हॉरर फिल्म पाहा आणि लठ्ठपणा कमी करा! 

Weight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी अनेकजण बरेच उपाय करतात. त्यातच आता हॉरर सिनेमे पाहून वजन कमी करता येतं असा दावा करण्यात येत आहे. 

girl
हॉरर फिल्म पाहा आणि लठ्ठपणा कमी करा!   |  फोटो सौजन्य: Thinkstock

थोडं पण कामाचं

  • एका संशोधनानुसार हॉरर सिनेमा पाहिल्याने वजन कमी होतं
  • हॉरर सिनेमा पहिल्याने कॅलरी बर्न होत असल्याचा संशोधनात दावा 
  • हॉरर सिनेमा पाहिल्यावे वजन कमी होण्यास होते मदत 

मुंबई: अनेक जण हे रात्री एकट्याने किंवा कुणासोबत तरी हॉरर सिनेमा पाहणं पसंत करतात. अनेकदा भितीदायक दृश्य आल्यानंतर आपल्याजवळ उशी किंवा चादर ओढून लपण्याचा प्रयत्न करतात. असा अनुभव जवळपास प्रत्येकालाच येत असेल. अनेकदा काही जण तर ओरडतात देखील. पण तरीही हॉरर सिनेमा पाहण्याची त्यांची आवड काही कमी होती नाही. पण काही जण हॉरर सिनेमांना एवढं घाबरतात की, तसे सिनेमे न पाहणंच ते पसंत करतात.

पण हॉरर सिनेमाचा संबंध आपल्या वजन कमी करण्याशी असला तर? हॉरर सिनेमांनी वजन कमी होत असल्याचं आपल्याला कुणी सांगितलं, तरीही आपण असे सिनेमा पाहण्याची रिस्क घेणार नाहीत? आता आपण विचार कराल की, हॉरर सिनेमा पाहून वजन कमी होत असेल तर वाईट काय आहे? त्यामुळे हॉरर सिनेमा ही काही वाईट आयडिया नाही. होय... असं वाचून आपल्याला थोडंसं विचित्र वाटेल. पण हॉरर सिनेमे पाहून आपण आपलं वजन कमी करु शकता.

वेस्टमिंटर विद्यापीठाच्या एका संशोधनानुसार, दररोज एक हॉरर सिनेमा पाहिल्याने बऱ्याच प्रमाणात कॅलरी बर्न होतात. ज्यामुळे वजन घटवण्यात मदत होते. ९० मिनिटांचा एक हॉरर सिनेमा हा जवळजवळ ११३ कॅलरी बर्न करतं. एवढ्या कॅलरी कमी करण्यासाठी आपल्याला जवळजवळ ३० मिनिटं सतत चालावं लागेल. त्यामुळे फक्त सिनेमा पाहून कॅलरी बर्न करण्याचा हा फंडा नक्कीच फायदेशीर ठरु शकतो. 

संशोधनानुसार, आपण जेवढा जास्त भीतीदायक सिनेमा पाहाल तेवढं आपलं वजन झपाट्याने कमी होईल. त्यामुळे हॉरर सिनेमा पाहण्याची कल्पना फार काही वाईट नाही. पण असं असलं तरीही या संशोधनात  कितपत तथ्य आहे याविषयी कोणताही दावा करण्यात आलेला नाही. 

वाढतं वजन ही आजच्या घडीला सर्वात मोठी समस्या होत असल्याचं दिसून येत आहे. अनेक तरुण हे लठ्ठपणामुळे आजही त्रस्त आहेत. यासाठी बरेच जण डायटिंग करतात. तर काही जण जिममध्ये घाम देखील गाळतात. पण जर आपल्याला कमीत कमी दिवसांमध्ये वजन कमी करायचं असेल तर त्यासाठी आपण योग्य तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच आपला आहार आणि व्यायाम निश्चित केला पाहिजे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी