Waking up in the night : रोज रात्री ठराविक वेळीच जाग येते? या गोष्टी तपासून पाहा

रात्री जाग येणं हे सामान्य आहे. मात्र जर रोज ठराविक वेळेत जाग येत असेल आणि पुन्हा झोपच लागत नसेल, तर मात्र हे गंभीर लक्षण मानलं जातं.

Waking up in the night
रोज रात्री ठराविक वेळीच जाग येते?  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • रात्री ठराविक वेळी रोज जाग येते?
  • जाग आल्यावर पुन्हा झोप लागत नाही?
  • कारण असू शकतं गंभीर

Waking up in the night : रात्री झोपल्यानंतर (Sleep) सकाळ होण्यापूर्वी कुठल्या ना कुठल्या कारणाने जाग येण्याच्या (Waking up) घटना अनेकदा घडत असतात. कधी तहान लागल्यामुळे आपल्याला जाग येते, तर कधी अचानक लघवीला लागल्याने जाग येते. मात्र त्यानंतर ती ती कामे केल्यानंतर काही मिनिटांतच पुन्हा आपल्याला झोप लागते. कधी कधी कुठल्या तरी विशिष्ट आवाजाने किंवा डोअरबेल वाजल्याने किंवा भयंकर स्वप्न पडल्यामुळेदेखील आपल्याला जाग येते आणि त्यानंतर काही वेळात पुन्हा झोप लागते. थोडक्यात, कुठल्याही कारणाने जाग आली तरीही पुन्हा काही वेळात झोप लागत असेल, तर ती सामान्य बाब मानली जाते. मात्र जर रोज ठराविक वेळेत तुम्हाला जाग येत असेल आणि त्यानंतर काही केल्या झोप लागत नसेल, तर मात्र ही चिंता करण्यासाठी गोष्ट असल्याचं सांगितलं जातं. 

रोज येते जाग

काही व्यक्तींना रोज झोप लागल्यानंतर एका ठराविक वेळी जाग येते. जाग येण्याची ही वेळ प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळी असू शकते. मात्र त्याच वेळी त्या व्यक्तीला जाग येत असेल आणि पुन्हा झोप लागण्यात अडथळा येत असेल, तर ते स्पील ॲपनियाचं लक्षण असू शकतं, असं तज्ज्ञांचं मत आहे. अशा प्रकारे अर्ध्या झोपेतून जागं होण्याची सवय तुमच्या मेंदूला लागली असून ते गंभीर लक्षण असल्याचं मानलं जातं. 

काय आहे लक्षण?

रात्री जाग येण्यात काहीच गैर नाही. रोज जाग येत असेल आणि त्यानंतर काही वेळाने पुन्हा झोप लागत असेल तरीदेखील त्यात फार गंभीर काही मानलं जात नाही. मात्र रोज ठराविक वेळी जाग येणे आणि त्यानंतर बराच वेळ झोप न लागणे हे लक्षण सातत्याने काही दिवस दिसत असेल तर मात्र ते इन्सोम्नियाचं लक्षण असण्याची शक्यता आहे. 

अधिक वाचा - Beautiful Eyelashes : पापण्या लांब आणि घनदाट करण्यासाठी करा हे 5 घरगुती उपाय, वाढेल डोळ्यांचं सौंदर्य

नेमकं काय होतं?

रात्री जाग आल्यानंतर झोप येत नसेल, तर ती नेमकं काय कारण त्यामागे आहे, हे तपासण्याची गरज असते. जर झोपेतून जाग आल्यावर तुम्हाला चिंता, अस्वस्थता, व्याकूळता, निराशा अशा भावना दाटून येत असतील तर व्यक्तीच्या शरीरात सिंपथेटिक नर्व्हस सिस्टिम कार्यान्वित होत असते. अशा परिस्थितीत आपला मेंदू स्लीप मोडमधून जागृतावस्थेत परावर्तित होतो. आपला मेंदू अधिक सक्रीय होतो आणि हृदयाच्या ठोक्यांची गतीदेखील वाढते. त्यामुळेच पुन्हा झोप लागण्यात अडथळे निर्माण होतात. 

ॲपनियाची शक्यता

जर श्वास घेण्यास अडथळा आल्यामुळे तुम्हाला झोपेतून जाग येत असेल तर हे ॲपनियाचं लक्षण असू शकतं. श्वास घेण्याच्या प्रक्रियेत अडथळे आल्यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होते. एका विशिष्ट लेव्हलपर्यंत ऑक्सिजन पातळी खालावल्यामुळे आपल्याला जाग येते. हृदयाच्या गतीवरही याचा परिणाम होत असतो. 

अधिक वाचा - Green Coffee: शरीरातील चरबी कमी करण्यासाठी ग्रीन कॉफी Best पर्याय, अशी बनवा घरच्या घरी

काय आहे उपाय?

कुठल्याही कारणाने जाग आली तरी अगोदर शांत व्हा. 15 ते 20 मिनिटं ध्यान करा आणि झोपण्याचा प्रयत्न करा. त्यानंतरही झोप येत नसेल तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज आहे. 

डिस्क्लेमर - झोपेतून जाग येण्याची ही काही सामान्यपणे चर्चेत असणारी कारणं आहेत. तुम्हाला झोपेसंबंधी काही गंभीर समस्या असतील, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेण्याची गरज आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी