Actress Fitness Secrets: 'या' अभिनेत्रीच्या फिटनेसचं रहस्य आणि डाएट प्लॅन आला समोर

Anita Raj Fitness Secrets:1980 च्या दशकातील अभिनेत्री अनिता राज वयाच्या 58 व्या वर्षी खूपच फिट आणि तरुण दिसते. याचे कारण म्हणजे तिची नियमित व्यायामाची दिनचर्या, ज्यातून तुम्हीही प्रेरणा घेऊ शकता.

weight lifting is secret of actress anita raj fitness also know her diet plan
'या' अभिनेत्रीच्या फिटनेसचं रहस्य आणि डाएट प्लॅन आला समोर  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • अनिता राज दररोज ७२ किलो वजन उचलते
  • आठवड्यातून तीन दिवस कार्डिओ करते
  • मेंदूच्या आरोग्यासाठी रोज सकाळी नामजप करते.

Anita Raj Fitness Secrets: बॉलिवूडमधील (Bollywood) सर्व स्टार्स फिटनेस फ्रीक आहेत आणि स्वत:ला तंदुरुस्त आणि तरुण ठेवण्यासाठी खूप काही करतात. डाएटपासून ते जिममध्ये व्यायाम करण्यापर्यंत, स्टार्स आपली शरीरयष्टी तयार करण्यासाठी विविध उपाय करतात. आपल्या तंदुरुस्त आणि मजबूत शरीराने लोकांना प्रेरणा देणाऱ्या बॉलिवूड स्टार्सपैकी एक म्हणजे 80 च्या दशकातील अभिनेत्री अनिता राज (Anita Raj) ही आहे. (weight lifting is secret of actress anita raj fitness also know her diet plan)

अभिनेत्री अनिता राज ही 58 वर्षांची आहे. परंतु तिचा फिटनेस पाहून कोणीही म्हणू शकत नाही की तिचं एवढं वय आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की अनिता राज नियमित वर्कआउट करते. चला तर मग आज आम्ही तुम्हाला अनिता राजच्या फिटनेसचे रहस्य सांगणार आहोत, ज्यापासून तुम्हीही प्रेरणा घेऊ शकता.

अनिता राज वयाच्या ५८ व्या वर्षीही आहे प्रचंड फिट

अभिनेत्री अनिता राजच्या रुटीनमध्ये रोजचे वर्कआउट करणे समाविष्ट आहे. ती व्यायाम कधीच चुकवत नाही. हेवी वेट ट्रेनिंगव्यतिरिक्त ती तिच्या वर्कआउट रूटीनमध्ये क्रॉसफिट आणि पंचिंगसारखे हाय एनर्जी घेणारे व्यायाम देखील आवर्जून करत असते.

अधिक वाचा: Weight loss tips in marathi : वजन कमी करण्यासाठी सुका मेवा ठरतो फायदेशीर, असे करा सेवन

व्यायामाचा नेमका दिनक्रम

अनिता राजने तिच्या व्यायामासाठी एक खास दिनचर्या निश्चित केली आहे. उदाहरणार्थ, ती आठवड्यातून तीन दिवस कार्डिओ करते, तर बाकीचे दिवस वेट ट्रेनिंग आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग करते. तिच्या मते, वेट ट्रेनिंग महिलांना तंदुरुस्त राहण्यास, फिट ठेवण्यास आणि वयानुसार स्नायू मजबूत करण्यास मदत करते.

मन सुदृढ ठेवणेही गरजेचे

अभिनेत्रीच्या मते, निरोगी शरीरासाठी निरोगी मन असणे देखील खूप महत्वाचे आहे. तिच्या मते मन निरोगी असेल तरच शरीर निरोगी असते. निरोगी मनासाठी, ती दररोज सकाळी नामजप करते, जेणेकरून लक्ष केंद्रित होईल. त्यानंतर ती जिममध्ये वर्कआउट करते.

अधिक वाचा: Skin Care Tips: त्वचेवरील टॅन दूर करण्यासाठी 'हे' फ्रूट Face Pack अत्यंत फायदेशीर

अनिता राजचा डाएट प्लॅन

अनिता राजच्या आहारात बाजरी किंवा ज्वारीपासून बनवलेल्या भाकरींचा समावेश असतो, ज्यामध्ये भरपूर पोषक तत्व असतात. यासोबतच तिला सर्वात जास्त मसूर आणि रोटी खायला आवडते. तसेच ती हिरवं सॅलेड खाणं देखील पसंद करते. 

(टीप: प्रस्तुत लेखात सुचविलेल्या टिप्स आणि सल्ले केवळ सामान्य माहितीसाठी आहेत. हा व्यावसायिक सल्ला म्हणून समजू नये.)\

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी