Tooth Cavity: दात किडण्याची समस्या आहे? मग हे आहेत सोपे 4 रामबाण उपाय...दुखणे होईल दूर

Health Tips : दात किडणे अनेक कारणांमुळे होऊ शकते. मागच्या दातांमध्ये ही पोकळी असते जी दात आतून पोकळ करते. दातांच्या पृष्ठभागावर काळी, तिळाच्या आकाराची पोकळी दिसते. या पोकळीमुळे दात पोकळ होतात. परिणामी ते कमकुवत झाल्यामुळे तुटण्याची शक्यता असते. सोपे घरगुती उपाय वापरून तुम्ही दातांच्या दुखण्यातून मुक्त होऊ शकतात.

Dental problems
दातांचे आजार 
थोडं पण कामाचं
  • दातांच्या समस्या हल्ली सर्वत्र आढळतात
  • दात किडण्याने अनेकजण त्रस्त असतात
  • दात किडण्यावरील सोपे उपाय

Home Remedies for Tooth Cavity:नवी दिल्ली : दातांच्या आरोग्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते. मात्र दातांचे आजार (Dental problems) किंवा समस्या या खूपच त्रासदायक असतात. त्यामुळे त्यासंदर्भात जागरूक राहणे फारच महत्त्वाचे असते. दात किडण्याची (Tooth Cavity)समस्या हल्ली सर्वत्र आढळते. दात किडणे अनेक कारणांमुळे होऊ शकते.  मागच्या दातांमध्ये ही पोकळी असते जी दात आतून पोकळ करते. दातांच्या पृष्ठभागावर काळी, तिळाच्या आकाराची पोकळी दिसते. या पोकळीमुळे दात पोकळ होतात. परिणामी ते कमकुवत झाल्यामुळे तुटण्याची शक्यता असते. याशिवाय दात दुखणे, तोंडातून रक्त येणे, दात पिवळे पडणे इत्यादी लक्षणे दात किडल्यावर दिसू लागतात. दातांच्या या समस्येपासून सुटका करण्यासाठीचे काही घरगुती उपाय (Home remedies) जाणून घेऊया. (Use these simple home remedies for Tooth Cavity)

अधिक वाचा - Worst food for kidney: ‘हे’ पाच पदार्थ ठरतात किडणीसाठी विष, आजच करा डाएटमधून हकालपट्टी

दातांच्या किडण्यावरील घरगुती उपाय(Cavity Home Remedies)

लसूण
लसणाचे विविध फायदे आणि महत्त्व आयुर्वेदातदेखील सांगितले आहेत. दातांचे आरोग्य राखण्यासाठी आणि दात किडण्यापासून मुक्त होण्यासाठी लसणाचा वापर केला जाऊ शकतो. यासाठी तुम्ही लसूण तुमच्या आहाराचा एक भाग बनवू शकता. रोज रिकाम्या पोटी याचे सेवन केल्यास फायदा होतो. याशिवाय लसणाचे छोटे तुकडे करून दातावर ठेवता येतात.

लवंग तेल
दातांच्या किडण्यावर लवंगाचे तेल गुणकारी असते. लवंगाचे तेल दिवसातून दोन ते तीन वेळा वापरल्याने दात किडणे बरे होण्यास मदत होते. या तेलातील अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म दात किड दूर करण्यासाठी उपयुक्त ठरतात. लवंगाचे तेल कापसावर टाकून थेट दातांवर लावता येते.

अधिक वाचा - तुमच्या हाता-पायाला मुंग्या येतात का? मग वेळीच व्हा सावध, ही आहे धोक्याची घंटा

अंड्याचे कवच
हादेखील चांगला उपाय आहे. अर्थात जर तुम्ही अंडी खात असाल तरच हा उपाय वापरता येईल. दातांची किडणे दूर करण्यासाठी तुम्ही अंड्यापासून तयार केलेली ही पद्धत देखील वापरू शकता. यासाठी प्रथम अंड्याचे कवच स्वच्छ धुवून वाळवून घ्यावे. ही साल बारीक करून पावडर बनवा आणि त्यात बेकिंग सोडा घाला. हे तयार मिश्रण काही वेळ दातांवर घासून नंतर धुवा.

अधिक वाचा - Viral Video: मॅडमच्या शेजारी उभा राहून बोलू लागला कविता अन् तितक्यात निसटली पँट

पेरूची पाने
पेरूची पानेदेखील गुणकारी असतात. पेरूची पाने अ‍ॅन्टीमायक्रोबियल गुणधर्मांनी समृद्ध असतात. त्यामुळे दातांचे किडणे दूर करण्यासाठी ती चांगली मानली जातात. ही पाने तुम्ही माउथवॉश म्हणून वापरू शकता. पेरूच्या पानांचे छोटे तुकडे करून पाण्यात उकळा. त्यानंतर या पाण्याने तुम्ही गुळण्या करू शकता किंवा दात धुवू शकता.  

अनेकदा सोपे घरगुती उपाय आपल्याला मोठ्या दुखण्यांवर आराम देतात. दातांच्या समस्या उद्भवू यासाठीच आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे.

(Disclaimer : प्रस्तुत लेखात सुचविलेल्या टिप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि त्यांचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावला जाऊ नये. कोणत्याही प्रकारचे फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी