How to Quit Smoking: सिगरेट सोडायची आहे?, पाहा त्यासाठी काय करावं लागेल! 

तब्येत पाणी
Updated Sep 20, 2019 | 18:42 IST | टाइम्स नाऊ मराठी

Quit Cigarettes: जर आपण सिगरेट सोडण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यासाठी काही टिप्स नक्की लक्षात ठेवा. कारण या टिप्समुले आपण आपली धूम्रपानाची सवय नक्कीच सोडू शकतात. 

want to quit cigarettes see what you need to do
सिगरेट सोडायची आहे?, पाहा त्यासाठी काय करावं लागेल!  |  फोटो सौजन्य: Getty

थोडं पण कामाचं

  • दृढ इच्छा शक्तीच्या जोरावर आपण सिगरेट पिणं सोडू शकता 
  • अँटी निकोटीन औषधं आणि आयुर्वेदिक गोष्टींच्या साह्याने आपलं धूम्रपान पिणं सुटू शकतं. 
  • आलं, लिंबू, दालचीनी याचा वापर करा, ज्यामुळे सिगरेटची तलफ येणार नाही

मुंबई: सिगरेट पिणं हे आरोग्यासाठी प्रचंड धोकादायक असतं हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. पण असं असून देखील अनेक जण सिगरेट पिण सोडू शकत नाही. खरं तर धूम्रपान सोडणं यासाठी दृढ इच्छाशक्तीची गरज असते. धूम्रपान सोडणं हे अनेकांना तसं खूप कठीण वाटतं. पण काही अशा टिप्स आणि ट्रिक्स आहेत की, ज्यामुळे आपल्याला कठीण वाटणारी ही गोष्ट अगदी सोपी होऊन जाते. धूम्रपान हे आपल्यालाच नव्हे तर आपल्यासोबतच्या लोकांना देखील आतून पोखरुन टाकतं.

धूम्रपान सोडण्यासाठी आपल्याला फक्त आपल्या वागणुकीत काही बदल करावे लागतील. तसंच निकोटीनची तलफ येण्याने शरीरात होणाऱ्या बदलांचा सामना करावा लागेल. यासाठी आपल्याला स्वत:ला ठरवावं लागेल की, आपला मूड योग्य ठेवण्यासाठी आणि तलफ येईल त्यावेळी आपण स्वत:ला कसं सांभाळता. बाकी काही गोष्टी अशा आहेत की, या समस्येपासून लढण्यास मदत करु शकतात. 

धूम्रपान सोडण्यासाठी या गोष्टी वापरून पाहा: 

अँटी निकोटन च्युइंगम वापरा 
धूम्रपान सोडण्यासाठी अँटी निकोटन च्युइंगम हे खूपच फायदेशीर आहे. जेव्हा-जेव्हा आपल्याला धूम्रपान करण्याची तलफ येईल तेव्हा-तेव्हा आपण हे च्युइंगम नक्की खान. यामुळे आपल्या धूम्रपानाची अजिबात तलफ येणार नाही. 

या औषधांचा वापर करा
एफडीएने धूम्रपान सोडण्यासाठी दोन गैर-निकोटीन युक्त औषधांना मंजुरी दिली आहे. ही औषधं म्हणजे बुप्रोपियन (जायबन) आणि वॅरेनीलाइन (चेंटिक्) हे आहेत. ही दोन्ही औषधं गैर-निकोटीन आहेत. जे धूम्रपान आणि क्रॅविंग याच्यापासून सुटका देते. पण ही औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अजिबात घेऊ नका. 

आयुर्वेदिक उपाय करा 
सिगरेटची तलफ आल्यास आपण आल्याच्या रसात लिंबूचे काही थेंब आणि काळं मीठ मिसळून ते घ्यावं. यामध्ये असणाऱ्या नैसर्गिक सल्फरमुळे धूम्रपानाची तलफ कमी होते. आवळ्याचे तुकडे हे काळं मीठ लावून उन्हात सुखवा आणि जेव्हा धूम्रपानाची तलफ येईल त्यावेळी हे तुकडे खा. यामधील विटामिन सी याच्यामुले निकोटीनची तलफ कमी होईल. दालचीनीचे तुकडे सोबत ठेवा. जेव्हा तलफ येईल तेव्हा दालचीनीचे तुकडे तोंडात टाका. याचा थोडसा तिखटपण आपली तलफ वेगाने कमी करेल. 

या ट्रिक्स नक्की वापरा, आपलं धूम्रपान पिणं नक्की सुटू शकतं. 

  1. धूम्रपान सोडण्याबाबत आपले मित्र, कुटुंबीय आणि आपल्या कार्यालयातील सहकाऱ्यांसोबत नक्की चर्चा करा. 
  2. सर्व सिगरेट अॅश ट्रे फेकून द्या 
  3. स्टॉ-स्मोकिंग ग्रुपमध्ये सामील व्हा
  4. व्यायाम करा, जसं की, मेडिटेशन, योगा किंवा सायकलिंग
  5. हेल्दी डाएट घ्या आणि नेहमी फळं आपल्यासोबत ठेवा. ही फळं मधूनमधून खात राहा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी