मुंबई : धावपळीच्या लाईफस्टाईलमुळे (Lifestyle) आणि चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयीमुळे अनेक पुरुष (Men) विविध आजारांनी(Diseases) ग्रस्त असतात. या समस्येतून सुटका मिळण्यासाठी विविध प्रकारच्या औषधांचा आधार घेतला जातो. मात्र या औषधांचा फायदा होण्याऐवजी त्यापासून होणारे नुकसानच अधिक असते. पुरुषांमध्ये येणारी कमजोरी त्यांच्या रोमॅण्टिक (Romantic) लाईफमध्ये सुद्धा नकारात्मक प्रभाव पाडत असते. त्यामुळे अशा प्रकारची औषध वापरण्यापेक्षा अनेक घरगुती उपायांची मदत घेऊन तुम्ही काही प्रमाणात का होईना पण या समस्येपासून स्वतःचा बचाव करू शकता.
कॅल्शियम, फायबर, झिंक, मॅग्नेशियम आणि आयर्न यांनी परिपूर्ण असणाऱ्या खारीकांचे सेवन करून पुरुष आपला स्टॅमिना वाढवू शकतात. शारीरिक रूपाने कमजोर आणि बारीक असणाऱ्या व्यक्तींसाठी खारीक जणू एखादे वरदानचं असते. रोज खारीकचे सेवन केल्याने तुमची पचनशक्ती सुद्धा सुधारते. खारीकच्या चांगल्या परिणामांसाठी तुम्ही खारीक पावडर बनवून दुधात मिसळून सुद्धा सेवन करू शकता.
मखना पुरुषांसाठी अतिशय लाभदायक मानले जातात हे एक आयुर्वेदिक हर्ब (Ayurvedic herb)आहे. कार्बोहायड्रेट, प्रोटीन, मिनरल, फॅट, फॉस्फरस अशा विविध तत्त्वांनी परिपूर्ण असणारे मखाने पुरुषांच्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरतात. रोज मखान्यांचे सेवन केल्यामुळे शरीरात टेस्टोस्टेरोन हार्मोन वाढतात. त्यामुळे पुरुषांच्या शरीरात असणारी कमजोरी मोठ्या प्रमाणात कमी होते. यांमध्ये कमी कॅलरी असतात आणि त्याच्यात फायबर अधिक प्रमाणात आढळून येते. ज्याच्या माध्यमातून शरीराला भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळतो. मखानांचे नियमित सेवन केल्यामुळे शरीरात असणारी कमजोरी दूर होते. पोषक तत्वांनी भरपूर असलेले दूध पुरुषांसाठी खूप मोठ्या प्रमाणात फायदेमंद ठरत असते. दररोज दूधाचे सेवन केल्याने स्टॅमिना वाढतो. दुधाचे नियमित सेवन केल्यामुळे पुरुष आपला स्टॅमिना बुस्ट करू शकतात.
खारीक आणि मखाने कमीत-कमी 2 ते 3 तास पाण्यात भिजत ठेवावे. त्यानंतर एक ग्लास दूध घेऊन ग्राईंडरमध्ये ओता, आता यामध्ये खारीक आणि मखाणे टाका. ग्राइंडर पाच मिनिट सुरू ठेवा आणि एक उत्तम ड्रिंक यापासून तयार होईल. दररोज याचे सेवन केल्याने काही दिवसातच याचे परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील.
टिप्स : वरील माहिती ही आयुर्वेदिक शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या विविध ग्रंथांच्या आधारे सांगण्यात आलेली आहे, परंतु प्रत्यक्ष उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.