ICC World Cup 2019: फिट राहण्यासाठी विराट कोहलीचा स्पेशल वेगन डाएट 

तब्येत पाणी
Updated Jun 05, 2019 | 11:50 IST | टाइम्स नाऊ मराठी

Virat Kohli: टॉप क्रिकेट खेळाडूमध्ये टीम इंडियाचा बॅट्समन विराट कोहली आपल्या वेगन डाएटमुळे नेहमीच चर्चेत असतो. विराट गेल्या बऱ्याच महिन्यांपासून वेगन डाएटवर आहे. जाणून घ्या काय आहे वेगन डाएट आणि त्याचे प्रकार. 

Virat Kohli
फिट राहण्यासाठी विराट कोहलीचा स्पेशल वेगन डाएट  

तसं बघायला गेलं तर जगभरात मासांहारी खाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मात्र शाकाहारी जेवणासाठी ही लोकांची संख्या ही काही कमी नाही आहे. सध्या सामान्य लोकं शाकाहारी जेवण म्हणजेच वेगन डाएटला जास्त महत्त्व द्यायला लागले आहेत. बॉलिवूड कलाकार आणि क्रिकेटर्संचा कल वेगन डाएटच्या दिशेनं वाढताना दिसत आहे. ते संपूर्ण शाकाहारी बनत आहेत. 

जर का आपण जगभरातल्या टॉप क्रिकेट खेळाडूंमध्ये टीम इंडियाचा बॅट्समन आणि कॅप्टन विराट कोहली सध्या आपल्या वेगन डाएटवरून खूप चर्चेत आहे. विराट कोहली गेल्या काही महिन्यांपासून वेगन डाएट करत आहे आणि हाच त्याच्या फिटनेसचं रहस्य आहे. तर जाणून घेऊया काय आहे वेगन डाएट. हा डाएट किती प्रकारचा असतो आणि त्याचे फायदे काय आहेत. 

Virat Kohli

काय आहे वेगन डाएट 

वेगन डाएटचा अर्थ शाकाहारी म्हणजेच वनस्पती समृध्द अन्न असा आहे. दुग्ध आणि प्राणी उत्पादनांशिवाय खाद्यपदार्थांना वेगन डाएट म्हणतात. काही लोक जीवित हिंसा टाळण्यासाठी प्राण्यांचे मांस खाणं पूर्णपणे सोडून देत आहेत. काही ठिकाणी संक्रामक रोग टाळण्यासाठी लोकं शाकाहारी अन्नाला महत्त्व देत आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

There's no ideal way to put in hard work. Everyday is an opportunity. Stay fit stay healthy!

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

वेगन डाएट करणारे लोकं दूध, दही आणि चीज यांसारख्या दुग्धजन्य पदार्थ खात नाहीत. ते हिरव्या भाज्या, फळे, धान्य आणि फळे यावर पूर्णपणे अवलंबून असतात. शरीराला या खाद्य पदार्थांमधून आवश्यक पोषक तत्त्वे देखील मिळतात. कदाचित लोक वेगन डाएट घेण्याची हीच कारणं आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Coffee at home tastes even better.

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

  • वेगन डाएटचे प्रकार 

होल- फूट वेगन डाएट 

फळं, भाजी, संपूर्ण धान्य, बीन्स, अक्रोड आणि बिया अन्नधान्य वैगन डाएटच्या अंतर्गत येतात. 

रॉ-फूड वेगन डाएट 

या डाएटच्या अंतर्गत कच्ची फळं, भाज्या, अक्रोड, बियाणे आणि वनस्पती आधारित अन्न येतात. साधारणपणे हे पदार्थ 118 डिग्री तापमानाखाली शिजवले जातात. 

80/10/10 वेगन डाएट 

हा रॉ फूड वेगन डाएट आहे. याच्या अंतर्गत कमी चरबीयुक्त पदार्थ जसं की, बदाम, एवोकॅडो, कच्च फळं आणि हिरव्या पालेभाज्या येतात. 

स्टार्च घोल (Starch solution)

या डाएट प्रकारच्या अंतर्गत उच्च कार्बोहायड्रेट आणि शिजलेले स्टार्च असलेल्या शाहाकारी पदार्थांचा समावेश होतो. ज्यात बटाटा, भात आणि कॉर्न याचा समावेश केला जाऊ शकतो. 

थ्राइव डाएट 

हा असा एक वेगन डाएटचा प्रकार आहे की जो वनस्पतींवर आधारित आहे. लोक याला कच्च, अर्ध शिजलेलं किंवा कमी तापमानात शिजवून खातात. याला रॉ फूड वेगन डाएट सुद्धा म्हटलं जातं. 

४ वाजेपर्यंतचं रॉ- फूड 

हे कमी चरबी असलेलं शाकाहारी आहार आहे. हे एक प्लांन्ट फूड असतं. जे रात्रीच्या जेवणानंतर शिजवून खाल्लं जातं. दुपारी चार वाजेपर्यंत कच्चा खाद्य पदार्थांचं सेवन केलं जातं. 

वेगन डाएटचे फायदे

वेगन डाएटचे अनेक महत्त्वपूर्ण फायदे आहेत. हे डाएट केल्यानं वजन वाढत नाही आणि वजन नियंत्रित राहतं. हे डाएट शरीराला सर्व आवश्यक पोषक तत्त्व देतं. याव्यतिरिक्त वेगन डाएट केल्यानं हृदयरोग, रक्तदाब आणि कर्करोग यांसारख्या रोगांचा धोका कमी असतो. वेगन डाएट घेतल्याने पचनक्रिया आणखी चांगली होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
ICC World Cup 2019: फिट राहण्यासाठी विराट कोहलीचा स्पेशल वेगन डाएट  Description: Virat Kohli: टॉप क्रिकेट खेळाडूमध्ये टीम इंडियाचा बॅट्समन विराट कोहली आपल्या वेगन डाएटमुळे नेहमीच चर्चेत असतो. विराट गेल्या बऱ्याच महिन्यांपासून वेगन डाएटवर आहे. जाणून घ्या काय आहे वेगन डाएट आणि त्याचे प्रकार. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola