Black Water Benefits: विराट कोहलीदेखील आहे ‘ब्लॅक वॉटर’चा चाहता, जाणून घ्या फायदे

अभिनेत्री अनुष्का शर्मा, मलायका अरोरा, श्रुती हसन, करन जोहर यासारख्या अनेक सेलेब्रिटींनी आपण आपल्या घरी ‘ब्लॅक वॉटर’ पित असल्याचं जाहीर केलं आहे. ब्लॅक वॉटर म्हणजे काय, याबाबत अनेक लोक सध्या इंटरनेटवर सर्च करत आहेत.

Black Water Benefits
ब्लॅक वॉटर म्हणजे काय रे भाऊ?  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • सध्या अनेक सेलेब्रिटी पित आहेत ‘ब्लॅक वॉटर’
  • आरोग्य सुधारण्यासाठी होते मदत
  • पीएच लेव्हल जास्त असल्याने वाढते प्रजननक्षमता

Black Water Benefits: क्रिकेट आणि बॉलिवूडमधील अनेक सेलेब्रिटी (Celebrity) हे आपल्या फिटनेससाठी (Fitness) अनेक प्रयत्न करत असतात. काहीजण जिममध्ये जाऊन तासन्‌तास घाम गाळतात, तर काहीजण योगा आणि जॉगिंग करणं पसंत करतात. परिणामकारक डाएटसाठी हे सेलेब्रिटी वेगवेगळे प्रयोग करत असल्याचंही दिसून आलं आहे. सध्या आपल्या फिटनेससाठी ब्लॅक वॉटर (Black Water) पित असल्याचं गेल्या काही दिवसांत दिसून येत आहे. आपल्या घरी नियमितपणे ब्लॅक वॉटरचं सेवन करून फिटनेस राखण्याचा प्रयत्न अनेकजण करतात. अभिनेत्री अनुष्का शर्मा, मलायका अरोरा, श्रुती हसन, करन जोहर यासारख्या अनेक सेलेब्रिटींनी आपण आपल्या घरी ‘ब्लॅक वॉटर’ पित असल्याचं जाहीर केलं आहे. ब्लॅक वॉटर म्हणजे काय, याबाबत अनेक लोक सध्या इंटरनेटवर सर्च करत आहेत. जाणून घेऊया, हे ब्लॅक वॉटर म्हणजे काय आणि त्याचे आपल्या आरोग्यावर नेमके काय परिणाम होतात. 

ब्लॅक वॉटर म्हणजे काय?

ब्लॅक वॉटर म्हणजे काय, हे सर्वप्रथम समजून घेण्याचा प्रयत्न करूया. हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार, ब्लॅक वॉटर हे अल्कलाईन बेस्ड पाणी असतं. याची PH लेव्हल नॉर्मल पाण्यापेक्षा जास्त असते. हे पिल्यामुळे शरीरातील ॲसिड न्यूट्रलाईज्ड होण्याची शक्यता असते. साध्या पाण्याचा पीएच 7 असतो तर ब्लॅक वॉटरच्या पीएचची पातळी 8 ते 9 एवढी असते. यात अनेक मिनरल्स आणि अँटिऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे हे पाणी अधिक आरोग्यदायी असतं. हे पाणी नैसर्गिकही असतं आणि इलेक्ट्रोलिसिस प्रक्रियेतून तयार करण्यात येतं. 

ब्लॅक वॉटरचे फायदे

ब्लॅक वॉटरमुळे आपल्या आरोग्यावर अनेक सकारात्मक परिणाम होत असतात. जाणून घेऊया यामुळे होणाऱ्या फायद्यांविषयी. 

अधिक वाचा - E Cigarette side effects: ई-सिगरेटमुळे हृदयरोगाचा धोका, धूर काढण्याचा नाद पडेल महागात

पचनशक्ती वाढते

हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार ब्लॅक वॉटर पिल्यामुळे शरीराची पचनशक्ती वाढायला मदत होते. गुड गट बॅक्टेरिया वाढण्यास मदत होते, जे पचनशक्ती सुधारण्यासाठी कारणीभूत असतं. ब्लॅक वॉटरची पीएच लेव्हल जास्त असल्यामुळे शरीरातील अतिरिक्त ॲसिड न्यूट्रलाईज करण्यासाठीही त्याचा उपयोग होतो. 

त्वचा होते गोरी

ब्लॅक वॉटर पिण्यामुळे आपल्या शरीरातील मेलॅलिन साठण्याचं प्रमाण कमी होतं. मेलॅलिनमुळे आपल्या त्वचेचा रंग गडद होत असतो. ब्लॅक वॉटर पिण्यामुळे पिगमेंटेशनची समस्या दूर होण्यासही मदत होते. याचं सेवन करण्याने आपली त्वचा चमकदार आणि तुकतुकीत बनते. 

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

वेगवेगळ्या आजारांंशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्तीची आवश्यकता असते. कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती किती महत्त्वाची आहे, हे आपणा सर्वांनाच समजलं. ब्लॅक वॉटरमध्ये असणारे अँटि ऑक्सिडंट्स अनेक विकार दूर करायला मदत करतात. 

फर्टिलिटीची समस्या होते कमी

शरीरातील आम्लाची पातळी कमी झाल्यामुळे प्रजननक्षमता वाढायला त्याचा उपयोग होतो. 

अधिक वाचा - Desi Ghee Benefits: चेहरा बनवा तुकतुकीत आणि चमकदार, ‘देशी तुपा’चा असा करा वापर

अँटि एजिंग

ब्लॅक वॉटर पिण्यामुळे चिरतरुण राहायला मदत होते. विशेषतः मध्यमवयीन लोक यामुळे कमी वयाचे दिसतात आणि बराच काळ यंग राहतात. 

डिस्क्लेमर - ब्लॅक वॉटरच्या फायद्यांबाबतच्या या काही सामान्य टिप्स आणि निरीक्षणं आहेत. याबाबत तुम्हाल काही प्रश्न असतील, तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी