Water for weight loss: फक्त पाणी पिऊनही कमी होऊ शकतं वजन, असा करा वापर

आपल्या शरीरातील बहुतांश भाग हा पाण्याने बनलेला आहे. पाण्याचा योग्य वेळी योग्य तो उपयोग करून आपण वजन कमी करू शकतो.

Water for weight loss
फक्त पाणी पिऊनही कमी होतं वजन  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • पाण्याचा उपयोग करून कमी करू शकता वजन
  • पाण्याचा योग्य प्रकारे योग्य वेळी वापर करण्याची गरज
  • कमी होईल पोट आणि कंबरेभोवतीची अतिरिक्त चरबी

Water for weight loss: गेल्या काही वर्षात भारतात लठ्ठपणाची (Obesity) समस्या वाढत चालली आहे. बदललेली लाईफस्टाईल (Lifestyle), खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी (Eating Habits), अपुरी आणि अवेळी झोप, वाढत चाललेली व्यसनाधीनता, वाढते ताणतणाव या सर्वांचा परिणाम आरोग्यावर (Impact on health) होत असून त्यामुळे वजन वाढत असल्याचं दिसून येत आहे. वजन कमी करण्यासाठी लोकांकडून अनेक उपाय करण्यात येतात. काहीजण जिममध्ये जाऊन तासन्‌तास घाम गाळतात, तर काहीजण वेगवेगळ्या प्रकारचे डाएट करून वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असतात. या सर्वांबरोबर आणखी एक सोपा उपाय वजन कमी करण्यासाठी सांगितला जातो. हा उपाय आहे योग्य प्रकारे पाणी पिण्याचा. जर योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेत पाणी पित राहिलं, तर वजन कमी होण्याच्या प्रक्रियेत मदत होत असल्याचं दिसून आलं आहे. 

पाणी पिऊन वजन करा कमी

आपल्या शरीरातील बहुतांश भाग हा पाण्यापासून बनलेला आहे. पाणी हे जीवन आहे, असं म्हटलं जातं. पाण्याविना आयुष्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. बहुतांश आहारतज्ज्ञ देत असलेल्या माहितीनुसार, दिवसभरात कमीत कमी 8 ग्लास पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. मात्र जर एका विशिष्ट पद्धतीने पाणी पिलं, तर वजन कमी व्हायला त्याची मदत होऊ शकते. 

१. गरम पाण्याने करा वजन कमी

चांगल्या आरोग्यासाठी सकाळी उठल्यावर गरम पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे आपल्या शरीरातील अनेक विषारी घटक बाहेर पडायला मदत होते. त्याचबरोबर आपलं वजन हळूहळू कमी होऊ लागतं. मात्र अनेकजण व्यायाम झाल्यावर गरम पाणी पितात. असं करणं आरोग्यासाठी हानीकारक ठरण्याची शक्यता असते. व्यायामानंतर शरीराचं तापमान अगोदरच वाढलेलं असतं. अशा परिस्थितीत थंड पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. 

अधिक वाचा - Nose Picking: नाकात बोटं घालण्याची सवय खतरनाक रे बाबा! ‘या’ गंभीर आजारांना दिलेलं आमंत्रणच जणू..

२. पोट आणि कंबरेची चरबी

पोट आणि कंबरेवरची चरबी कमी करण्यासाठी तुम्हाला तेलकट आणि फॅटी पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. त्याचप्रमाणे दररोज जर तुम्ही गरम पाणी पित असाल, तर कॅलरी आणि चरबी कमी करायला त्याची मदत होऊ शकते. जेवण झाल्यानंतर साधारण अर्ध्या तासाने गरम पाणी पिण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. 

३. भूक होते कमी

गरम पाणी पिण्याचा सर्वात मोठा फायदा हा की त्यामुळे अनावश्यक भूकेचं प्रमाण कमी होतं. हंगर क्रेव्हिंगपासून आपल्याला मुक्तता मिळते. भूक कमी लागल्यामुळे कमी अन्न खाल्लं जातं आणि त्यामुळे आपोआपच वजन कमी होण्यास सुरुवात होते. 

अधिक वाचा - How to prevent acid reflux: जेवल्यानंतर येतात पित्ताचे ढेकर? ‘या’ अंगावर झोपून पाहा

४. पोट होईल साफ

दररोज गरम पाणी पिणाऱ्यांना अपचन, गॅस, पोट साफ न होणे यासारखे विकार जडत नाहीत. त्यांची पचनक्रिया चांगली राहते आणि नियमित पोट साफ होतं. त्यामुळे वजन कमी व्हायला मदत होते.

डिस्क्लेमर - सामान्यज्ञानाच्या आधारे देण्यात आलेल्या या काही साध्या टिप्स आहेत. तुम्हाला याबाबत काही गंभीर समस्या असतील, तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी