळा वापरा, पोटदुखीमध्ये आराम मिळेल.
एक चमचा आल्याचा रस, 2 चमचे लिंबाचा रस आणि त्यात थोडी साखर मिसळा. दिवसातून 2-3 वेळा घेतले जाऊ शकते. पोटदुखीत फायदा होईल.
लहान मुलांच्या पोटात दुखत असल्यास थोडी हिंग चमचाभर पाण्यात विरघळून शिजवून घ्यावी. नंतर मुलाच्या नाभीभोवती लावा. काही वेळाने वेदना निघून जातात.
(Disclaimer : प्रस्तुत लेखात सुचविलेल्या टिप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि त्यांचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावला जाऊ नये. कोणत्याही प्रकारचे फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)