Skin Care Tips: बहुतांश लोकांच्या शरीरावर स्ट्रेच मार्क्स असतात. वजन वाढीमुळे, वजन कमी झाल्याने तसेच गरोदरपण अशा अनेक कारणांमुळे स्ट्रेच मार्क्स येऊ शकतात. अशावेळी काही लोकं महागड्या स्किन केअर प्रोडक्ट्सचा वापर करून स्ट्रेच मार्क्स कमी करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, काही केल्या स्ट्रेच मार्क्स जात नाही. तुमच्यासोबत देखील असेच झाले आहे का? मग या घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही स्ट्रेच मार्क्सपासून सुटका करून घेऊ शकता. चला तर जाणून घेऊया स्ट्रेच मार्क्स दूर करण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय. (want to get rid of stretch marks for flawless skin follow these skin care home remedies )
अधिक वाचा : कांदा अनुदान पात्रतेसाठी ई-पीक पेरा नोंदीची अट शिथिल करा
त्वचेवरील स्ट्रेच मार्क्स काढण्यासाठी तुम्ही साखरेच्या स्क्रबचा वापर करू शकता. यामुळे त्वचेचे रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचेवरील स्ट्रेच मार्क्स कालांतराने कमी कमी होत जाते.
अँटी-ऑक्सिडंट युक्त अशी हळद स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. खोबरे तेलात १ चिमूट हळद मिसळून त्याची पेस्ट बनवा आणि ही पेस्ट स्ट्रेच मार्क्सवर लावा. हलक्या हातांनी मसाज करा. ज्यामुळे स्ट्रेच मार्क्स हळूहळू नाहीसे होतील.
अधिक वाचा : पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) मध्ये मिळणार आता दुहेरी व्याज!
खोबरेल तेल देखील स्ट्रेच मार्क्स दूर करण्यासाठी खूप चांगले माध्यम आहे. कोरफडीचा अर्क खोबरे तेलात मिसळून त्वचेवर लावा. यामुळे त्वचेवरील डागही कमी होतात आणि तुमची त्वचादेखील डागविरहीत होण्यास मदत होईल.
बदामाच्या तेलामध्ये व्हिटॅमिन ई असते, जे स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी खूप प्रभावी मानले जाते. बदामाच्या तेलाने जिथे स्ट्रेच मार्क्स आहेत तिथे दररोज मालिश करत रहा. यामुळे स्ट्रेच मार्क्स कमी होतील आणि तुमची त्वचा मुलायम होईल.
अधिक वाचा : Pune:डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वाहतूक व्यवस्थेत बदल
तुमची त्वचा स्ट्रेच मार्क्स फ्री करण्यासाठी, बेकिंग सोड्याचीही मदत घेऊ शकता. बेकिंग सोडामध्ये लिंबाचा रस मिसळून त्याची पेस्ट बनवून घ्या. ही पेस्ट स्ट्रेच मार्क्स असलेल्या जागेवर लावा.
चहाच्या झाडाच्या तेलाच्या मदतीने तुम्ही स्ट्रेच मार्क्सला कायमचा निरोप देऊ शकता. टी ट्री ऑइलमध्ये ऑलिव्ह ऑईल मिक्स करून स्ट्रेच मार्क्सवर लावा.
त्वचेवरील स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी तुम्ही कोरफडीच्या गरदेखील वापरू शकता. बदाम तेल किंवा खोबरे तेलात कोरफडीचे जेल मिसळा. आता हे मिश्रण स्ट्रेच मार्क्स असलेल्या जागेवर चांगले चोळा. थोड्या वेळाने ती जागा स्वच्छ पाण्याने धुवून काढा. यामुळे त्वचेला नैसर्गिक तेज येईल.
स्ट्रेच मार्क्सपासून मुक्त होण्यासाठी बटाट्याचा रस एक गुणकारी पर्याय आहे. बटाट्याच्या रसात हळद मिसळून स्ट्रेच मार्क्सवर लावा. यामुळे त्वचेवरील स्ट्रेच मार्क्स काही दिवसात नाहीसे होतात.