How To Treat Knee Stiffness Problem : नवी दिल्ली : आपल्या शरीराच्या हालचालींमध्ये आपल्या पायाची भूमिका महत्त्वाची असते. अलीकडच्या काळात फक्त वृद्धांनाच नव्हे तर मध्यमवयीन लोकांनादेखील गुडघेदुखीच्या समस्येला (knee pain) तोंड द्यावे लागते आहे. पूर्वी ही समस्या म्हातारपणी उद्भवत असे मात्र आता ती तरुण वयातच होते आहे. यामागे जीवनशैलीतील आणि आहारातील बदल कारणीभूत आहेत. गुडघेदुखीची समस्या किंवा दुखणे (Knee Stiffness)हे फक्त पायापुरतेच मर्यादित राहत नाही तर त्यामुळे चालणे आणि दैनंदिन जीवनातील सामान्य कामे करणे कठीण होते. यावर उपाय म्हणून अनेकजण हल्ली यासाठी पेन किलर खातात. मात्र या गोळ्यांचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो असेच अभ्यासातून दिसून आले आहे. गुडघेदुखीच्या समस्येवर आराम मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय आहे ज्यांचा तुम्ही वापर करू शकता. (Use these home remedies to get relief from knee stiffness read in Marathi)
मेथी दाणे
मेथीचे दाणे हे गुडघेदुखीवर किंवा गुडघे अवघडण्यावर खूप उपयुक्त असतात. एरवी मेथीचे दाणे जरी स्वयंपाक घरातच वापरले जात असले तर त्यांचा वैद्यकीय उपयोगदेखील असतो. गुडघ्यांच्या समस्येसाठी मेथी दाणे रात्रभर भिजत घाला. सकाळी उठल्यानंतर हे दाणे खावेत. त्यानंतर पाणी प्यावे.
सुका मेवा
आरोग्यासाठी सुकामेवा अत्यंत फायद्याचा असतो. यामध्ये खूप पोषक घटक असतात. गुडघ्यांच्या दुखण्यावर देखील सुकामेव्याचा उपयोग होतो. सुका मेवा उष्ण असतो त्यामुळे ते दुखण्यावर उपयुक्त ठरतात. शिवाय यामध्ये कॅल्शियम आणि प्रथिने असतात. हाडांना बळकट करण्यासाठी ते फायद्याचे असतात.
अधिक वाचा : Mumbai Water Cut:अरे देवा! मुंबईत उद्या-परवा 24 तासांसाठी पाणीकपात, तुमच्या भागात काय असेल स्थिती?
हळदीचे दूध
हळदीचे दूध हे तर अतिशय महत्त्वाचे असते. रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यापासून अनेक आजारांवर हळदीचे दूध गुणकारी असते. यासाठी कोमट दुधात चमचाभर हळद टाका आणि रात्री झोपण्यापूर्वी ते प्यावे. याचा चांगला फायदा होतो. हळदीचे दूध अनेक बाबतीत गुणकारी असते.
अधिक वाचा : त अक्षरावरुन मुला-मुलींची लेटेस्ट नावे, जाणून घ्या अर्थासह
बदललेल्या जीवनशैलीमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. वेळीअवेळी झोपणे, आहाराच्या चुकीच्या पद्धती, फास्टफूड खाणे, बाहेरचे पदार्थ खाणे, शारीरिक हालचाली किंवा व्यायामाचा अभाव, पायी न चालणे यासारख्या गोष्टींमुळे अनेक आजार किंवा समस्या निर्माण होत आहेत. जीवनशैलीवर लक्ष दिल्यास आणि नियमितपणे शारीरिक हालचाली केल्यास या अडचणी दूर होतात. गुडघेदुखी होऊ नये यासाठी आधीपासूनच काळजी घेतली पाहिजे. पायांचे व्यायाम केले पाहिजेत. खाण्यापिण्यावर लक्ष दिले पाहिजे. हाडांची मजबूती वाढवली पाहिजे.
(Disclaimer : प्रस्तुत लेखात सुचविलेल्या टिप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि त्यांचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावला जाऊ नये. कोणत्याही प्रकारचे फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)