डिलीव्हरीनंतर शिल्पा शेट्टीसारखी फिगर हवीये? फॉलो करा या टिप्स

तब्येत पाणी
Updated Nov 02, 2020 | 18:24 IST | टाइम्स नाऊ मराठी

Weight loss tips: आई बनल्यानंतर महिला आपल्या शरीराकडे लक्ष देऊ शकत नाही. ज्यामुळे डिलीव्हरीनंतर वाढलेले वजन कमी होऊ शकत नाही. 

shilpa shetty
डिलीव्हरीनंतर शिल्पा शेट्टीसारखी फिगर हवीये? फॉलो करा टिप्स 

थोडं पण कामाचं

  • मुलगा झाल्यानंतर साडेचार महिन्यानंतर शिल्पाने आपलेले वाढलेले वजन कमी करण्यासा सुरूवात केली होती.
  • शिल्पा शेट्टी फूडी आहे
  • फिगर मेंटेन ठेवण्यासाठी शिल्पा शेट्टीला खूप मेहनत घ्यावी लागली

मुंबई: शिल्पा शेट्टी(shilpa shetty) बॉलिवूडची सर्वात फिट मॉम्सपैकी(fit moms) एक आहे. तिची फिगर पाहून प्रत्येक आईला असे वाटत असेल की काश तिच्यासारखी माझी फिगर(figure) असती तर? डिलीव्हरीनंतर(after delievery) आणि प्रेग्नंसीच्या आधी फिट राहण्यासाठी आणि फिगर मेंटेन ठेवण्यासाठी शिल्पा शेट्टीला खूप मेहनत घ्यावी लागली. तुम्हीही तिच्यासाखा फिटनेस आणि फिगर मिळवू शकता. त्यासाठी तुम्हाला काही टिप्स फॉलो कराव्या लागतील. 

वेट ट्रेनिंग

शिल्पाच्या फिटनेसचे सिक्रेट आहे की ती आपल्या वर्कआऊटमध्ये वेट ट्रेनिंग जरूर करते. जर तुम्हाला वाटते की वेट ट्रेनिंगने पुरुषांसारखे मसल्स होतात तर तुम्ही चुकीचा विचार करता. 

ज्या महिला वर्कआऊटसाठी वेळ काढू शकत नाहीत अशा महिलांना शिल्पा दररोज जिने चढण्याचा तसेच बाहेर चालण्याचा सल्ला देते. आता फिट राहण्यासाठी तुम्ही कमीत कमी हे तर करूच शकता. 

किती खावे

शिल्पा शेट्टी फूडी आरहे. मात्र ती नेहमी हेल्दी डाएट घेते. शिल्पा व्हाईट राईसच्या ऐवजी ब्राऊन राईस खाते. सकाळी शिल्पा आवळा अथवा कोरफडीचा ज्यूस घेते. नाश्त्यामध्ये ती ब्राऊन शुगरच्या चहासोबत दलिया खाते. दुपारच्या खाण्यात ती ब्राऊन राइस अथवा रोटीसोबत डाळ आणि भाजी खाते. शिल्पा आपल्या लंचमध्ये फायबरयुक्त धान्याचा वापर करते. शिल्पाला चहा प्यायला खूप आवडते त्यामुळे ती सकाळी आणि संध्याकाळी एक कप चहा पिते मात्र दुपारच्या वेळेस ती एक कप ग्रीन टी पिते. रात्रीच्या जेवणात शिल्पा, सलाड, सूप आणि चितन घेते. आठवड्यातून एक दिवस कुल्फी, केक आणि गुलाबजामुन खाते. 

पोस्ट प्रेग्नंसी वेट लॉस

मुलगा झाल्यानंतर साडेचार महिन्यानंतर शिल्पाने आपलेले वाढलेले वजन कमी करण्यासा सुरूवात केली होती. यासाठी ती दिवसा सायकलिंग आणि वॉक करत असे. यामुळे स्टॅमिना वाढतो आणि मांसपेशी मजबूत होण्यास मदत होते. आठवड्यातून तीन वेळ २५ मिनिटे वॉक आणि सायकलिंग केल्यानंतर तीन आठवड्यानंतर शिल्पाने वेट ट्रेनिंग सुरू केले होते. आता ती आठवड्यातून पाच दिवस एक तास १५ मिनिटे एक्सरसाईज करत होती. 

शिल्पा म्हणजे की तुम्हाला कधीही हार मानली नाही पाहिजे. प्रेग्नंसीनंतर वाढडलेले वजन आहे ते कमी करण्यासाठी हार मानू नका. शिल्पाच्या फिटनेस रूटीनसाठी तुम्ही संतुलित आहार घेऊ शकता. शिल्पा शेट्टीने सांगितलेल्या या पोस्ट प्रेग्नंसी टिप्सच्या मदतीने तुम्ही प्रेग्ंनंसीमध्ये वाढलेले वजन घटवू शकता. यासाठी तुम्हाला हेल्दी डाएट आणि दररोज एक्सरसाईज करणे गरजेचे आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी