लठ्ठपणा कमी करण्यासाठी थंड पाणी की गरम पाणी आहे बेस्ट...घ्या जाणून

तब्येत पाणी
Updated Apr 16, 2019 | 11:34 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

थंड पाण्यामुळे कॅलरीज कमी होतात आणि गरम पाण्यानेही. तुम्हाला याबाबत कन्फ्यूजन आहे का? या दोघांपैकी कोणतं पाणी प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो. घ्या जाणून...

hot water or cold water
थंड की गरम पाणी  |  फोटो सौजन्य: Getty Images

मुंबई: कडाक्याच्या उन्हाळ्यात थंड गारेगार पाणी प्यायला कोणाला आवडत नाही. मात्र या थंड पाण्याचे तुमच्या शरीरास काय फायदे अथवा तोटे होतात हे जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे असते. काही संशोधनादरम्यान असे आढळते की, थंड पाणी प्यायल्याने कॅलरीज खर्च होतात. तर काही संशोधनादरम्यान असे आढळते की गरम पाणी प्यायल्याने चरबी  विरघळते. आता तुमचे हे कन्फ्यूजन होईल दूर. कारण आम्ही तुम्हाला सांगत आहोत की लठ्ठपणा कमी करण्यासाठी थंड की गरम पाणी पिणे आहे बेस्ट...

आपल्या शरीरात तब्बल ७० टक्के पाणी असते. पाण्याशिवाय जिवंत राहणे कठीण आहे. प्रत्येक व्यक्तीला फिट राहण्यासाठी दिवसाला कमीत कमी २ लीटर पाणी प्यायले पाहिजे. वजन कमी करण्यात पाण्याचे खूप महत्त्व आहे. पाण्यामुळे कॅलरीज खर्च होतात. तसेच भूक कमी करण्यातही पाण्याची भूमिका महत्त्वाची ठरते.  असं म्हटलं जात की कोमट पाणी वजन कमी करण्यासाठी चांगले मानले जाते. तसेच वजन कमी करायचे असेल त्या व्यक्तीला कोमट पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. 

थंड पाण्याचा शरीरावर होणारा प्रभाव

  1. उन्हाळ्यात थंड पाणी पिणे सगळ्यांनाच आवडते. मात्र थंड पाणी पिण्याने शरीरास अनेक नुकसान होऊ शकते. 
  2. रक्तवाहिन्यांमध्ये जमू लागते फॅट - थंड पाण्यामुळे रक्तवाहिन्या संकुचित होतात. काहीही थंड खाल्ल्याने अथवा थंड पाणी प्यायल्याने धमन्यांमध्ये फॅट जमा होऊ लागते. यामुळे रक्त वाहिन्यामधून रक्त वाहण्यास अडथळा निर्माण होतो.
  3. जेवताना थंड पाणी पिऊ नका - जेवताना थंड पाणी प्यायल्याने पचनक्रियेत अडथळा निर्माण होतो. कारण आपल्या शरीराला पाण्याचे तापमान नियंत्रित करण्याचे आणखी एक काम करावे लागते. 
  4. घश्याला त्रास - थंड पाणी प्यायल्याने घश्याला त्रासही होऊ शकतो. कारण थंड पाण्याने घश्याला सूजही येऊ शकते. 

when to drink water

जाणून घ्या गरम पाणी पिण्याचे फायदे

  1. पचनक्रिया सुरळीत होते - खाण्याच्या आधी गरम पाणी प्यायल्याने पचनक्रियेचा वेग वाढतो. 
  2. डिटॉक्स होण्यास मदत - गरम पाण्यामुळे शरीरातील विषारी तत्वे दूर होण्यास मदत होते. नाश्त्याच्या आधी एक कप गरम पाण्यात लिंबू मिसळून प्यायल्याने बॉडी डिटॉक्स होण्यास मदत होते. 
  3. मूड सुधारतो - ऐकून थोडे विचित्र वाटले ना? गरम पाणी प्यायल्याने तुमचा मूड सुधारू शकतो. 
  4. बद्धकोष्ठतेपासून सुटका - रिकाम्या पोटी गरम पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठतेपासून सुटका होते. दररोज सकाळी एक कप गरम पाणी प्यायल्याने अनेक समस्या दूर होतात. गॅस, अॅसिडिटी तसेच वजन कमी होण्यास मदत होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
लठ्ठपणा कमी करण्यासाठी थंड पाणी की गरम पाणी आहे बेस्ट...घ्या जाणून Description: थंड पाण्यामुळे कॅलरीज कमी होतात आणि गरम पाण्यानेही. तुम्हाला याबाबत कन्फ्यूजन आहे का? या दोघांपैकी कोणतं पाणी प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो. घ्या जाणून...
Loading...
Loading...
Loading...