Fenugreek Leaves Benefits: हिवाळ्यात अनेक जण व्यायाम करण्यास धजावत नाही. कारण सकाळी गुलाबी थंडी पडली असते आणि अशा वेळी बाहेर व्यायाम करण्याऐवजी पांघरूण घेऊन झोपण्याकडे बहुतांश जणांचा कल असतो. वातावरण बदलल्यामुळे खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्येही फरक पडतो. ज्यामुळे वजन वाढण्याचीही शक्यता असते. थंडीत वजन कमी करण्यासाठी व्यायामाऐवजी इतरही पर्याय आहेत. आपल्या किचनमध्ये अनेक पदार्थ आहेत त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल. (weight loss eat Fenugreek Leaves know more benefits in marthi)
अधिक वाचा : Weight Loss Story: 90 किलोच्या न्यूट्रिशनिस्टने केली कमाल, असं कमी केलं 30 किलो वजन
थंडीच्या दिवसांत डाएट करून तुम्ही मधुमेहही नियंत्रणात आणू शकता. त्यासाठी डाएटमध्ये मेथीच्या दाण्यांचा समावेश करावा. थंडीच्या दिवसांत मेथीच्या दाण्यांचे सेवन करण्याचे अनेक फायदे आहेत. जाणून घेऊया मेथीच्या दाण्यांबद्दल.
अधिक वाचा : Heart Attack: हिवाळ्यात सर्वाधिक असतो हार्ट अॅटकचा धोका, अशी घ्या आपल्या आरोग्याची काळजी
मेथीच्या दाण्यांचे सेवन केल्यास फार वेळ भूक लागत नाही. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. कोरिया देशात महिला वजन कमी करण्यासाठी मेथीचे पाणी पितात. मेथीच्या पाण्याने पोट भरत आणि फार वेळ भूक लागत नाही. ओवरइटिंगची सवय सुटल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
मेथीच्या दाण्यात सी, विटामिन बी, प्रोटीन, टोटल लिपिड, ऊर्जा, मॅंगनीज, सोडियम, कार्बोहाइड्रेट, फायबर, कॅल्शियम, आयरन, फॉस्फरस, पोटॅशियम आणि जिंक असतं.
अधिक वाचा : When to apply nail polish: मुलांना ‘या’ वयापर्यंत अजिबात लावू नका नेल पॉलिश, होऊ शकतात गंभीर आजार
तुम्ही मेथीची भाजी खाऊ शकता, त्यामुळे लवकर वजन कमी होण्यास मदत होईल. एक चमचा मेथीचे दाणे रात्रभर एक ग्लास पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी रिकाम्या पोटी या पाण्याचे सेवन करा. लवकरच तुम्हाला फरक दिसेल.
मेथीच्या दाण्यांच्या पाण्यातील पोषक तत्वामुळे डायबिटीजच्या रुग्णांनाही फायदा होतो. मेथीमुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहतं. मधुमेहाच्या रुग्णांनी आपल्या डाएटमध्ये मेथीची भाजी आणि मेथीच्या दाण्यांचा समावेश करावा.
(विशेष सूचना : सदर माहिती उपलब्ध माहितीवरून संकलित करण्यात आली आहे. टाइम्स नाऊ मराठी या माहितीला दुजोरा देत नाही. कुठलाही प्रयोग करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.)