Weight Lose: जलदपणे वजन कमी करण्यासाठी 'या' गोष्टी आहेत फायदेशीर

: जर तुम्हाला सुद्धा वेगाने वजन कमी करायचे असेल तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. आपण पाहतो की या व्यस्त जीवनात, बहुतेक लोक स्वतःच्या आरोग्याकडे कमी लक्ष देत असतात.

Weight Lose
जलदपणे वजन कमी करण्यासाठी 'या' गोष्टी आहेत फायदेशीर   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • लठ्ठपणामुळे हृदयरोग, उच्च रक्तदाब, यूरिक अॅसिड आणि मधुमेह यांसारख्या धोकादायक आजारांचा धोका वाढतो.
  • नेहमी जेवणापूर्वी भरपूर पाणी प्यायले पाहिजे.
  • पोटाची चरबी कमी करायची आहे त्यांच्यासाठी ब्लॅक कॉफी हा उत्तम पर्याय

मुंबई : Lose Weight: जर तुम्हाला सुद्धा वेगाने वजन कमी करायचे असेल तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. आपण पाहतो की या व्यस्त जीवनात, बहुतेक लोक स्वतःच्या आरोग्याकडे कमी लक्ष देत असतात. उलट, खाणं आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे लोक वजन वाढवू लागतात, जे पुढे अनेक आजारांना आमंत्रण देऊ शकते. आहार तज्ञ डॉ रंजना सिंह यांच्या मते, लठ्ठपणामुळे हृदयरोग, उच्च रक्तदाब, यूरिक अॅसिड आणि मधुमेह यांसारख्या धोकादायक आजारांचा धोका वाढतो. या काळात ते कमी का करावे याचे कारण आहे.
या गोष्टींचे सेवन केल्यास वजन कमी होईल

पाणी पिणे आवश्यक 

आहार तज्ज्ञ डॉ रंजना सिंह म्हणतात की, जास्त खाणे वजन कमी करण्यासाठी खूप हानिकारक असू शकते. हे टाळण्यासाठी, आपण नेहमी आपल्या सर्व जेवणापूर्वी भरपूर पाणी प्या. यामुळे केवळ तुमची तल्लफ कमी होणार नाही, तर तुम्हाला दीर्घ कालावधीसाठी तृप्त वाटेल.

तुळशी आणि ओव्यचा काढा

तुळस आणि अजवाइन (ओवा) दोन्ही वजन कमी करण्यास मदत करतात. एक चमचा वाळलेल्या ओव्याच्या बिया एका ग्लास पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा. यानंतर, सकाळी तुळशीची पाने अजवाईनच्या पाण्यात (ओव्याच्या) उकळा. आता एका ग्लासमध्ये पाणी गाळून ते सेवन करा. यामुळे वजनही कमी होऊ शकते.

ब्लॅक कॉफी 

वजन कमी करण्यासाठी तुम्ही ब्लॅक कॉफी देखील घेऊ शकता. ब्लॅक कॉफी लठ्ठपणा कमी करण्यासाठी खूप फायदेशीर असते. ज्यांना पोटाची चरबी कमी करायची आहे त्यांच्यासाठी ब्लॅक कॉफी हा उत्तम पर्याय मानला जातो. 

सफरचंद व्हिनेगर

अभ्यासानुसार, सफरचंद व्हिनेगरमध्ये एसिटिक अॅसिड नावाचा घटक असतो, जो चयापचय वाढवू शकतो. हे अन्न घेण्याचे प्रमाण कमी करून पोट भरण्यास मदत करते.

ग्रीन टी 

ग्रीन टी ह मेटाबॉल्जिमला चालना देण्यास मदत करत असतं. एका शोधानुसार कॅफीन फॅट बर्न करण्यास मदत करत असते. यांच्यासह वजन कमी करण्यास मदत होत असते. झोपण्यापुर्वी ग्रीन टीचं सेवन करु शकतो. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी