weight loss by drinking water: सध्याच्या काळात अनेकांना वजन वाढीमुळे विविध समस्यांचा सामना करावा लागत असल्याचं पहायला मिळतं. वजन कमी करण्यासाठी ते विविध पर्याय स्वीकारतात मात्र, त्यात अनेकांना अपयश येतं. अनेक दिवस प्रयत्न केल्यानंतरही फारसं वजन कमी झालेलं दिसून येत नाही. मात्र, तुम्ही घरच्या घरी आणि ते सुद्धा पाणी पिऊन वजन कमी करू शकता हे तुम्हाला माहिती आहे का?
हे पण वाचा : हात-पाय सुन्न होणे गंभीर आजाराचे लक्षण?
पाण्यामध्ये कॅलरीज नसतात. पाणी प्यायल्याने शरीर अॅक्टिव्ह राहते. पाणी हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याचे काम करते. तसेच शरीरातील चरबी जाळण्याचे सुद्धा काम करण्यास पाणी महत्त्वाची भूमिका बजावते. जेवणापूर्वी पाणी प्यावे. पण तुम्ही जेवणासोबत किंवा जेवल्यावर लगेचच पाणी पिता तर तुम्हाला काळजी घेण्याची गरज आहे.
कारण, असे केल्याने तुम्हाला अपचन सारखी समस्या भेडसावण्याची शक्यता असते. परिणामी तुमचे वजन वाढू शकते. त्यामुळेच जेवण करण्यापूर्वी पाणी प्या.
हे पण वाचा : तुम्हीही सकाळी ब्रश न करता खाता? वाचा काय आहेत त्याचे तोटे
जर तुम्हाला खरंच आपलं वजन कमी करायचं असेल तर गरम पाणी नक्की प्या. पाणी प्यायल्याने तुमचे पोट भरलेलं वाटेल. परिणामी तुम्हाला वारंवार खाण्याची इच्छा होणार नाही. यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल. शरीरातील चरबी कमी करण्यासाठी सुद्धा गरम पाण्याच्या सेवनाने मदत होते. एकूणच गरम पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
हे पण वाचा : सकाळी रिकाम्या पोटी काळा चहा पिण्याचे 5 जबरदस्त फायदे
उन्हाळ्याच्या दिवसांत दिवसातून किमान एकवेळा गरम पाणी नक्की पिण्याचा प्रयत्न करा. पाण्याला कोणतीही चव नसते. यामुळे तुम्हाला हवे असल्यास पाण्यात बडीशेप, लिंबू किंवा इतर नॅचरल फ्लेवर्स मिक्स करुन पिऊ शकता. याच्या व्यतिरिक्त प्रत्येक दिवशी नियमित पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते आणि तुम्हाला अनेक आजार किंवा समस्यांपासून मुक्तता मिळण्यास मदत होते.
(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. हा कोणत्याही प्रकारचा वैद्यकीय सल्ला नाहीये. अधिक माहितीसाठी आपल्या डॉक्टरांचा किंवा आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)