नव्या वर्षात वजन घटवण्याचा विचार करत आहात तर या गोष्टींवर द्या लक्ष

तब्येत पाणी
Updated Dec 30, 2020 | 17:31 IST | टाइम्स नाऊ मराठी

वजन कमी करण्यासाठी काही गोष्टींवर लक्ष देणे गरजेचे असते. नवीन वर्षात तुम्ही जर संकल्प करत असाल तर नक्कीच तुमचे ध्येय कायम ठेवा.

weight loss
नव्या वर्षात वजन घटवण्याचा विचार करत आहात तर... 

थोडं पण कामाचं

  • डाएटिशियनशी संपर्क साधा
  • मेटाबॉलिज्ममध्ये सुधारणा करा
  • पाण्याचे सेवन करणेही गरजेचे

मुंबई: जेव्हा नवीन वर्ष येते तेव्हा बरेच लोक नव्या वर्षात वजन घटवण्याचा(weight loss) संकल्प करतात मात्र महिना संपताच हा संकल्प हवेत विरून जातो. जर तुम्हीही वाढत्या वजनाने त्रस्त असाल आणि नव्या वर्षात ते कमी करण्याचा संकल्प करत आहात तर काही गोष्टींवर लक्ष देणे गरजेचे आहे. ज्यामुळे तुमचा नववर्षाचा संकल्प पूर्ण होईल. 

डाएटटिशियनशी संपर्क साधा

वजन घटवण्याचा प्लान यशस्वी बनवण्यासाठी तुम्हाा काही गोष्टींवर लक्ष देणे गरजेचे आहे. दरम्यान डाएटिशियन तुम्हाला तुमच्या आरोग्याच्या समस्या, शरीर आणि जीवनशैलीला अधक चांगल्या पद्धतीने समजून वजन कमी करण्यासाठी योग्य तो डाएट प्लान देईल. दरम्यान, सोशल मीडियावर तुम्हाला वजन घटवण्यासंबंधी अनेक डाएट प्लानचे व्हिडिओ मिळतील. मात्र कोणत्याही डाएट प्लानवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. हे करण्याआधी एकदा डाएटिशियनशी जरूर संपर्क करा. 

आपल्या लक्ष्यावर निश्चित राहा

जर तुम्हला खरंच असे वाटत असेल की नवीन वर्षात वजन घटवण्याचा प्लान यशस्वी झाला पाहिजे तर त्यासाठी तुम्हाला सुरूवातीला काही स्टेप्स उचलाव्या लागतील. उदाहरण म्हणजे तुम्हाला वजन घटवण्याचे ध्येय निश्चित करून त्यावर ठाम राहिले पाहिजे. कारण एका महिन्यात ५ ते १० किलो वजन कमी करण्याचा प्लान केलात तर तुम्ही केवळ स्वत:ला मानसिक ताण द्याल. तसेचीह इतके वजन एका महिन्यात कमी करणे ही हेल्दी पद्धत नव्हे. 

मेटाबॉलिज्ममध्ये सुधारणा

जर तुम्हाला वजन कंट्रोलमध्ये ठेवायचे असेल तर तुमच्या मेटॉबॉलिज्मवर हे अवलंबून आहे. जर तुमचा मेटाबॉलिज्म कमी असेल कर वजन कमी करणे तुमच्यासाठी कठीण होऊ शकते. यातच वजन घटवताना मेटबॉलिज्मवर सुधारणा करण्यावर लक्ष दिले पाहिजे. उदाहरणासाठी योग्य प्रमाणात प्रोटीन घेणे आणि पुरेशी झोप घेणे गरजेचे असते. यामुळे मेटाबॉलिज्म सुधारण्यास मदत होते.  

पाण्याचे सेवनही गरजेचे

जर तुम्हाला वाटतं असेल की वजन घटवण्याचा प्लान यशस्वी व्हावा तर केवळ खाणेपिणे आणि एक्सरसाईजवर लक्ष देऊन चालणार नाही तर पाण्याचे महत्त्वही समजून घेतले पाहिजे. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी दररोज कमीत कमी सात ते आठ ग्लास पाणी पिणे गरजेचे असते. 

योग्य प्रमाणात पाणी पिणे, खासकरून गरम पाणी फॅट कमी करण्यास मदत करते. ज्यामुळे वजन घटवण्यास मदत होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी