Belly Fat कमी करायचा आहे?, मग करा हे 5 सोपे वर्कआऊट; पटकन कमी होईल पोटाची चरबी

काही जण पोटाची वाढलेली चरबी पाहून अस्वस्थ होतात. पोटाचा घेर (Belly Fat) वाढल्यावर नवीन कपडे घालतानाही अवघडल्यासारखं वाटतं. पण आता चिंता करु नका, थोडं वर्कआऊट (Workout) करा.

Belly Fat
Want To Lose Belly Fat  |  फोटो सौजन्य: TOI Archives
थोडं पण कामाचं
  • एकदा वजन वाढल्यानंतर ते कमी करणं अजिबात सहज शक्य नसतं.
  • काही जण पोटाची वाढलेली चरबी पाहून अस्वस्थ होतात.
  • पण आता चिंता करु नका, थोडं वर्कआऊट (Workout) करा.

नवी दिल्ली: Weight Loss: एकदा वजन वाढल्यानंतर ते कमी करणं अजिबात सहज शक्य नसतं. त्यातच पोटाभोवती वाढलेला चरबीचा घेर कमी करणं तर त्याहून कठिण होऊन जातं. काही जण पोटाची वाढलेली चरबी पाहून अस्वस्थ होतात. पोटाचा घेर (Belly Fat) वाढल्यावर नवीन कपडे घालतानाही अवघडल्यासारखं वाटतं. कारण वाढलेलं पोट नवीन कपड्यांचा लूक खराब करतात. पण आता चिंता करु नका, थोडं वर्कआऊट (Workout) करा. हे असं वर्कआऊट आहे की, तुम्हाला त्यासाठी तासनतास घालवण्याची गरज भासणार नाही. 

या वर्कआऊटमुळे पोट कमी होण्यास जास्त वेळ लागणार नाही. आज आम्ही तुम्हाला सांगणार असलेले एक्सरसाईज नियमितपणे करा. या एक्सरसाईजमुळे तुमचं पोट नक्कीच कमी होईल. 

पोट कमी करण्यासाठी करण्याच्या एक्सरसाईज 

क्रंचेस 

क्रंचेस करणं सुरुवातीला थोडं कठिण असतं. मात्र एकदा का ते करण्याची सवय तुम्हाला झाल्यास त्याचा चांगला परिणाम दिसून येतो. क्रंचेस करण्यासाठी एक योगा मॅट घ्या. योगा मॅटवर पाठीवर झोपा. झोपल्यानंतर तुम्ही तुमचे दोन्ही हात डोक्याच्या मागे ठेवा आणि पाय गुडघ्याजवळ वाकवून वर ठेवा. त्यानंतर आता थोडेसं उठून शरीरासोबत डोके पुढे आणि मागे करा. हे शक्य तितक्या वेळा करा, हळूहळू त्याचा आकडा आणि वेळ वाढवा.

वॉकिंग 

वॉकिंग हा एक्सरसाईजचा सर्वांत सोपा प्रकार आहे. वॉकिंग आरोग्यावर अनेक प्रकारे काम करतो. चालत असताना शरीराचं संपूर्ण स्ट्रेचिंग होते. पोट देखील कमी होते आणि ताज्या हवेत श्वास घेण्याची देखील संधी मिळते.

झुम्बा 

झुम्बा हा किंचित इंटेंस एक्सरसाईजचा प्रकार आहे. हा प्रकार हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी फिटनेस सुधारतो. तुम्हाला जर का कमी दिवसात वजन कमी करायचं असल्यास फक्त म्युझिक लावा आणि झुम्बा करायला सुरुवात करा.

लेग रेज वर्कआऊट 

हे वर्कआऊट वेगवेगळ्या प्रकारे केलं जातं. सर्वांत आधी पाठीवर झोपा. आता वरच्या बाजूस दोन्ही पाय एकमेकांना जोडा आणि शरीर वर उचलण्याचा प्रयत्न करा. हा वर्कआऊट करताना तुम्हाला तुमचे पाय पूर्ण 90 अंशाच्या कोनात आणून धरावे लागतील. हा वर्कआऊट करत असताना हळूहळू वेळ आणि आकडा दोन्हीमध्ये वाढ करा. सुरुवातीला हा वर्कआऊट करत असताना सोपं वाटणार नाही. त्यावेळी पाय गुडघ्यापासून पोटापर्यंत वाकवा, पकडून ठेवा आणि नंतर सामान्य स्थितीत आणा.

सायकलिंग 

तुम्ही सायकलिंग 2 प्रकारे करू शकता, घरी स्थिर सायकल चालवू शकता किंवा सायकलिंगसाठी बाहेर जाऊ शकता. पोटाची चरबी कमी करण्यासाठी दोन्ही पद्धती प्रभावीशाली आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी