Diet For Immunity: क जीवनसत्व वाढवते रोगप्रतिकारशक्ती, 'या' पाच गोष्टींचा आहारात करा समावेश

तब्येत पाणी
Updated May 03, 2021 | 15:23 IST | टाइम्स नाऊ मराठी

कोरोना संकटाच्या या काळात रोगप्रतिकारशक्ती ही खूप महत्त्वाची बाब ठरत आहे. आपण जितका आरोग्यपूर्ण आहार घ्याल तितकी आपली रोगप्रतिकारशक्ती वाढेल.. हे काही पदार्थ रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करू शकतात.

Orange fruit
रोगप्रतिकारशक्ती वाढवते क जीवनसत्व, या पाच गोष्टींचा आहारात करा समावेश  |  फोटो सौजन्य: Indiatimes

थोडं पण कामाचं

  • रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी जीवनसत्व क महत्वाचे
  • उत्तम रोगप्रतिकारशक्तीसाठी या पाच गोष्टी घ्या आहारात
  • उत्तम रोगप्रतिकारशक्तीसाठी चांगला आहार आहे महत्वाचा

नवी दिल्ली  : रोगप्रतिकारशक्ती (Immunity) वाढवण्यासाठी (boosting) जीवनसत्व क (vitamin C) मुबलक प्रमाणात असलेल्या पदार्थांचे सेवन (consume) करण्याचा सल्ला (advice) वारंवार दिला जातो. जाणून घ्या कोणती आहेत अशी फळे (fruits) ज्यात  क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते. जर आपण या फळांचे सेवन दररोज केले  तर आपल्याला भरपूर प्रमाणात  क जीवनसत्व मिळते आणि आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत मिळते. जाणून घ्या कोणती आहेत ही पाच फळे.

संत्रे

संत्र्यांमध्ये मुबलक प्रमाणात  क जीवनसत्व असते. आपण दररोज संत्र्याचा रस पिऊ शकता. जर आपल्याला नैसर्गिक पद्धतीने रोगप्रतिकारशक्ती वाढवू इच्छित असाल तर रोज संत्रे खा. यात तंतूमय पदार्थ आणि थियामिन आणि पॉटॅशियम अशी खनिजे भरपूर प्रमाणात असतात जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच इतरही अनेक समस्यांपासून आराम देतात.

अननस

अननस एक असे फळ आहे जे गरमीच्या दिवसात आपले मस्तक थंड ठेवण्यात आणि शरीर ताजेतवाने ठेवण्याचे काम करते. या फळाचे सेवन केल्याने गरमीच्या दिवसातील अनेक आजार आपल्यापासून दूर राहतात.

ढोबळी मिरची

एक कप कापलेल्या ढोबळी मिरचीत संत्र्याच्या साधारण तिप्पट म्हणजेच 190 मिलिग्रॅम जीवनसत्व क असते. याशिवाय अ जीवनसत्व देखील भरपूर प्रमाणात असते जे डोळ्यांसाठी फायदेशीर असते. यात तंतूमय पदार्थही भरपूर असतात.

पपई

संशोधनात असे सांगण्यात आले आहे की, पपई खाल्ल्याने आपली पचनक्रिया सुधारते, आपल्या त्वचेत चमक येते आणि आपली सायनसची समस्याही दूर होते. आपल्या हाडांसाठीही हे चांगले असते. एक कप पपईत 88.3 मिलिग्रॅम क जीवनसत्व असते.

लिंबू

लिंबू हे एक फळ मानले जाते. कारण यात बिया असतात. पण वनस्पती विज्ञानात लिंबाला भाजी म्हटले आहे. सालासोबतच्या एका लिंबात 83 मिलिग्रॅम क जीवनसत्व असते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी