Hair Growth Tips: सुंदर-लांबसडक केसांसाठी आहारात घ्या हे जीवनसत्त्व, केसांची वाढ पाहून थक्क व्हाल

Hair Care Tips : हिवाळ्यात (Winter)केसांमध्ये कोंडा वेगाने वाढू लागतो आणि केस कमकुवत होतात. केस फारच वेगाने (Hair loss) गळू लागतात. केस गळणे अनेक कारणांमुळे होत असले तरी काहीवेळा त्याचा संबंध तुमच्या खाण्यापिण्याशी असतो. केसगळतीची समस्या भेडसावत असेल तर या टिप्स वापरून पाहा.

Hair Care
केसांची निगा 
थोडं पण कामाचं
  • हिवाळ्यता केसगळती वाढते
  • केसांच्या समस्येसाठी आहार महत्त्वाचा
  • जीवनसत्वे देणारे पदार्थ कोणते

Tips For Hair Growth: नवी दिल्ली : हिवाळ्यात त्वचा आणि केसांच्या समस्या खूप वाढतात. कोरडेपणामुळे केस आणि त्वचेच्या समस्या येतात. या ऋतूत केस हाताळणेही कठीण होऊन बसते. हिवाळ्यात (Winter)केसांमध्ये कोंडा वेगाने वाढू लागतो आणि केस कमकुवत होतात. केस फारच वेगाने (Hair loss) गळू लागतात. केस गळणे अनेक कारणांमुळे होत असले तरी काहीवेळा त्याचा संबंध तुमच्या खाण्यापिण्याशी असतो. केसगळतीची समस्या  भेडसावत असेल तर या टिप्स वापरून पाहा. या उपायांमुळे तुमचे केस लांब आणि सुंदर (beautiful hairs) होतील. जाणून घ्या कशी निगा राखायची. (Use these tips to get long and beautiful hairs read in Marathi)

अधिक वाचा  : किवीच्या गोलंदाजांसमोर भारतीय संघ 219 धावांवर गारद

कोणत्या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे केस गळतात?

प्रत्येक ऋतूत आहार महत्त्वाचा असतो. हिवाळ्याच्या काळात आपल्या खाण्याच्या सवयींवर खूप परिणाम होतो. त्यामुळे शरीरात पोषक तत्वांची कमतरता असते. अनेकवेळा  आवश्यक जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे केस झपाट्याने गळतात. या जीवनसत्त्वांमध्ये A, B, C, D आणि E यांचा समावेश होतो. ही जीवनसत्वे आहारात घेतल्यास केसांची गळती थांबवता येते.  

केसांच्या आरोग्यासाठी घ्यायचा आहार-

जीवनसत्त्व असणारे पदार्थ 
1. व्हिटॅमिन ए मुळे केस मजबूत होतात. व्हिटॅमिन ए साठी रताळे, जर्दाळू, दूध, अंडी, मांस, पालक, भोपळा, गाजर, ब्रोकोली आणि केळी यांचे सेवन सुरू करा.

2. व्हिटॅमिन बी केसांच्या वाढीसाठी चांगले आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या जेवणात दूध, अंडी, फ्लॉवर, पनीर, मशरूम आणि पालक यांचे प्रमाण वाढवावे लागेल.

3. व्हिटॅमिन सी कोलेजन उत्पादनात मदत करते. यासोबतच हे केस दाट बनवण्याचे काम करते. त्यामुळे त्वचा आणि नखांनाही पोषण मिळते. हे लिंबूवर्गीय फळे आणि पालक, एवोकॅडो, संत्री, द्राक्षांमध्ये आढळते. यासोबतच सूर्यप्रकाशामुळे आपल्या त्वचेत व्हिटॅमिन डी तयार होतो. त्यामुळे केसगळती कमी होते.

अधिक वाचा  : लग्न सोहळ्याला EMIवर खरेदी करू शकतात सोन्याचे दागिने

4. व्हिटॅमिन ईमुळे केसांसोबतच त्वचेलाही फायदा होतो. हे आंबा, किवी, पिस्ता आणि सोयाबीनमध्ये आढळते. हे शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी करण्याचे काम करते.

केसगळती थांबवण्यासाठी केसांना पोषण देणे गरजेचे आहे. योग्य आहार घेतल्यास केस सुंदर आणि दाट होतात.

केसांच्या गळतीसाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात. त्यात हिवाळ्यात त्वचा आणि टाळू कोरडी पडते त्यामुळे केस गळती वाढते. केसांना तेलाबरोबरच आहारातून पोषण दिल्यास केस गळती थांबून ते दाट होतात. यासाठी फास्टफूड आणि तेलकट पदार्थ टाळले पाहिजे. आहाराचे यात खूप महत्त्व असते.

(Disclaimer : प्रस्तुत लेखात सुचविलेल्या टिप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि त्यांचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावला जाऊ नये. कोणत्याही प्रकारचे फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी