White Hair: या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होतात केस पांढरे; जाणून घ्या यावरील काही खास उपाय

Vitamin B12 Deficiency Leads To Premature White Hair । वयाचा एक विशिष्ठ आकडा ओलांडल्यानंतर केस पांढरे होणे ही समस्या सामान्य गोष्ट आहे. पण आजकाल त्याचा वयाशी काहीही संबंध नाही. आता लहान मुलांपासून ते २५ वर्षांपर्यंतच्या तरूण मुलांचे केस पांढरे होत आहेत.

Vitamin B12 deficiency causes white hair
या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होतात केस पांढरे, वाचा सविस्तर   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • वयाचा एक विशिष्ठ आकडा ओलांडल्यानंतर केस पांढरे होणे ही समस्या सामान्य गोष्ट आहे.
  • व्हिटॅमिन बी-१२ च्या कमतरतेमुळे केस पांढरे होतात.
  • त्यासाठी सकस आहार घेणे गरजेचे आहे.

Vitamin B12 Deficiency Leads To Premature White Hair । मुंबई : वयाचा एक विशिष्ठ आकडा ओलांडल्यानंतर केस पांढरे होणे ही समस्या सामान्य गोष्ट आहे. पण आजकाल त्याचा वयाशी काहीही संबंध नाही. आता लहान मुलांपासून ते २५ वर्षांपर्यंतच्या तरूण मुलांचे केस पांढरे होत आहेत. लहान वयात केस पांढरे होण्यामागे अनुवांशिक कारणे असली तरी ही एक गंभीर समस्या आहे. आहार आणि अव्यवस्थित जीवनशैलीमुळे हे होत असल्याचे दिसून येते. (Vitamin B12 deficiency causes white hair). 

केसांना पोषण मिळत नाही

दरम्यान आता कमी वयात केस पांढरे झाल्यास काही काळजी करण्याची गरज नाही. कारण त्यासाठी सर्वप्रथम त्याच्या मुळाशी जावे लागेल, गरज पडल्यास शरीरात कोणत्या पोषक तत्वांची कमतरता आहे हे पाहण्यासाठी चाचणी करून घ्यावी. अनेकदा आपण सकस आहाराकडे दुर्लक्ष करतो, त्याचा परिणाम आपल्या केसांच्या आरोग्यावर होतो, जर एखाद्या विशिष्ट जीवनसत्वाची कमतरता असेल तर केस परिपक्व होऊ लागतात.

अधिक वाचा : युपीएसएसीच्या निकालाची यादी, टॉपर श्रुतीला 54.57% गुण

व्हिटॅमिन बी-१२ च्या कमतरतेचे लक्षण 

जर तुमचे केस लवकर पांढरे होत असतील तर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी-१२ ची कमतरता असण्याची दाट शक्यता आहे. अशा परिस्थितीत तुमच्या आहारामध्ये पोषक आहाराचा समावेश करा. कारण याच्या कमतरतेमुळे केस केवळ पांढरेच होत नाहीत तर विशिष्ट कालावधीच्या आधीच गळायला देखील सुरूवात होते. 

केस पांढरे होण्यापासून कसे थांबवायचे? 

कमी वयात पांढरे केस होणाऱ्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे खूप गरजेचे आहे. केस अकाली पांढरे होण्यापासून रोखण्यासाठी तुम्ही खालील उपायांचा अवलंब करू शकता.

  1. जीवनातील तणाव कमी करा.
  2. नेहमी सकस आहार खा.
  3. तेलकट पदार्थांचे सेवन करणे टाळा. 
  4. सिगारेट आणि दारू यांपासून दूर राहा.
  5. दररोज शाम्पू वापरू नका.
  6. टाळूवर खोबरेल तेल लावा. 

व्हिटॅमिन बी-१२ मिळवण्यासाठी या पदार्थांचे सेवन करा 

  1. अंडी
  2. दही
  3. दूध 
  4. पनीर
  5. ब्रोकली
  6. मासे

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी