Weight loss Tips in Marathi : लवकर वजन होईल कमी, फक्त दररोज करा हे काम आणि पहा फरक

सध्या प्रत्येकाला वजन वाढण्याची समस्या सतावत आहे. अशा वेळी वजन कमी करणे हे मोठे चॅलेंजिंग होऊन जातं. काही लोक वजन कमी करण्यासाठी जिममध्ये जातात आणि तासनतास घाम गाळतात. काही लोक मॉर्निंग वॉकसाठी जातात तर काही डाएट फॉलो करतात. असे असले तरी अपेक्षित रिझल्ट्स मिळतीलच असे नाही. अशा वेळी एक सोपा उपाय केल्यास लवकर वजन कमी होईल.

weight loss tips in marathi
वजन कमी करण्याच्या टिप्स  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सध्या प्रत्येकाला वजन वाढण्याची समस्या सतावत आहे. अशा वेळी वजन कमी करणे हे मोठे चॅलेंजिंग होऊन जातं.
  • काही लोक वजन कमी करण्यासाठी जिममध्ये जातात आणि तासनतास घाम गाळतात.
  • काही लोक मॉर्निंग वॉकसाठी जातात तर काही डाएट फॉलो करतात.

Weight loss Tips in Marathi :  सध्या प्रत्येकाला वजन वाढण्याची समस्या सतावत आहे. अशा वेळी वजन कमी करणे हे मोठे चॅलेंजिंग होऊन जातं. काही लोक वजन कमी करण्यासाठी जिममध्ये जातात आणि तासनतास घाम गाळतात. काही लोक मॉर्निंग वॉकसाठी जातात तर काही डाएट फॉलो करतात. असे असले तरी अपेक्षित रिझल्ट्स मिळतीलच असे नाही. अशा वेळी एक सोपा उपाय केल्यास लवकर वजन कमी होईल. जर तुम्ही ऑफिसमध्ये किंवा घरी जाताना इमारतीत लिफ्ट ऐवजी जिन्याचा वापर केल्यास तुमचे वजन कमी होईल. जिन्यावरून चढणे उतरणे हा एक चांगला व्यायाम होऊ शकतो. यामुळे लवरक वजन कमी होण्यास मदत होईल. (Weight Loss Climbing Stairs Home read easy tips in marathi)

अधिक वाचा :   Tired even after sleep: पुरेशी झोप होऊनही थकवा जात नाही? असू शकते ‘या’ पाच आजारांची वॉर्निंग

वजन कमी करण्यासाठी जिन्याचा वापर

दिवसातून तुम्ही जितक्या पायर्‍या चढाल तितक्या तुमच्या शरीरातील कॅलरी बर्न होतात आणि त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल. वजन कमी करण्यासाठी तुम्हाला दिवसातून किमान ५ ते ७ मिनिटे जिना चढण्या उतरण्याचा व्यायाम करावा. जिना चढतानाचा व्यायाम करताना एका गोष्टीची काळजी घ्यावी, ती म्हणजे हळूहळून हा व्यायाम करावा अन्यथा अपघात होऊन लागण्याची शक्यता आहे. 

अधिक वाचा : How to increase heart pumping: हार्ट पंपिंग वाढवण्याचे 4 सोपे उपाय, रक्ताचा सुरु होईल मुक्त संचार

अशा प्रकारे करा व्यायाम

जिना चढताना एका वेळी दोन दोन पायर्‍या चढा, परंतु उतरताना एक एक पायरी खाली उतरा. तसेच दोन पायर्‍यांमध्ये योग्य अंतर असावे याची काळजी घ्या. त्यामुळे खाली पडण्याचा धोका राहणार नाही. पायर्‍यांच्या या व्यायामामुळे तुमचे वजन कमी होईल आणि सुटलेले पोटही कमी होईल.

दीर्घ श्वास घ्या

जिना चढताना दीर्घ श्वास घ्या. असे केल्यामुळे तुम्ही एकाचवेळी 40  ते 50 शिड्या चढू शकता. यामुळे तुमच्या पोटातील चरबी वितळेल. या व्यायामामुळे शरीरात ऊर्जा निर्माण होते. 

अधिक वाचा : Dengue Corona Difference: डेंग्यू आणि कोरोनाच्या लक्षणांत असतो फरक, गोंधळ टाळण्यासाठी ‘हे’ वाचा

(विशेष सूचना : सदर माहिती उपलब्ध माहितीवरून संकलित करण्यात आली आहे. टाइम्स नाऊ मराठी या माहितीला दुजोरा देत नाही. कुठलाही प्रयोग करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी