Oxygen Level in body: शरीरातील ऑक्सिजन पातळी कमी झाल्यास येतात मोठ्या आरोग्य समस्या...ऑक्सिजन पातळी वाढवण्यासाठीच्या सोप्या टिप्स

Health Tips : शरीरातील पेशींमध्ये पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन (oxygen level) असणे आवश्यक असते. अन्यथा शरीरात कमकुवतपा, अशक्तपणा, ऊर्जेचा अभाव जाणवतो. शिवाय अनेक व्याधी लागण्याची शक्यता आहे. हिवाळ्यात तर हा मुद्दा आणखी महत्त्वाचा ठरतो कारण हिवाळ्यात हवेची गुणवत्ता अत्यंत खराब होते. याचा हृदय आणि फुफ्फुसावर वाईट परिणाम होतो.

Oxygen level
ऑक्सिजनची पातळी 
थोडं पण कामाचं
  • शरीरातील ऑक्सिजन पातळीचे महत्त्व
  • ऑक्सिजन कमी झाल्यास होतात आरोग्याच्या समस्या
  • ऑक्सिजन पातळी कशी वाढवायची

How to Increase Oxygen Level: नवी दिल्ली : आपला श्वास सुरू राहण्यासाठी जशी ऑक्सिजनची आवश्यकता असते. तसेच आपण श्वसनातून घेतलेला ऑक्सिजनदेखील (oxygen) आपल्या पेशींपर्यत पोचवला जात असतो. शरीरात म्हणजे शरीरातील पेशींमध्ये पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन (oxygen level) असणे आवश्यक असते. अन्यथा शरीरात कमकुवतपा, अशक्तपणा, ऊर्जेचा अभाव जाणवतो. शिवाय अनेक व्याधी लागण्याची शक्यता आहे. हिवाळ्यात तर हा मुद्दा आणखी महत्त्वाचा ठरतो कारण हिवाळ्यात हवेची गुणवत्ता अत्यंत खराब होते. याचा हृदय आणि फुफ्फुसावर वाईट परिणाम होतो. लोकांना विषारी हवेत राहावे लागते. परिणामी शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होते. तज्ज्ञांच्या मते, शरीरात ऑक्सिजनची कमतरता झाल्यावर श्वास घेण्यास त्रास होतो, संभ्रमाची स्थिती निर्माण होते. थकवा येतो आणि चेहरा निळा होतो. जर ही लक्षणे तुमच्या शरीरातही दिसत असतील तर ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठीची आवश्यकता आहे. त्यासाठी या सोप्या   टिप्स वापरा. ( Use these tips to improve oxygen level in body)

अधिक वाचा  : Blood Sugar Control Tips: मधुमेहाची लक्षणे दिसताच लगेच करा हे 5 उपाय...होईल फायदा

खजूर 
खजूर हे आरोग्यासाठी खूप फायद्याचे असते. शिवाय यात औषधी गुणधर्मदेखील असतात. यात अनेक पोषक घटक असतात. त्यात सेलेनियम, तांबे, फॉस्फरस, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. याच्या सेवनाने शरीरातील ऑक्सिजनची कमतरता दूर होते. तसेच वाढलेला रक्तदाब नियंत्रणात राहतो. 

भरपूर पाणी 
नेहमी शरीरात योग्य प्रमाणात पाणी असले पाहिजे. यासाठी पुरेसे पाणी प्यायले पाहिजे. शरीरातील ऑक्सिजन वाढवण्यासाठी दररोज पुरेसे पाणी पिण्याची शिफारस आरोग्यतज्ज्ञ करतात. यासाठी दररोज किमान 3 लिटर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पुरेसे पाणी प्यायल्याने ऑक्सिजन पेशींपर्यंत पोहोचतो. त्यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते. 

अधिक वाचा  : Green Bonds: ग्रीन बॉन्ड्स म्हणजे काय? गुंतवणुकीचा नवा आकर्षक पर्याय जाणून घ्या

श्वासोच्छवासाचे व्यायाम
श्वसनाशी ऑक्सिजनच्या पातळीचा संबंध असतो. योग्य पद्धतीने श्वसन क्रिया झाल्यास पुरेसा ऑक्सिजन पेशींपर्यत पोचतो. शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी स्पाइनल कॉर्ड श्वासोच्छवासाचे व्यायाम दररोज करा. हा व्यायाम बसूनही करता येतो. त्यामुळे कोणीही श्वासोच्छवासाचे व्यायाम करू शकतो. श्वसनाचा व्यायाम केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. याव्यतिरिक्त, श्वसन प्रणाली मजबूत होते. परिणामी शरीरातील ऑक्सिजनची पातळीही वाढते.

अधिक वाचा  : 'द केरला स्टोरी'चा टीझर आऊट

ताडासन
हे एक अतिशय फायदेशीर आसन आहे. ताडासन केल्याने श्वसन प्रक्रिया सुधारते, असे एका संशोधनातून समोर आले आहे. यामुळे शरीराची मुद्राही सुधारते. हे आसन फुफ्फुसाचा वरचा भाग सक्रिय करण्यास उपयुक्त ठरते. डॉक्टर दम्याच्या रुग्णांनासुद्धा ताडासन करण्याचा सल्ला देतात. त्यामुळे श्वसनाची क्रिया सुधारते.

अनेकदा बरेचजण श्वसनाची क्रिया योग्य पद्धतीने करत नाही. वरचेवर घाईघाईने श्वास घेतात. त्यामुळे आपल्या श्वसनावरदेखील लक्ष द्या.

(Disclaimer : प्रस्तुत लेखात सुचविलेल्या टिप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि त्यांचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावला जाऊ नये. कोणत्याही प्रकारचे फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी