Beer Side Effects : बिअरप्रेमींनो सावधान! ही लक्षणं दिसू लागताच बिअरला करा अलविदा

सतत बिअर पिणाऱ्यांना काही दिवसांतच तब्येत बिघडत असल्याचे संकेत मिळतात. हे संकेत ओळखून वेळीच बिअर पिणे बंद करण्याची गरज आहे.

Warning signs suggesting to quit beer asap
ही लक्षणं दिसू लागताच बिअरला करा अलविदा  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • बिअरमुळे होतो तब्येतीवर विपरित परिणाम
  • गंभीर आजारांना मिळते आमंत्रण
  • आजाराचे संकेत मिळताच बिअर पिणे थांबवा

Beer Side Effects : मद्यपान (Alcohol) हे शरीरासाठी घातक (Dangerous) मानलं जातं. प्रमाणापेक्षा जास्त दारूचं सेवन केल्याचे अनेक दुष्परिणाम (Side Effects) शरीरावर होऊ लागतात आणि गंभीर आजारांना आमंत्रण मिळण्याची शक्यता असते. सर्व प्रकारची अल्कोहोलयुक्त पेयं ही शरीराचं नुकसान करत असतात. बिअरमध्येही मोठ्या प्रमाणात अल्कोहोल असतं. त्याचे गंभीर दुष्परिणाम शरीरावर होत असतात. बिअर पिणारे बहुतांश लोक एका बैठकीत भरपूर बिअर पित असतात. त्यामुळे पचनसंस्थेवर त्याचा ताण येतो आणि शरीरात अल्कोहोलची पातळी अचानक वाढते. त्यामुळे सातत्याने बिअर पिणाऱ्या लोकांमध्ये लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, लिव्हर बिघडणे, झोप कमी होणे, डोकेदुखी अशा समस्या दिसून येतात. या समस्या वाढत जाऊन त्याचं गंभीर आजारात रुपांतर होण्याचीही शक्यता असते. यासाठी अशा गंभीर आजारांची प्राथमिक लक्षणं दिसू लागताच बिअर किंवा इतर कुठलंही अल्कोहोलिक ड्रिंक पिणं थांबवण्याचा सल्ला दिला जातो. जाणून घेऊया, अशीच काही लक्षणं

उच्च रक्तदाब

जर तुम्ही वरचेवर बिअर पित असाल, तर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास असण्याची शक्यता आहे. हा त्रास कमी करायचा असेल, तर तुम्हाला तातडीने बिअर पिणं बंद केलं पाहिजे. जर हाय ब्लडर प्रेशर असतानाही बिअर पिणं सुरूच ठेवलं, तर गंभीर आजार आणि हार्ट स्ट्रोक येण्याची शक्यता निर्माण होते. 

अधिक वाचा - Weight Loss: वजन कमी करण्यासाठी दिवसभर गरम पाणी चांगलं की वाईट?, मग तज्ज्ञ काय म्हणतात एकदा जाणून घ्या

निद्रानाश

मद्यपान केल्यानंतर आपल्याला गाढ झोप लागत असल्याचं अनेकजण सांगतात. मात्र प्रत्यक्षात मद्यपानामुळे झोपेचा दर्जा खालावतो. त्याचप्रमाणे मद्यपान केल्यामुळे तुम्हाला वारंवार लघवी येते. त्यासाठी अनेकदा झोपेतून उठावं लागतं. त्यामुळेही सलग झोप होऊ शकत नाही. हे वारंवार घडत राहिलं, तर झोपेशी संबंधित गंभीर विकार उद्भवण्याची शक्यता असते. विशेषतः मद्यपान न केलेल्या अवस्थेत झोप लागणं कमी होतं आणि त्यामुळे दारुचं व्यसन अधिकाधिक गंभीर होत जातं, असाही अनुभव आहे. 

तणाव वाढणे

आयुष्यातील ताणतणावांपासून सुटका व्हावी, यासाठी अनेकजण बिअर पितात. मात्र प्रत्यक्षात उलटंच घडतं. बिअरमुळे ताणतणाव कमी न होता तो वाढतच जातो. तणाव नसणाऱ्या व्यक्तींनाही बिअर पिल्यामुळे तणावग्रस्त वाटायला सुरुवात होते. याचं कारण असं की बिअर पिण्यामुळे शरीरातील कोर्टिसोलची पातळी वाढते. यामुळे स्ट्रेट आणि अँझायटी यात वाढ होते. 

अधिक वाचा - Weight Loss Tips in Marathi : वजन कमी करताना खा हे पाच पदार्थ, ओवर इटिंगपासून मिळेल सुटका

आजारपण

जर तुम्ही वारंवार आजारी पडत असाल, तर त्याचं एक कारण बिअरचं अतिसेवन हे असू शकतं. सतत बिअर पिण्याने रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे छोट्यामोठ्या कारणांनी सतत व्यक्ती आजारी पडू लागते. तुम्हाला असा अनुभव येत असेल, तर ताबडतोब बिअरचं सेवन बंद करणं आवश्यक आहे. 

डिस्क्लेमर - बिअर पिण्यामुळे होणाऱ्या आजारांबाबतची ही काही सामान्य निरीक्षणं आहेत. तुम्हाला याबाबत काही गंभीर समस्या असतील, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेण्याची गरज आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी