Weight Loss Tips : एका आठवड्यात होईल वजन कमी ? Weight Loss Coach ने सांगितला सर्वात सोपा उपाय

सध्या खुप जणांसमोर वाढत्या वजनाची समस्या भेडसावत आहे. त्यात वर्क फ्रॉम होम, चुकीची लाईफस्टाईल आणि चुकीचा आहार यास कारणीभूत आहे. वजन वाढल्यामुळे शरीर बेढब दिसतंच तसेच वाढलेल्या वजनामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळतं. त्यात मधुमेह, कर्करोग, हृदयरोगांचा समावेश आहे. इतकेच नाही तर कोरोनाचा आजारही बळावतो. 

weight loss
वजन कमी करण्याच्या टिप्स  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सध्या खुप जणांसमोर वाढत्या वजनाची समस्या भेडसावत आहे.
  • त्यात वर्क फ्रॉम होम, चुकीची लाईफस्टाईल आणि चुकीचा आहार यास कारणीभूत आहे.
  • वजन वाढल्यामुळे शरीर बेढब दिसतंच तसेच वाढलेल्या वजनामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळतं.

Weight Loss Tips : मुंबई : सध्या खुप जणांसमोर वाढत्या वजनाची समस्या भेडसावत आहे. त्यात वर्क फ्रॉम होम, चुकीची लाईफस्टाईल आणि चुकीचा आहार यास कारणीभूत आहे. वजन वाढल्यामुळे शरीर बेढब दिसतंच तसेच वाढलेल्या वजनामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळतं. त्यात मधुमेह, कर्करोग, हृदयरोगांचा समावेश आहे. इतकेच नाही तर कोरोनाचा आजारही बळावतो. 


वजन कमी करण्यासाठी लोक कधी कधी चुकीचा आहार आणि चुकीचा व्यायाम करतात. त्यामुळे हवे तसे रिझल्ट्स मिळत नाहीत. वजन कमी करण्याताना कधी घाई करू नये. त्यामुळे कदाचित लवकर वजन कमी होईलही परंतु यामुळे साईड इफेक्ट्स होण्याचीही शक्यता आहे. 

एका आठवड्यात पोटाची चरबी कमी होते ?(How to lose belly fat in just 1 week) 

वेट लॉस कोच डॉक्टर स्नेहल म्हणाल्या की असा प्रश्न नेहमी आम्हाला विचारला जातो. परंतु या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यापूर्वी आपल्या शरीरात किती फॅट आहे हे जाणने गरजेचे आहे. शरीरात एक्स्ट्रा फॅट कमी करण्यासाठी एक कालावधी लागतो. जेवढा वेळ तुमच्या शरीरात फॅट वाढला आहे, तेवढाच वेळ हा फॅट कमी होण्यास वेळ लागेल. 


एका आठवड्यात बेली फॅट कमी होईल ?

एका आठवड्यात बेली फॅट कमी होईल का ? या प्रश्नाचे उत्तर आहे नाही. कुठलाही आहार, औषधं किंवा व्यायाम केल्यास एका आठवड्यात बेली फॅट कमी करू शकत नाही. वजन कमी करण्यासाठी ही बाब आपण लक्षात ठेवली पाहिजे. वजन कमी करताना संयम बाळगला पाहिजे. या बाबतीत कुठलीही घाई संकटात नेणारी आहे. 

घाई गडबड केल्यास गंभीर परिणाम

डॉक्टरांनी सांगितले की लवकर वजन कमी करण्यासाठी लोक चुका करतात आणि त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. चुकीच्या पद्धतीने वजन कमी केल्यास त्याचा शरीरावर वाईट परिणाम होतो.  


बेली फॅट कसा कमी करावा ?

 

चुकीच्या पद्धतीमुळे वाढेल वजन

जर तुम्ही चुकीच्या पद्धतीमुळे वजन कमी करण्याचा प्रयत्न केला तर वजन कमी होण्याऐवजी वजन वाढेल अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. यामुळे तुम्हाला लवकर रिझल्ट्स मिळतील परंतु तुमच्या शरीरात पुन्हा फॅट जमा होईल.

हेल्दी डाएट घ्या

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वजन कमी करण्यासाठी खाण्या पिण्यावर बिल्कूल दुर्लक्ष करू नका. वजन कमी करताना लोक खाणे पिणे सोडून देतात हे अत्यंत चुकीचे आहे असे डॉक्टर सांगतात. आरोग्याला पोषक असा आहार घेतला पाहिजे. तसेच योग्य व्यायाम करणेही गरजेचे आहे. जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने वजन कमी करत असाल त्यामुळे शरीराला धोका निर्माण होऊ शकतो. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी