Health Tips: झोपण्यापूर्वी ‘या’ कामाची लावा सवय, भलेमोठे आजारही जातील पळून

रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपण्याची सवय अनेकांना असते. ही सवय महागात पडू शकते. मधुमेह आणि हृदयरोगासारखे आजार कायमस्वरुपी दूर ठेवायचे असतील, तर रात्रीच्या जेवणानंतर दहा ते वीस मिनिटे चालण्याचा सल्ला दिला जातो.

Health Tips
झोपण्यापूर्वी ‘या’ कामाची लावा सवय  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • रात्रीच्या जेवणानंतर चालणे आवश्यक
  • दहा मिनिटांच्या वॉकने होतात अनेक फायदे
  • अनेक गंभीर आजार राहतील दूर

Health Tips: गेल्या काही वर्षात भारतातील मधुमेहींची (Diabetic patients) संख्या वाढत असल्याचं चित्र आहे. चुकीची लाईफस्टाईल (Lifestyle), खाण्यापिण्याच्या अयोग्य वेळा, आहारात चुकीच्या पदार्थांचा समावेश असणे, झोपण्याच्या अनियमित वेळा, अपुरी झोप यासारख्या अनेक कारणांमुळे देशातील मधुमेहींची संख्या वाढत असल्याचं चित्र आहे. मधुमेह हा असा आजार आहे, जो एका विशिष्ट टप्प्यानंतर कधीही बरा होत नसल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे हा आजार होऊ नये, यासाठी काळजी घेण्याची गरज असते. त्याचप्रमाणे साखरेची शरीरातील पातळी वाढू लागताच, तातडीने त्यावर उपाययोजना करण्याची गरज असते. आरोग्यावर परिणाम करणारे बरेचसे घटक हे आपल्या सवयीतून निर्माण होतात. रोजच्या जगण्यातील काही चुकीच्या सवयींचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. अशा सवयी वेळीच ओळखणे आणि त्या बदलणे, हाच त्यावरील उत्तम उपाय मानला जातो. जाणून घेऊया, अशा काही सवयी, ज्या प्रत्येकाला आरोग्यपूर्ण जीवनाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात. 

रात्रीच्या जेवणानंतर करा शतपावली

अनेकांना रात्री उशिरा जेवण झाल्यानंतर लगेचच झोपण्याची सवय असते. त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचं नीट पचन होत नाही. परिणामी शरीरात चरबी साठत जाते आणि अंतिमतः लठ्ठपणा आणि मधुमेहाकडे प्रवास सुरू होतो. रात्रीच्या जेवणानंतर काही वेळ चालण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. त्यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारते आणि अन्नाचं पचन होण्यास मदत होते. त्याशिवाय यामुळे रोगप्रतिकारक शक्तीतही वाढ होते आणि बऱ्याच आजारांपासून शरीराचं नैसर्गिकरित्याच संरक्षण होण्यास मदत होते. त्यामुळे रात्रीच्या जेवणानंतर तुम्ही तुमच्या जवळच्या पार्कमध्ये फेरफटका मारू शकता किंवा जवळपास पार्क नसेल, तर घराच्या गच्चीवरही फिरू शकता. 

अधिक वाचा - Men Health Tips: कायमस्वरुपी तरुण आणि फिट राहायचे असेल तर पुरुषांनी करावी ही गोष्ट

निद्रानाशाचा त्रास होतो दूर

रात्रीच्या जेवणानंतर चालण्यामुळे निद्रानाशाचा त्रास दूर होण्यास मदत होते. कॅलरी बर्न करायला आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवायला त्यामुळे मदत मिळते. जेवणानंतर साधारण दहा ते वीस मिनिटे चालण्याचा आरोग्यावर चांगला परिणाम होत असल्याचं आतापर्यंतच्या वेगवेगळ्या अभ्यासातून दिसून आलं आहे. रोजच्या रोज तर तुम्ही झोपण्यापूर्वी पंधरा ते वीस मिनिटांचा वॉक घेऊन आलात, तर तुमच्या झोपेचा दर्जा सुधारतो आणि त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही ताजेतवाने राहता. 

अधिक वाचा - Crack Heels: टाचांना तडे गेल्यास करा हा हिंगाचा सोपा घरगुती उपाय, लगेच दिसेल फरक

मधुमेहाचा त्रास होतो कमी

रात्रीच्या जेवणानंतर किमान दहा मिनिटं जरी तुम्ही चालून आलात, तरी तुम्हाला मधुमेह होण्याचा धोका कमी होतो. साधारणतः जेवणानंतर अधिकाधिक 20 मिनिटे चालण्याचा सल्ला दिला जातो. रोजच्या रोज रात्रीच्या जेवणानंतर तुम्ही चालायला सुरुवात केलीत, तर मधुमेहाचा धोका कमी होण्यास मदत होते. 

डिस्क्लेमर - रात्रीच्या जेवणानंतर चालल्यामुळे होणाऱ्या फायद्यांबाबतच्या या काही सामान्य टिप्स आहेत. तुम्हाला याबाबत काही गंभीर प्रश्न अथवा शंका असतील, तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी