Best Veg Source Of Vitamin B12: व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी किंवा व्हिटॅमिन-सी प्रमाणे, व्हिटॅमिन-बी12 देखील तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. शरीरात त्याची कमतरता अनेक गंभीर समस्यांना आमंत्रण देऊ शकतात. व्हिटॅमिन-बी12 च्या कमतरतेमुळे तुम्हाला शारीरिक आणि मानसिक विकारांना सामोरे जावे लागू शकते. ज्यामध्ये रक्ताची कमतरता किंवा एनिमिया, मज्जातंतूंचे नुकसान, यांसारख्या मानसिक आरोग्याशी संबंधित विकारांचा धोका असू शकतो. (Vitamin B-12 rich vegetarian foods)
तुम्ही जर मांस-मच्छी खात नसाल तर तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन-बी12 ची कमतरता मोठ्या प्रमाणात भासू शकते. अशावेळी बी- 12 जीवनसत्वाची कमतरता खालील शाकाहारी पदार्थ भरून काढू शकतात.
अधिक वाचा : Ramadan 2023: रमजानमध्ये उपवास केल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्याला होतो मोठा फायदा
मांसाहारी पदार्थांमध्ये व्हिटॅमिन-बी 12 मुबलक प्रमाणात आहे, असे म्हंटले जाते. अर्थात हे खरे आहे पण अनेक शाकाहारी पदार्थांमध्येही याचे प्रमाण चांगले असते. या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला व्हिटॅमिन-बी12 निरोगी आरोग्यासाठी किती आवश्यक आहे, त्याच्या कमतरतेमुळे शरीरात कोणती लक्षणे जाणवू शकतात आणि कोणत्या शाकाहारी पदार्थांमध्ये हे पोषकतत्व मुबलकप्रमाणात मिळेल यांची माहिती देणार आहोत.
अधिक वाचा : Health Alert: 2030 पूर्वी मीठ बनू शकते लाखो लोकांच्या मृत्यूचे कारण!
हे लक्षात असू द्या की, शरीर व्हिटॅमिन-बी 12 ची निर्मिती करु शकत नाही, ते आपल्याला अन्नातून मिळवावे लागते. शरीराच्या चांगल्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन बी 12 ने परिपूर्ण अशा पदार्थांचे सेवन करणे अत्यंत गरजेचे आहे.
दही-
एक कप दही पासून जवळपास 28 टक्के व्हिटॅमिन बी 12 शरीराला मिळते.
दूध
दुधात व्हिटॅमिन बी 12 तसेच प्रथिने, कॅल्शियम आणि खनिजे असतात. एक कप लो फॅट दूध तुम्हाला 1.2 एमसीजी व्हिटॅमिन बी 12 देते.
सिरियल्स पदार्थ
ओट्स, डाळीची भरडी तसेच इतर तृणधान्यांमध्ये व्हिटॅमिन बी 12 चा साठा मोठ्याप्रमाणात असतो. तसेच फोलेट, लोह आणि ए जीवनसत्व देखील यात जास्तप्रमाणात असते.
फोर्टिफाइड नॉन-डेअरी दूध
एक कप सोया दूध किंवा बदामाच्या दुधात 2.1 एमसीजी प्रमाणात व्हिटॅमिन बी 12 असते.
अंडी
अंडी हे व्हिटॅमिन बी 12 चे मुख्य स्त्रोत आहे. तसेच त्यामधून प्रथिने आणि कॅल्शियम देखील मोठ्या प्रमाणात मिळते. एका अंड्यातून तुम्हाला 0.6 एमसीजी इतके व्हिटॅमिन बी 12 मिळून जाईल.
* टीप - सदर लेख तुमच्या सामान्य माहितीसाठी देण्यात आला असून, आरोग्यविषयक कोणत्याही पद्धतीचा अवलंब करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला विचारात घ्या.