Best eating habits for Weight loss: वजन कमी करण्यासाठी कसे खावे?

Weight loss: Best eating habits to lose weight once and for all : फास्ट फूड आणि जंक फूड चवीने खाण्याच्या या काळात वजन कमी करणे हे एक आव्हान झाले आहे. पण योग्य तंत्रांचा वापर केल्यास हे आव्हान पेलणे सहज शक्य आहे.

Weight loss: Best eating habits to lose weight once and for all
Best eating habits for Weight loss: वजन कमी करण्यासाठी कसे खावे?  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Best eating habits for Weight loss: वजन कमी करण्यासाठी कसे खावे?
  • काय खाता हे महत्त्वाचे
  • भूकेसाठी खाण्याच्या पदार्थांचे नियोजन

Weight loss: Best eating habits to lose weight once and for all : फास्ट फूड आणि जंक फूड चवीने खाण्याच्या या काळात वजन कमी करणे हे एक आव्हान झाले आहे. पण योग्य तंत्रांचा वापर केल्यास हे आव्हान पेलणे सहज शक्य आहे. योग्य तंत्राचा वापर करून झटपट वजन कमी करणे सोपे आहे. याचसाठी जाणून घ्या वजन कमी करणाऱ्याने काय खावे आणि कसे खावे....

वजन कमी करण्यासाठी साखर, मैदा, बेकरी उत्पादने खाणे टाळावे. तसेच तेलकट आणि तुपकट पदार्थ खाणे टाळावे. वजन कमी करणे यामुळे अधिक सोपे होईल.

लक्षात ठेवा वजन कमी करायचे असेल तर सॅलड तसेच ताजी फळे आणि ताज्या भाज्या सावकाश चावून खा. यामुळे मर्यादीत पदार्थ खाल्ले तरी पोट भरेल आणि दीर्घ काळ भूकेची जाणीव होणार नाही.

शरीराला हानीकारक असलेले वाढलेले वजन कमी झाले की आपोआप उत्साह वाढेल. दैनंदिन कामं करण्याची गती वाढेल. आपले दैनंदिन जीवन अधिक आनंददायी होईल. यासाठी काय कराल...

  1. प्रोटिन्सवर भर द्या : मर्यादीत कार्ब्स खा आणि रोजच्या जेवणात प्रोटिन्सवर भर द्या. ताजा सकस आहार घ्या. सॅलड तसेच ताजी फळे आणि ताज्या भाज्या सावकाश चावून खा. विविध डाळींपासून तयार केलेली आमटी, वरण प्या. चवीत बदल म्हणून अधून मधून भाज्यांची सुप प्या.
  2. वजनाची चिंता सोडा, पण... : वजन कमी करायचे असले तरी दररोज थोडं खाल्ल्यावर लगेच वजन बघण्याची सवय सोडा. दर सात किंवा पंधरा दिवसांनी वजन तपासा. वजन कमी करायचे असले तरी आला दिवस आनंदाने साजरा करा. तब्येतीसाठी योग्य असे वेगवेगळ्या चवीचे पदार्थ खाऊन दिवस आनंदाने साजरा करण्याची सवय लावून घ्या.
  3. सावकाश आणि चावून खा : कोणताही पदार्थ सावकाश आणि चावून खा. जितका जास्त वेळ शांतपणे पदार्थ चावाल तेवढे त्याच्यासोबत तोंडातील लाळ मिसळण्याचे प्रमाण वाढेल. यामुळे पदार्थाचे पचन लवकर होण्याल मदत होईल. 
  4. शांतपणे खा : जेवताना टीव्ही बघणे, गाणी ऐकणे सोडा. शांतपणे फक्त जेवणावर लक्ष केंद्रीत करा. यामुळे पदार्थांचे पचन होण्यास मोठी मदत होईल. अस्वस्थ चित्ताने अथवा संतापलेल्या किंवा दुःखी असतानाच्या अवस्थेत खाल्ल्यास पदार्थ व्यवस्थित पचत नाही आणि वजन कमी होण्याऐवजी त्या पदार्थामुळे नवे त्रास होण्याचा धोका वाढतो.
  5. काय खाता हे महत्त्वाचे : स्वतःच्या शरीराची ठेवण, दैनंदिन जीवनशैली याची माहिती देऊन तज्ज्ञांच्या सल्ल्याने  रोजच्या खाण्यापिण्याचे नियोजन करा. ज्या पदार्थांची आपल्याला अॅलर्जी आहे ते पदार्थ खाणे टाळा. कार्ब्स वाढविणारे पदार्थ, साखर, मैदा, बेकरी उत्पादने, तेलकट आणि तुपकट पदार्थ खाणे टाळा. भरपूर प्रोटिन्स पुरविणारे पदार्थ खाण्यावर भर द्या.
  6. भूकेसाठी खाण्याच्या पदार्थांचे नियोजन : तज्ज्ञांच्या सल्ल्याने आवडीच्या पदार्थांचे आणि आरोग्यदायी पदार्थांचे खाण्यासाठी नियोजन करा. वजन कमी करण्याची प्रक्रिया जेवढी आनंददायी असेल तेवढीच ती लाभदायी ठरेल हे लक्षात ठेवा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी