Weight loss tips: हाय प्रोटीन डाएट घ्या, सात दिवसात वजन कमी करा!

तब्येत पाणी
Updated May 15, 2019 | 14:48 IST | टाइम्स नाऊ मराठी

Weight loss tips: वजन वाढलं आहे म्हणून आपण त्रस्त असाल तर हा सात दिवसाचा डाएट प्लान फॉलो करा. हा प्लान विकेंडच्या आधी सुरू करा म्हणजे स्वत:ला तयार करण्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ मिळेल.जाणून घ्या सोप्या टीप्स.

Protein Diet
करा हा सात दिवसांचा प्रोटिन डाएट  |  फोटो सौजन्य: Getty Images

वजन कमी करणं हे मोठं जिकरीचं काम आहे. बऱ्याच वेळा खूप प्रयत्न करूनही वजन काही कमी होत नाही. खरं तर हे छोट्या छोट्या कारणामुळं असं घडत असतं. वजन कमी करण्यासाठी व्यायाम जितका आवश्यक आहे. तितकाच योग्य प्रमाणात आहार घेणंही महत्वाचं आहे.

वजन कमी करण्यासाठी आपण असा आहार घ्यायला हवा, ज्यामुळं आपल्या व्यायामानंतर फॅट कमी करण्यात आपल्याला मदत होईल. तसंच फॅट्स वाढवणारे पदार्थ खाण्यापासून आपण वाचलं पाहिजे. तर जाणून घ्या सात दिवसांचा हा विशेष डाएट प्लान, ज्यामुळं आपलं वजन कमी करण्यासाठी खूप मदत होईल. 

जाणून घ्या कसा आहे हा सात दिवसांचा डाएट प्लान

पहिला दिवस

नाश्ता सकाळी 8 वाजता : तीन अंड्यांच्या पांढऱ्या भागापासून बनवलेलं ऑमलेट. यात ७५ ग्रॅम पालकबरोबर थोडीशी मिरची अवश्य घाला.

मिड-मॉर्निंग स्नॅक्स : 11 वाजता १०० ग्राम भाजलेलं चिकन यामध्ये लाल मिरची नक्की वापरा.

लंच 1 वाजेपर्यंत : एक ग्रील्ड चिकन ब्रेस्ट, मिक्स सलाडची पानं, लाल मिरची, ग्रीन बीन्स यामध्ये 1 मोठा चमचा ऑलिव्ह ऑइल टाकावं.

संध्याकाळी : 100 ग्रॅम चिकन ब्रेस्टमध्ये एक काकडी टाकून खावी.

रात्रीचं जेवण : स्टीम्ड ब्रोकोलीबरोबर 100 ग्रॅम ग्रील्ड चिकन ब्रेस्ट

दुसरा दिवस

नाश्ता सकाळी 8 वाजता : एक मूठ केळ्याच्या चिप्सबरोबर बेक्ड चिकन ब्रेस्ट किंवा पनीर

मिड-मॉर्निंग स्नॅक्स : 100 ग्रॅम चिकन ब्रेस्ट किंवा पनीरबरोबर हिरवी मिरची

लंच 1 वाजेपर्यंत : मिक्स्ड ग्रीन सलाडबरोबर 100 ग्रॅम बेक्ड चिकन किंवा पनीर

संध्याकाळी : 75 ग्राम स्टीम्ड ब्रोकोलीबरोबर 100 ग्रॅम स्टिम्ड चिकन किंवा पनीर

रात्रीचं जेवण : बॉइल्ड बीन्सबरोबर सॉलमन फिश किंवा पनीर

तिसरा दिवस

नाश्ता सकाळी 8 वाजता : 100 ग्रॅम स्मोक्ड सॅल्मन किंवा पनीरबरोबर पालक

मिड-मॉर्निंग स्नॅक्स : 100 ग्रॅम चिकन किंवा पनीरबरोबर पिवळी ढोबळी मिरची

लंच 1 वाजेपर्यंत : ऑलिव्ह ऑइल टाकून मिक्स्ड ग्रीन सॅलेड. 100 ग्रॅम ग्रील्ड चिकन किंवा पनीर

संध्याकाळी : एवोकॅडोबरोबर 100 ग्रॅम पनीर किंवा चिकन स्लाईस

रात्रीचं जेवण : एक ग्रील्ड लॅम्ब स्टेक (किंवा दोन कटलेट); त्यात बॉइल्ड ब्रोकोली किंवा पालक वा पनीर घ्या.

राजमा-चावल

चौथा दिवस

नाश्ता सकाळी 8 वाजता : दोन तळलेल्या अंड्यांमध्ये, टोमॅटो आणि बिन्स घालावे.

मिड-मॉर्निंग स्नॅक्स : एका काकडीमध्ये 100 ग्रॅम चिकन किंवा पनीर

लंच 1 वाजेपर्यंत : सलाड, टोमॅटो, पालक एकत्रपणे ऑलिव्ह ऑइलमध्ये शिजवावा आणि त्याबरोबर पनीर किंवा चिकन खावं. 

संध्याकाळी : 100 ग्रॅम चिकन ब्रेस्ट किंवा पनीर

रात्रीचं जेवण : 100 ग्रॅम चिकन ब्रेस्ट किंवा पनीर

पाचवा दिवस

नाश्ता सकाळी 8 वाजता : एवोकॅडो आणि काकडीबरोबर 200 ग्रॅम चिकन ब्रेस्ट

मिड-मॉर्निंग स्नॅक्स : दोन अंड्यांमध्ये लाल मिरची घालावी

लंच 1 वाजेपर्यंत : 150 ग्रॅम ग्रील्ड सलाड आणि टोमॅटोबरोबर 150 ग्रॅम ग्रील्ड झींगे किंवा पनीर. हे सर्व पदार्थ ऑलिव्ह ऑइलमध्ये बनवावं.

संध्याकाळी : पाच बदामबरोबर 100 ग्रॅम चिकन ब्रेस्ट किंवा पनीर

रात्रीचं जेवण : स्टीम्ड ब्रोकोलीबरोबर 100 ग्रॅम ग्रील्ड चिकन ब्रेस्ट किंवा पनीर

सहावा दिवस

नाश्ता सकाळी 8 वाजता : चार अंड्यांच्या पांढऱ्या बल्कचं ऑम्लेट

मिड-मॉर्निंग स्नॅक्स : एका टोमॅटोबरोबर 100 ग्रॅम चिकन किंवा पनीर

लंच 1 वाजेपर्यंत : ग्रीन सलाडबरोबर 150 ग्रॅम चिकन किंवा पनीरबरोबर ऑलिव्ह ऑइलमध्ये तळलेली आणि मग उकडलेली ब्रोकोली

संध्याकाळी : पाच सुक्या मेव्याबरोबर 100 ग्रॅम चिकन किंवा पनीर

रात्रीचं जेवण : 200 ग्रॅम हिरवे बिन्स किंवा ब्रोकोली

दिवस सातवा

ब्रेकफास्ट: तीन अंड्याच्या पांढऱ्या बल्कचं ऑम्लेट. त्याबरोबर ग्रील्ड टोमॅटो आणि उकडलेला पालक.

मिड-मॉर्निंग स्नॅक्स: 100 ग्रॅम चिकनबरोबर पाच ब्राझील नट्स

लंच : उकळलेले शतावरी आणि ग्रीन सलाड बरोबर 150 ग्रॅम चिकन ब्रेस्ट किंवा पनीर

संध्याकाळाचा स्नॅक्स: काकडीबरोबर 100 ग्रॅम चिकन किंवा पनीर

डिनर: उकडलेल्या भाज्या किंवा ब्रोकोलीबरोबर ग्रील्ड चिकन किंवा पनीर

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी