How to boost fertility:निरोगी बाळ हवे? मग पती-पत्नीने नियंत्रित ठेवा वजन, या 5 गोष्टी वाढतात प्रजनन क्षमता

लठ्ठपणामुळे आयव्हीएफ उपचारातही अडथळा येतो. त्यामुळे स्त्रीच्या गर्भधारणेपूर्वी पुरुष जोडीदाराने 3 महिने त्याचे वजन नियंत्रित ठेवावे. कारण, वजन नियंत्रित ठेवल्यानंतरच तीन महिन्यांनी शरीरात निरोगी शुक्राणू तयार होऊ शकतात. तसेच वजन नियंत्रित ठेवल्याने पुरुषांच्या शुक्राणूंची गुणवत्ता आणि शुक्राणूंची संख्या वाढते. महिलांमध्ये वजन नियंत्रित राहिल्याने गर्भधारणेची शक्यता वाढते.

How to boost fertility
निरोगी बाळ हवे? मग पती-पत्नीने नियंत्रित ठेवा वजन  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • डॉक्टरांच्या मते, या जीवनशैलीतील बदलांचा अवलंब करण्यासाठी गर्भधारण करण्याच्या आधीचा काळ हा चांगला असतो.
  • महिलांमध्ये वजन नियंत्रित राहिल्याने गर्भधारणेची शक्यता वाढते.
  • वजन नियंत्रित ठेवल्यानंतरच तीन महिन्यांनी शरीरात निरोगी शुक्राणू तयार होऊ शकतात.

नवी दिल्ली :  संसार वाढविण्याचा विचार करत असलेल्या नवजोडप्यांसाठी हा खूप महत्त्वाचा लेख आहे. लग्न झाल्यानंतर घरातील ज्येष्ठ मंडळी बाळासाठी पाठी लागत असतात. परंतु आई-वडील (parents)होण्याआधी पती-पत्नीने आपल्या आरोग्याकडे लक्ष ठेवणे आवश्यक असते. होणारे बाळ हे निरोगी असावे असं वाटत असेल पालकांनी आपल्या आरोग्याकडे (health)लक्ष द्यायला हवे. करिअरमागे धावत असलेल्या मुला-मुलीचे वय वाढत असते. त्यामुळे ते लग्नाकडे दुर्लक्ष करतात. वय वाढल्यानंतर कपल्सचे फर्टिलिटीच्या (Fertility)  समस्या निर्माण होत असतात. वयाची 40 पूर्ण झाली तर गर्भधारणाची शक्यता कमी होत असते.  जर पालकांना फर्टिलिटी सुधारत निरोगी बाळ हवे असेल तर वेळीच हे 5 काम केले पाहिजे. (Want a healthy baby? Then husband and wife control weight,these 5 things increase fertility)  

अधिक वाचा  : अंतिम सामन्यातही भारतासमोर पाकचं आव्हान?

प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी सर्वोत्तम वेळ कधी?

Pristyn Careच्या सह-संस्थापक आणि स्त्रीरोगतज्ञ डॉ. गरिमा साहनी म्हणाल्या की, प्रजनन क्षमता आणि गर्भधारणा सुधारण्यासाठी पोषण अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणूनच तुम्ही तुमच्या आहारासोबत जीवनशैली निरोगी बनवली पाहिजे.डॉक्टरांच्या मते, या जीवनशैलीतील बदलांचा अवलंब करण्यासाठी  गर्भधारण करण्याच्या आधीचा काळ हा चांगला असतो. जीवनशैलीतील बदल हे  स्त्रीच्या गर्भधारणेच्या 3 महिन्यांपूर्वी घडते. त्याच वेळी, प्रजनन क्षमता आणि गर्भातील बाळाचे आरोग्य मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. 

अधिक वाचा  : महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागू शकतात- उद्धव ठाकरे

पती-पत्नी वजन नियंत्रित करावे 

वजन वाढीमुळे महिलांचे हार्मोनल असंतुलित होत असतात. यामुळे ओव्हुलेशन समस्या आणि मासिक पाळीचे विकार होऊ शकतात. तर लठ्ठ पुरुषांमध्ये हार्मोनल आणि इरेक्शन डिसफंक्शन होणं या समस्या साधारण आहेत. लठ्ठपणामुळे आयव्हीएफ उपचारातही अडथळा येतो. त्यामुळे स्त्रीच्या गर्भधारणेपूर्वी पुरुष जोडीदाराने 3 महिने त्याचे वजन नियंत्रित ठेवावे. कारण, वजन नियंत्रित ठेवल्यानंतरच तीन महिन्यांनी शरीरात निरोगी शुक्राणू तयार होऊ शकतात. तसेच वजन नियंत्रित ठेवल्याने पुरुषांच्या शुक्राणूंची गुणवत्ता आणि शुक्राणूंची संख्या वाढते. महिलांमध्ये वजन नियंत्रित राहिल्याने गर्भधारणेची शक्यता वाढते.

निरोगी आहार

सकस आहार घेतल्यास गर्भधारणेची शक्यता वाढते.या आहारात अँटिऑक्सिडंट्स, फायबर, प्री आणि प्रो-बायोटिक्स, निरोगी फॅट्स, संपूर्ण धान्य, द्रवपदार्थ, कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ असले पाहिजेत. मांसाहारी लोकही अंडी, मासे आणि चिकन खाऊ शकतात. प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी या पदार्थांव्यतिरिक्त सुका मेवा खाऊ शकतात. हे पदार्थ  आवश्यक प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे प्रदान करतात. महिलांनी विशेषतः पालक, ब्रोकोली, मेथी, इतर हिरव्या पालेभाज्या, रास्पबेरी, ब्लूबेरी, बीन्स, केळी, क्विनोआ आणि डांगराच्या बिया खाव्यात. तर लसूण खाल्ल्याने पुरुषांची फर्टिलिटी क्षमता वाढते. 

अधिक वाचा  : बनावट कर्जांना पडू नका बळी, बॅंक खाते होईल रिकामे

व्यायाम 

नियमित व्यायाम केल्याने हार्मोन्स संतुलित होतात. याव्यतिरिक्त, इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता सुधारते आणि तणाव कमी होतो. व्यायाममुळे  स्त्री-पुरुषांची प्रजनन क्षमता सुधारत असते. आयव्हीएफ करणार्‍या महिलांसाठी व्यायाम देखील महत्त्वपूर्ण आहे आणि हे  वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करत असते. 

या गोष्टी खाऊ नका

प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी तुम्ही चहा, कॉफी आणि कोल्ड्रिंक्स यांसारख्या कॅफिनयुक्त पदार्थांचे सेवन बंद केले पाहिजे. असे केल्याने बाळ निरोगी जन्माला येण्याची शक्यता वाढते. अनेक संशोधनानुसार, तणाव कमी करण्यासोबतच निरोगी जीवनशैलीचा अवलंब केल्याने महिलांची प्रजनन क्षमता 80 टक्क्यांपर्यंत वाढते. 

दारू पिऊ नका

अल्कोहोलच्या सेवनाने गर्भधारणा होण्यास विलंब होतो. याशिवाय न जन्मलेल्या बाळाच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो. जे पुरुष जास्त मद्यपान करतात, त्यांना नपुंसकता, शुक्राणूंची संख्या कमी होणे, सेक्स ड्राइव्ह कमी होणे यासारख्या समस्या उद्भवतात. या टिप्सच्या मदतीने तुम्ही योगा करून वयाच्या 40 वर्षांनंतरही प्रजनन क्षमता सुधारू शकता. 

डिस्क्लेमर: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी