Weight loss: वजन कमी करणे हे एक अवघड काम असतं आणि त्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे व्यायाम, निरोगी आहार घेणे आहे. उन्हाळा सुरू झाला आहे. साहजिकच उन्हाळ्यात व्यायाम करणे हे सर्वात कठीण काम आहे. व्यायाम करताना येणाऱ्या घामामुळे तुमच्या शरीरातील पाणी कमी होऊ शकते ज्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते.
पण उन्हाळ्यात वजन कमी कसे करायचं? हा प्रश्न आहे. जर तुम्ही व्यायाम न करता सोप्या पद्धतीने वजन कमी करु इच्छिता तर तुम्हाला तुमच्या आहारावर लक्ष दिले पाहिजे. आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले की, असे काही पदार्थ आहेत जे तुम्हाला उन्हाळ्यात पोटाची चरबी कमी करण्यास आणि तुमच्या संपूर्ण शरीरावरील फॅट बर्न करण्यासाठी मदत करू शकतात.
हे पण वाचा : काखेतला काळेपणा दूर करण्यासाठी रामबाण उपाय
वजन कमी करण्यासाठी फळांना प्राधान्य देतात. उन्हाळ्यात कलिंगडापासून आंबा किंवा जांभूळ अशी भरपूर हंगामी फळे आहेत. ही फळे जीवनसत्त्वे आणि पाण्याने भरलेली असतात. ही फळे भूक वाढवतात आणि शरीराला हायड्रेट ठेवतात. उन्हाळ्यात शरीलाला थंड ठेवण्यासाठी कलिंगड, अननस, आंबा यासारखी फळे खा.
उन्हाळ्यात सातू ड्रिंक हा एक उत्तम पर्याय आहे. कारण हे ड्रिंक हायड्रेटिंग आणि पोषक तत्त्वांनी परिपूर्ण असे आहे. प्रोटीन, फायबर, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमने समृद्ध असलेले हे पेय शरीरातील पौष्टिकतेची कमतरता पूर्ण करते. तसेच ताक आणि दही सुद्धा कॅल्शियमने समृद्ध असतात. हे स्नायूंच्या वाढीसाठी, हाडे मजबूत करण्यासाठी तसेच पचनक्रिया सुधारण्यासाठी फायदेशीर असते.
हे पण वाचा : अंड्यासोबत हे पदार्थ खाणे टाळा अन्यथा होईल घोटाळा
उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी सलाड खाणे हा एक उत्तम पर्याय आहे. तुमच्या जेवणात गाजर, मुळा, काकडी, बीट यासारख्या पालेभाज्यांचा समावेश करा. तसेच स्पाउट्सचे सेवन सुद्धा करा. कोशिंबीर ही पचनक्रिया मजबूत करते तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते.
आईस टी उन्हाळ्यातील एक उत्तम पेय आहे. उष्णतेवर मात करण्यासाठी आणि हायड्रेटेड राहण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. आपल्या आईस्ड टीमध्ये पुदिना, लिंबू, काही बेरीज मिक्स करा. यामुळे पचन चांगले होते आणि वजन कमी करण्यासाठी दररोज आईस टी प्या.
हे पण वाचा : गर्भनिरोधक गोळ्या घेण्याची योग्य पद्धत माहितीये का?
नारळ पाण्यात इलेक्ट्रोलाईट्स असतात जे शरीराला ताजे आणि थंड ठेवतात. या पॉवर ड्रिंकमध्ये इलेक्टोलाइट्सचे प्रमाण जास्त असते. हे तुम्हाला दिवसभर फ्रेश ठेवते. नारळ पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यासही मदत होते.
(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ला म्हणून घेऊ नका. या संदर्भात आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.)