लहान मुलांनी किती तास बघावा टीव्ही, जाणून घ्या 

टीव्ही पाहिल्यानंतर केवळ शारीरिक आरोग्यावर परिणाम होत नाही तर लहान मुलांच्या व्यवहारात देखील बदल होतो. त्यासोबतच काही गोष्टींवरही त्याचा परिणाम होतो. 

Kid Watching TV
लहान मुलांनी किती तास बघावा टीव्ही, जाणून घ्या   |  फोटो सौजन्य: Thinkstock

थोडं पण कामाचं

  • लहान मुलांनी जास्त वेळ टीव्ही बघणं घातक
  • जास्तवेळ टीव्ही पाहणं मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक
  • जास्त वेळ टीव्ही बघून वाढतं वजन

मुंबईः  टीव्ही बघणं हे लोकांसाठी  मनोरंजनाचं एक अद्भुत साधन आहे. वयोवृद्ध असो वा छोटे सर्व वयोगटातील लोकांसाठी टीव्हीवर वेगवेगळ्या प्रकारचे सर्व कार्यक्रम येत असतात. दरम्यान लहान मुलांनी जास्त वेळ टीव्ही बघणं हे जास्त नुकसानदायक ठरू शकते. मुलांनी जास्त वेळ टीव्ही पाहिल्यास त्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होतात. त्यासोबतच त्यांच्या आरोग्यासाठीही धोकादायक ठरू शकते. जास्तवेळ टीव्हीला चिटकून असलेल्या मुलांच्या पालकांना खूप सावधान राहण्याची गरज आहे.  मुलं किती वेळ टीव्ही बघत आहेत त्यापेक्षा मुलं काय बघत आहेत ते खूप महत्त्वाचं आहे. यावर सुद्धा पालकांनी लक्ष द्यायला हवं. 

पालकांनी हे समजून घेतलं पाहिजे की, त्यांचा मुलगा जितका वेळ टीव्ही पाहण्यात वेळ घालवत आहे. तितका वेळ तो आपल्या कुटुंब, मित्र परिवार आणि अन्य शारिरीक हालचालींपासून दूर राहतो. मुलांच्या विकासासोबत शारीरिक गरजेसाठी ही वेळ खूप महत्त्वपूर्ण आहे. बऱ्याच कालावधीसाठी मुलाची सवय अशीच कायम राहिली तर काही वेळानंतर मुलं आपल्या कुटुंबियांसोबत बसून गप्पा मारणं, बोलणं देखील टाळतात. त्यांना टीव्ही बघण्याची सवय होऊन जाते. 

वजन वाढीशी संबंधित आहे टीव्ही बघणं 

किड्सहेल्थवर प्रकाशित एका शोधानुसार, जास्तवेळ टीव्ही बघणं किंवा मोबाईलवर टाइपपास करणं हे मुलाच्या वजन वाढीशी संबंधित आहे. टीव्ही पाहिल्यानं मुलं निष्क्रिय होतात आणि खूप ब्रेकफास्ट करतात.  ते आरोग्यविघातक अन्न पदार्थ आणि रिक्त-कॅलरी पेयाच्या जाहिराती पाहतात आणि त्यानंतर हे त्यांचे आवडते स्नॅक भोजन बनतं. 

याकारणामुळे मुलांचं वजन वाढू लागतं. त्याचप्रमाणे, मुलांच्या खाण्यापिण्यासोबतच टीव्हीवर दाखवली जाणारी इतर जाहिराती सुद्धा मुलांवर वेगानं प्रभाव पाडतात. जसं की, क्राईम शो पाहिल्यास त्यांचा स्वभाव आणि भाषेत त्याचा प्रभाव जाणवण्यास सुरूवात होते. 

जाणून घ्या मुलाच्या वयानुसार टीव्ही बघण्याची वेळ काय असली पाहिजे? अमेरिकन अॅकेडमी ऑफ पीडियाट्रिक्सनुसार, मुलांसाठी टीव्ही बघण्याची वेळी ही वयानुसार बदलतं जाते. 

  • 18 महिन्यांपर्यंतची मुलं आणि नवजात मुलांचं कुटुंब आणि मित्रांसोबत मोबाइलवर व्हिडिओ कॉलमध्ये राहणंचं पुरेसे आहे. ना अतिरिक्त टीव्ही बघण्याचा सल्ला देण्यात आलेला नाही.
  • प्रीस्कूलरसाठी एका तास टीव्ही बघणं पुरेसे आहे. परंतु ते सुद्धा केवळ शैक्षणिक कार्यक्रम असावेत. 
  • 5 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी आणि किशोरवयीन मुलांसाठी, त्यांच्या शैक्षणिक क्रियाकलाप, शारीरिक विकास, झोपेच्या सायकल इत्यादींचा प्रभाव तितकाच असावा. हे पालकांना स्वतःला ठरवावं लागेल की मुलांनी किती वेळ टीव्ही पाहावा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
लहान मुलांनी किती तास बघावा टीव्ही, जाणून घ्या  Description: टीव्ही पाहिल्यानंतर केवळ शारीरिक आरोग्यावर परिणाम होत नाही तर लहान मुलांच्या व्यवहारात देखील बदल होतो. त्यासोबतच काही गोष्टींवरही त्याचा परिणाम होतो. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola