Haldi Water For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी प्या हळदीचे पाणी, आठवड्याभरात पहा फरक

Haldi Water For Weight Loss: आपल्या घरात अनेक मसाले असता त्यांच उपयोग जेवण बनवण्यासाठी केला जातो. परंतु अनेक मसाले आहेत त्याचा आरोग्यासाठीही फायदा होतो. हळद हा त्यातील एक प्रमुख मसाला आहे. हळदीत अनेक औषधी गुण असतात, हळदीत अँटीऑक्सिडेंट्स, अँटीइन्फ्लेमेंटरी तसेच अँटीबॅक्टेरियल गुण असतात. त्यामुळे अनेक आजारांचा धोका कमी होतो.

turmeric water
हळदीचे पाणी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आपल्या घरात अनेक मसाले असता त्यांच उपयोग जेवण बनवण्यासाठी केला जातो.
  • परंतु अनेक मसाले आहेत त्याचा आरोग्यासाठीही फायदा होतो.
  • हळद हा त्यातील एक प्रमुख मसाला आहे. हळदीत अनेक औषधी गुण असतात.

Haldi Water For Weight Loss: आपल्या घरात अनेक मसाले असता त्यांच उपयोग जेवण बनवण्यासाठी केला जातो. परंतु अनेक मसाले आहेत त्याचा आरोग्यासाठीही फायदा होतो. हळद हा त्यातील एक प्रमुख मसाला आहे. हळदीत अनेक औषधी गुण असतात, हळदीत अँटीऑक्सिडेंट्स, अँटीइन्फ्लेमेंटरी तसेच अँटीबॅक्टेरियल गुण असतात. त्यामुळे अनेक आजारांचा धोका कमी होतो. हळद आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हळदीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच वजन कमी होण्यासही मदत होते. यासाठी जाणून घेऊया हळदीचे पाणी कसे बनवावे आणि त्याचे इतर फायदे. (weight loss drink turmeric water and see results in few weeks read in marathi)

अधिक वाचा : Worst food for kidney: ‘हे’ पाच पदार्थ ठरतात किडणीसाठी विष, आजच करा डाएटमधून हकालपट्टी

असे होते वजन कमी

हळदीत पोषक तत्व असतात, त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. हळदीत पॉलेफेनॉल करक्यूमिन कम्पाऊंड असतं त्यामुळे वजन की होण्यास मदत होते. वज कमी करण्यासाठी पाण्यात हळद घालून प्यावे. 

अधिक वाचा : Mouth Odor: तोंडाला दुर्गंधी येते? हे तीन अवयव असतात कारण, वाचा सविस्तर

असे बनवा हळद पाणी

हळदीचे पाणी बनवण्यासाठी हळदकुंडाची कुटलेली हळद घ्या. त्यात दोन कप गरम पाणी टाका. त्यानंतर त्यात मध मिक्स करा. पाणी थोडे कोमत झाल्यानंतर या पाण्याचे सेवन करा. शक्यतो रिकाम्या पोटी हे पाणी प्या त्यामुळे वजन लवकर कमी होण्यास मदत होती. 

अधिक वाचा : Crack Heels: टाचांना तडे गेल्यास करा हा हिंगाचा सोपा घरगुती उपाय, लगेच दिसेल फरक

हळदीचे पाणी पिण्याचे फायदे

  1. हळदीचे पाणी प्यायल्यास वजन कमी होण्यास मदत होतेच, शिवाय रिकाम्या पोटी हळदीचे पाणी प्यायल्यास सांधेदुखी दूर होते. 
  2. हळदीत अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुण असतात, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हळदीचे पाणी प्यायल्यास आजारांपासून लढण्याची ताकद मिळते. हळदीचे पाणी प्यायल्यास सर्दी खोकलाही दूर होतो. 
  3. हळदीचे पाणी प्यायल्यास हृदरोगाचा धोका कमी होतो. तसेच हळदीच्या पाण्याच्या सेवनाने कोलेस्ट्रॉलही कमी होतो. हळदीचे पाण्या प्यायल्यास रक्ताच्या गाठी तयार होत नाही. 

अधिक वाचा :  तुमच्या हाता-पायाला मुंग्या येतात का? मग वेळीच व्हा सावध, ही आहे धोक्याची घंटा

(विशेष सूचना : सदर माहिती उपलब्ध माहितीवरून संकलित करण्यात आली आहे. टाइम्स नाऊ मराठी या माहितीला दुजोरा देत नाही. कुठलाही प्रयोग करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी